< यशया 49 >

1 अहो द्विपांनो, माझे ऐका! आणि दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, लक्ष द्या. माझ्या आईने मला जगात आणले असताच, मी जन्मताच परमेश्वराने मला बोलावले आहे.
أنْصِتِي إِلَيَّ أَيَّتُهَا الْجَزَائِرُ، وَأَصْغُوا يَا شُعُوبَ الْبِلادِ الْبَعِيدَةِ: قَدْ دَعَانِي الرَّبُّ وَأَنَا مَازِلْتُ جَنِيناً، وَذَكَرَ اسْمِي وَأَنَا مَابَرِحْتُ فِي رَحِمِ أُمِّي.١
2 त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारी सारखे केले आहे, त्याने मला त्याच्या हाताच्या सावलीत लपवले आहे. त्याने मला उजळता बाण केले आहे आणि आपल्या भात्यात मला लपवून ठेवले आहे.
جَعَلَ فَمِي كَسَيْفٍ قَاطِعٍ، وَوَارَانِي فِي ظِلِّ يَدَيْهِ؛ صَنَعَ مِنِّي سَهْماً مَسْنُوناً وَأَخْفَانِي فِي جُعْبَتِهِ،٢
3 तो मला म्हणाला, “तू माझा सेवक इस्राएल आहेस, ज्याच्या ठायी मी माझा महिमा प्रकट करीन.”
وَقَالَ لِي: «أَنْتَ عَبْدِي إِسْرَائِيلُ الَّذِي بِهِ أَتَمَجَّدُ»٣
4 पण मी म्हणालो मी निरर्थक मेहनत केली, मी माझी शक्ती व्यर्थ घालवली आहे. तथापि माझा न्याय परमेश्वराजवळ आणि माझे प्रतिफळ माझ्या देवाजवळ आहे.
وَلَكِنَّنِي أَجَبْتُ: «لَقَدْ تَعِبْتُ بَاطِلاً. وَأَفْنَيْتُ قُوَّتِي سُدىً وَعَبَثاً. غَيْرَ أَنَّ حَقِّي مَحْفُوظٌ عِنْدَ الرَّبِّ، وَمَكَافَأَتِي عِنْدَ إِلَهِي».٤
5 आणि आता, तो परमेश्वर म्हणतो, ज्याने मला त्याचा सेवक व्हावा म्हणून जन्मापासून घडवले आहे, ह्यासाठी की याकोबाला त्याच्याजवळ परत आणावे, मी परमेश्वराच्या दृष्टीत सन्मान पावलो आहे, आणि माझा देव माझे बळ झाले आहे.
وَالآنَ قَالَ لِيَ الرَّبُّ الَّذِي كَوَّنَنِي فِي رَحِمِ أُمِّي لأَكُونَ لَهُ خَادِماً، حَتَّى أَرُدَّ ذُرِّيَّةَ يَعْقُوبَ إِلَيْهِ، فَيَجْتَمِعَ بَنُو إِسْرَائِيلَ حَوْلَهُ، فَأَتَمَجَّدَ فِي عَيْنَيِ الرَّبِّ وَيَكُونَ إِلَهِي قُوَّتِي:٥
6 तो म्हणतो, “याकोबाचे वंश उभारायला व इस्राएलचे वाचलेले परत आणण्यासाठी तू माझा सेवक व्हावे ही फार लहान गोष्ट आहे. तू पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे तारण व्हावे म्हणून मी तुला राष्ट्रांना प्रकाश असा देतो.”
لَكَمْ هُوَ يَسِيرٌ أَنْ تَكُونَ لِي عَبْداً لِتَسْتَنْهِضَ أَسْبَاطَ يَعْقُوبَ، وَتَرُدَّ مَنْ نَجَّيْتُ مِنَ إِسْرَائِيلَ، لِذَلِكَ سَأَجْعَلُكَ نُوراً لِلأُمَمِ لِتَكُونَ خَلاصِي إِلَى أَقْصَى الأَرْضِ.٦
7 मनुष्यांनी ज्याला तुच्छ मानले, राष्ट्रांनी ज्याला वीट मानले, अधिकाऱ्यांच्या सेवकाला इस्राएलचा खंडणारा, त्याचा पवित्र देव असे म्हणतो, परमेश्वर जो विश्वासू, इस्राएलाला पवित्र, ज्याने तुला निवडले आहे त्याच्यामुळे राजे तुला पाहून उठतील आणि अधिकारी नमन करतील.
