< यशया 49 >
1 १ अहो द्विपांनो, माझे ऐका! आणि दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, लक्ष द्या. माझ्या आईने मला जगात आणले असताच, मी जन्मताच परमेश्वराने मला बोलावले आहे.
Höret auf mich, ihr Inseln; ihr Volksstämme aus der Ferne, horchet: Jehovah hat mich aus dem Mutterleibe gerufen, und in den Eingeweiden meiner Mutter meines Namens gedacht.
2 २ त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले आहे, त्याने मला त्याच्या हाताच्या सावलीत लपवले आहे. त्याने मला उजळता बाण केले आहे आणि आपल्या भात्यात मला लपवून ठेवले आहे.
Und hat meinen Mund gesetzt zum scharfen Schwert, mich in dem Schatten Seiner Hand versteckt, mich gesetzt zum lauter gemachten Pfeil, hat in Seinem Köcher mich verborgen.
3 ३ तो मला म्हणाला, “तू माझा सेवक इस्राएल आहेस, ज्याच्या ठायी मी माझा महिमा प्रकट करीन.”
Und sprach zu mir: Mein Knecht bist du, Israel, in dir will Ich Mich verklären.
4 ४ पण मी म्हणालो मी निरर्थक मेहनत केली, मी माझी शक्ती व्यर्थ घालवली आहे. तथापि माझा न्याय परमेश्वराजवळ आणि माझे प्रतिफळ माझ्या देवाजवळ आहे.
Ich aber sprach: Vergeblich habe ich mich abgemüht, umsonst und um nichts habe ich meine Kraft verzehrt? Doch ist mein Recht bei Jehovah und mein Arbeitslohn bei meinem Gott.
5 ५ आणि आता, तो परमेश्वर म्हणतो, ज्याने मला त्याचा सेवक व्हावा म्हणून जन्मापासून घडवले आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याच्याजवळ परत आणावे, मी परमेश्वराच्या दृष्टीत सन्मान पावलो आहे, आणि माझा देव माझे बळ झाले आहे.
Nun aber spricht Jehovah, Der mich von Mutterleib zum Knecht für Sich gebildet, um Jakob zu Ihm zurückzubringen, und daß Israel sich zu Ihm versammle, und ich verherrlicht werde in Jehovahs Augen, und mein Gott sei meine Stärke.
6 ६ तो म्हणतो, “याकोबाचे वंश उभारायला व इस्राएलचे वाचलेले परत आणण्यासाठी तू माझा सेवक व्हावे ही फार लहान गोष्ट आहे. तू पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे तारण व्हावे म्हणून मी तुला राष्ट्रांना प्रकाश असा देतो.”
Und spricht: Noch zu gering ist es, daß du Mir Knecht wirst, die Stämme Jakobs aufzurichten, und die Bewahrten von Israel zurückzubringen. Und Ich werde dich zum Licht der Völkerschaften geben, daß Mein Heil sei bis an das Ende der Erde.
7 ७ मनुष्यांनी ज्याला तुच्छ मानले, राष्ट्रांनी ज्याला वीट मानले, अधिकाऱ्यांच्या सेवकाला इस्राएलचा खंडणारा, त्याचा पवित्र देव असे म्हणतो, परमेश्वर जो विश्वासू, इस्राएलाला पवित्र, ज्याने तुला निवडले आहे त्याच्यामुळे राजे तुला पाहून उठतील आणि अधिकारी नमन करतील.
So spricht Jehovah, der Erlöser Israels, sein Heiliger, zu dem von der Seele Verachteten, der den Völkerschaften zum Greuel ist, dem Knechte der Herrscher: Könige werden sehen und aufstehen, Oberste, und vor dir sich niederbeugen wegen Jehovahs, Welcher ist treu, ob dem Heiligen Israels, Der dich erwählte.
8 ८ परमेश्वर असे म्हणतो, योग्य वेळेला मी माझी दया दाखवीन, मी तुला उत्तर देईल, आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन. मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईन. देश पुन्हा बांधायला आणि ओसाड वतन करून घ्यायला,
So spricht Jehovah: Zur Zeit des Wohlgefallens antworte Ich dir, und am Tage des Heils stehe Ich dir bei und bewahre dich, und gebe dich zum Bunde des Volkes, aufzurichten das Land, die verwüsteten Erbstücke zum Erbe auszuteilen.
9 ९ तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांस तू म्हणशील अंधारातून बाहेर या व तुम्ही आपणास प्रकट करा. ते मार्गात चरतील आणि सर्व उघड्या टेकड्या त्यांची कुरणे होतील.
Zu sprechen zu den Gebundenen: Kommet heraus; zu denen in der Finsternis: Werdet offenbar. Sie sollen weiden auf den Wegen, und auf allen Abhängen ihre Weide haben.
10 १० त्यांना भूक व तहान लागणार नाही, तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाहीत. कारण जो त्यांच्यावर दया करतो, तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.
Sie sollen nicht hungern und nicht dürsten, nicht soll sie Glut, noch Sonne treffen; denn ihr Erbarmer geleitet sie und wird sie zu den Quellgründen der Wasser leiten.
11 ११ मी माझे डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.
Und Ich setze alle Meine Berge zum Weg, und Meine Bahnen werden erhöht sein.
12 १२ “पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून ते माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. काही सीनी येत आहेत.”
Siehe, diese kommen von Ferne und siehe, diese von Mitternacht und von dem Meer und jene vom Lande Sinim.