وَهَذَا مَا يَقُولُهُ الرَّبُّ فَادِي إِسْرَائِيلَ وَقُدُّوسُهُ لِمَنْ صَارَ مُحْتَقَراً وَمَرْذُولاً لَدَى الأُمَمِ وَعَبْداً لِلْمُتَسَلِّطِينَ: يَرَاكَ الْمُلُوكُ وَيَنْهَضُونَ، وَيَسْجُدُ لَكَ الرُّؤَسَاءُ مِنْ أَجْلِ الرَّبِّ الأَمِينِ، قُدُّوسِ إِسْرَائِيلَ الَّذِي اصْطَفَاكَ.٧
8 परमेश्वर असे म्हणतो, योग्य वेळेला मी माझी दया दाखवीन, मी तुला उत्तर देईल, आणि तारणाच्या दिवशी मी तुला मदत करेन. मी तुझे रक्षण करेन आणि तुला लोकांचा करार असा देईन. देश पुन्हा बांधायला आणि ओसाड वतन करून घ्यायला,
وَهَذَا مَا يَقُولُهُ الرَّبُّ: «اسْتَجَبْتُكَ فِي وَقْتِ رِضًى، وَفِي يَوْمِ خَلاصِي أَعَنْتُكَ فَأَحْفَظُكَ وَأُعْطِيكَ عَهْداً لِلشَّعْبِ لَتَسْتَرِدَّ الأَرْضَ وَتُوَرِّثَ الأَمْلاكَ الَّتِي دَاهَمَهَا الدَّمَارُ،٨
9 तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांस तू म्हणशील अंधारातून बाहेर या व तुम्ही आपणास प्रकट करा. ते मार्गात चरतील आणि सर्व उघड्या टेकड्या त्यांची कुरणे होतील.
لِتَقُولَ لِلأَسْرَى:’اخْرُجُوا‘وَلِلَّذِينَ فِي الظُّلْمَةِ’اظْهَرُوا‘فَيَرْعَوْنَ فِي الطُّرُقَاتِ وَتُصْبِحُ الرَّوَابِي الْجَرْدَاءُ مَرَاعِيَ لَهُمْ.٩
10 १० त्यांना भूक व तहान लागणार नाही, तळपणारा सूर्य आणि उष्णता त्यांना इजा करणार नाहीत. कारण जो त्यांच्यावर दया करतो, तो त्यांना घेऊन चालेल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.
لَا يَجُوعُونَ وَلا يَعْطَشُونَ، وَلا يُعْيِيهُمْ لَهِيبُ الصَّحْرَاءِ وَلا لَفْحُ الشَّمْسِ، لأَنَّ رَاحِمَهُمْ يَهْدِيهِمْ وَيَقُودُهُمْ إِلَى يَنَابِيعِ الْمِيَاهِ.١٠
11 ११ मी माझे डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन.
وَأَجْعَلُ كُلَّ جِبَالِي سَبِيلاً، وَطُرُقِي تَرْتَفِعُ.١١
12 १२ “पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून ते माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. काही सीनी येत आहेत.”
انْظُرُوا، هَا هُمْ يُقْبِلُونَ مِنْ دِيَارٍ بَعِيدَةٍ، هَؤُلاءِ مِنَ الشِّمَالِ وَالْغَرْبِ، وَهَؤُلاءِ مِنْ أَرْضِ سِينِيمَ».١٢
13 १३ हे स्वर्गांनो गायन करा, हे पृथ्वी, आनंदीत हो, डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. कारण परमेश्वराने त्याच्या लोकांचे सांत्वन केले आहे, आणि तो आपल्या दु: खीतांवर दया करील.
فَاهْتِفِي فَرَحاً أَيَّتُهَا السَّمَاوَاتُ، وَابْتَهِجِي أَيَّتُهَا الأَرْضُ، وَأَشِيدِي بِالتَّرْنِيمِ أَيَّتُهَا الْجِبَالُ، لأَنَّ الرَّبَّ عَزَّى شَعْبَهُ وَرَأَفَ بِبَائِسِيهِ.١٣
14 १४ पण आता सियोन म्हणते, “परमेश्वराने मला सोडून दिले, माझा प्रभू मला विसरला.”
لَكِنَّ أَهْلَ صِهْيَوْنَ قَالُوا: «لَقَدْ أَهْمَلَنَا الرَّبُّ وَنَسِيَنَا».١٤
15 १५ कोणी स्त्री तिने जन्म दिलेल्या, आपल्या दुध पित्या बाळाला दया न दाखवता विसरेल काय? होय, कदाचित ती विसरेल पण मी तुला विसरणार नाही.
«هَلْ تَنْسَى الْمَرْأَةُ رَضِيعَهَا وَلا تَرْحَمُ ابْنَ أَحْشَائِهَا؟ حَتَّى هَؤُلاءِ يَنْسَيْنَ، أَمَّا أَنَا فَلا أَنْسَاكُمْ.١٥
16 १६ पाहा! तुझे नाव मी माझ्या तळहातावर कोरले आहे. तुझे कोट नित्य माझ्या पुढे आहेत.
انْظُرُوا هَا أَنَا قَدْ نَقَشْتُكِ يَا صِهْيَوْنُ عَلَى كَفِّي، وَأَسْوَارُكِ لَا تَبْرَحُ مِنْ أَمَامِي.١٦
17 १७ तुझी मुले त्वरा करीत आहेत, ज्यांनी तुझा नाश केला आहे, ते दूर जात आहेत.
أَسْرَعَ إِلَيْكِ أَوْلادُكِ بَنَّاؤُوكِ، وَفَارَقَكِ هَادِمُوكِ وَمُخَرِّبُوكِ.١٧
18 १८ तू आपल्या सभोवती नजर टाक आणि पाहा, ते सर्व एकत्र गोळा होऊन, तुझ्या कडे येतील. परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, खचित तू त्यांना दागिण्यांप्रमाणे आपल्या वर घालशील, एका नवरी सारखे तू त्यांना आपणावर घालशील.
ارْفَعِي عَيْنَيْكِ وَتَلَفَّتِي حَوْلَكِ وَانْظُرِي، فَقَدِ اجْتَمَعَ أَبْنَاؤُكِ وَتَوَافَدُوا إِلَيْكِ. حَيٌّ أَنَا»، يَقُولُ الرَّبُّ، «فَإِنَّكِ سَتَتَزَيَّنِينَ بِهِمْ كَالْحُلِيِّ وَتَتَقَلَّدِينَهُمْ كَعَرُوسٍ١٨
19 १९ जरी तू कचरा आणि उजाड अशी होती, आणि उध्वस्त झाली होती. तर आता राहाणाऱ्यांस फार संकुचित होशील आणि जे तुला गिळत असत ते फार दूर होतील.
وَتَعِجُّ أَرْضُكِ الْخَرِبَةُ وَدِيَارُكِ الْمُتَهَدِّمَةُ، وَمَنَاطِقُكِ الْمُدَمَّرَةُ بِالسُّكَّانِ حَتَّى تَضِيقَ بِهِمْ، وَيَبْتَعِدَ عَنْكِ مُبْتَلِعُوكِ.١٩
20 २० वियोग समयी तुझ्यापासून दूर झालेली मुले तुझ्या कानात म्हणतील. “ही जागा फारच लहान आहे. आम्हास राहायला मोठी जागा कर, जेणेकरून आम्ही त्यामध्ये राहू.”
وَيَقُولُ أَيْضاً فِي مَسَامِعِكِ بَنُوكِ الْمَوْلُودُونَ فِي أَثْنَاءِ ثُكْلِكِ:’إِنَّ الْمَكَانَ أَضْيَقُ مِنْ أَنْ يَسَعَنَا، فَأَفْسِحِي لَنَا حَتَّى نَسْكُنَ.‘٢٠
21 २१ मग तू मनाशी म्हणशील, मी मुलांवेगळी झालेली, वांझ, हद्दपार झालेली व इकडे तिकडे भटकणारी अशी असता, माझ्यासाठी या मुलांना कोणी जन्म दिला?