13 १३ हे स्वर्गांनो गायन करा, हे पृथ्वी, आनंदीत हो, डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे, आणि तो आपल्या दु: खीतांवर दया करील.
Jubelt, ihr Himmel, und frohlocke du Erde, in Jubelgesang brecht aus ihr Berge; denn Jehovah tröstet Sein Volk und erbarmt Sich Seiner Elenden.
14 १४ पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला.”
Und Zion sprach: Jehovah hat mich verlassen und der Herr hat mein vergessen.
15 १५ कोणी स्त्री तिने जन्म दिलेल्या, आपल्या दुध पित्या बाळाला दया न दाखवता विसरेल काय? होय, कदाचित ती विसरेल पण मी तुला विसरणार नाही.
Wird auch ein Weib vergessen ihres Kindleins, daß sie sich nicht sollte erbarmen über ihres Leibes Sohn? Ob auch sie vergäßen, so will Ich doch deiner nicht vergessen.
16 १६ पाहा! तुझे नाव मी माझ्या तळहातावर कोरले आहे. तुझे कोट नित्य माझ्या पुढे आहेत.
Siehe, in die Hände habe Ich dich eingezeichnet; deine Mauern sind beständig vor mir.
17 १७ तुझी मुले त्वरा करीत आहेत, ज्यांनी तुझा नाश केला आहे, ते दूर जात आहेत.
Es eilen deine Söhne; die dich niederrei-ßen und veröden, ziehen aus von dir.
18 १८ तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पाहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन, तुझ्या कडे येतील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, खचित तू त्यांना दागिण्यांप्रमाणे आपल्या वर घालशील, एका नवरी सारखे तू त्यांना आपणावर घालशील.
Erhebe ringsum deine Augen und siehe, sie alle kommen zusammen zu dir. Bei Meinem Leben, spricht Jehovah, wie Geschmeide ziehst du sie an und bindest sie um wie eine Braut.
19 १९ जरी तू कचरा आणि उजाड अशी होती, आणि उध्वस्त झाली होती. तर आता राहाणाऱ्यांस फार संकुचित होशील आणि जे तुला गिळत असत ते फार दूर होतील.
Und deine Öden und deine Verwüstungen und dein umgerissenes Land wird dir dann zu eng, darin zu wohnen, und die dich verschlingen, müssen sich entfernen.
20 २० वियोग समयी तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील. “ही जागा फारच लहान आहे. आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू.”
Noch sprechen vor deinen Ohren die Söhne deiner Kinderlosigkeit! Zu eng ist mir der Ort, rücke mir hin, auf daß ich wohne!
21 २१ मग तू मनाशी म्हणशील, मी मुलांवेगळी झालेली, वांझ, हद्दपार झालेली व इकडे तिकडे भटकणारी अशी असता, माझ्यासाठी या मुलांना कोणी जन्म दिला?
Und du wirst in deinem Herzen sprechen: Wer hat mir diese gezeugt? - war ich doch kinderlos, vereinsamt, weggeführt und weggetan; und sie - wer hat sie großgezogen? Siehe, war ich doch allein verblieben! Wo waren sie?
22 २२ परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणतो, “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांस दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन, तेव्हा ते तुझी मुले त्यांच्या हातात आणि तुझ्या मुलींना खांद्यांवरून तुझ्याकडे आणतील.
So spricht der Herr Jehovah: Siehe, Ich will nach den Völkerschaften Meine Hand aufheben und zu den Völkern Mein Panier erhöhen, daß sie im Busen deine Söhne hereinbringen, und deine Töchter tragen auf der Schulter.
23 २३ राजे तुझे संगोपण करणारे बाप होतील, आणि त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ते भूमीकडे तोंड लववून, तुझ्यापुढे वाकून तुला नमन करतील आणि ते तुझ्या पायाची धूळ चाटतील, आणि मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे, जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते लाजवले जाणार नाहीत.”
Und Könige werden deine Wärter sein, und deine Säugammen ihre Fürstinnen. Auf das Antlitz beugen sie sich zur Erde vor dir nieder und lecken auf deiner Füße Staub, daß du wissest, daß Ich Jehovah bin, und die, so auf Mich hoffen, nicht beschämt werden.
24 २४ वीर योद्धा पासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जूलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय?
Kann man dem Helden sein Genommenes abnehmen? Und kann dem Gerechten der Gefangene entrinnen?
25 २५ पण परमेश्वर असे म्हणतो, होय, बंदिवान योद्धांकडून काढून घेण्यात येतील, आणि लूटलेले सोडवले जातील. कारण मी तुझ्या शत्रूंचा विरोध करीन, आणि तुझ्या मुलांना वाचविल.
Denn also spricht Jehovah: Auch dem Helden soll das Gefangene genommen werden, und des Trotzigen Genommenes entrinnen, und wider deine Haderer will Ich hadern und Ich will deine Söhne retten;
26 २६ “मी तुझ्या पीडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वत: च्याच रक्ताने मद्यधुंद होतील. आणि सर्व मनुष्य जाणतील की, मी परमेश्वर, तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.”
Und deine Bedrücker lasse Ich ihr eigen Fleisch essen, und wie im Moste sie im eigenen Blute trunken machen, auf daß alles Fleisch wisse, daß Ich Jehovah bin, dein Heiland und dein Erlöser, der Gewaltige Jakobs.