فَتَسْأَلِينَ نَفْسَكِ:’مَنْ أَنْجَبَ لِي هَؤُلاءِ وَأَنَا ثَكْلَى وَعَاقِرٌ، مَنْفِيَّةٌ وَمَنْبُوذَةٌ؟ مَنْ رَبَّى لِي هَؤُلاءِ؟ فَقَدْ تُرِكْتُ وَحْدِي، أَمَّا هَؤُلاءِ فَمِنْ أَيْنَ جَاءُوا؟‘»٢١
22 २२ परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणतो, “बघ, मी हात उंचावून राष्ट्रांना खूण करीन. मी सर्व लोकांस दिसावा म्हणून माझा ध्वज उंच धरीन, तेव्हा ते तुझी मुले त्यांच्या हातात आणि तुझ्या मुलींना खांद्यांवरून तुझ्याकडे आणतील.
وَهَذَا مَا يَقُولُهُ السَّيِّدُ الرَّبُّ: «هَا أَنَا أَرْفَعُ يَدِي إِلَى الأُمَمِ وَأَنْصِبُ رَايَتِي إِلَى الشُّعُوبِ، فَيَحْمِلُونَ أَبْنَاءَكِ فِي أَحْضَانِهِمْ وَبَنَاتِكِ عَلَى أَكْتَافِهِمْ.٢٢
23 २३ राजे तुझे संगोपण करणारे बाप होतील, आणि त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील. ते भूमीकडे तोंड लववून, तुझ्यापुढे वाकून तुला नमन करतील आणि ते तुझ्या पायाची धूळ चाटतील, आणि मग तुला कळेल की मीच परमेश्वर आहे, जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते लाजवले जाणार नाहीत.”
يَكُونُ لَكِ الْمُلُوكُ آبَاءَ مُرَبِّينَ، وَمَلِكَاتُهُمْ مُرْضِعَاتٍ، يَنْحَنُونَ أَمَامَكِ بِوُجُوهٍ مُطْرِقَةٍ إِلَى الأَرْضِ، وَيَلْحَسُونَ تُرَابَ قَدَمَيْكِ. عِنْدَئِذٍ تُدْرِكِينَ أَنَّنِي أَنَا الرَّبُّ، وَكُلُّ مَنْ يَتَّكِلُ عَلَيَّ لَا يَخْزَى».٢٣
24 २४ वीर योद्धा पासून लूट हिसकून घेतील काय? अथलाल जूलमी राजाकडे कायद्याने बंदी असलेले सोडले जातील काय?
هَلْ تُسْلَبُ الْغَنِيمَةُ مِنَ الْمُحَارِبِ الْجَبَّارِ؟ أَوْ يُفْلِتُ الأَسْرَى مِنْ قَبْضَةِ الْغَالِبِ؟٢٤
25 २५ पण परमेश्वर असे म्हणतो, होय, बंदिवान योद्धांकडून काढून घेण्यात येतील, आणि लूटलेले सोडवले जातील. कारण मी तुझ्या शत्रूंचा विरोध करीन, आणि तुझ्या मुलांना वाचविल.
«نَعَمْ سَبْيُ الْجَبَّارِ يُسْلَبُ مِنْهُ، وَتُسْتَرَدُّ الْغَنِيمَةُ مِنَ الْغَالِبِ، لأَنَّنِي أُخَاصِمُ مُخَاصِمِيكِ وَأُنْقِذُ أَبْنَاءَكِ،٢٥
26 २६ “मी तुझ्या पीडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वत: च्याच रक्ताने मद्यधुंद होतील. आणि सर्व मनुष्य जाणतील की, मी परमेश्वर, तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.”
وَأَجْعَلُ مُضْطَهِدِيكِ يَلْتَهِمُونَ لُحُومَ أَجْسَادِهِمْ، وَيَسْكَرُونَ بِدَمِهِمْ كَمَنْ يَشْرَبُ خَمْراً. عِنْدَئِذٍ يُدْرِكُ كُلُّ ذِي جَسَدٍ أَنَّنِي أَنَا الرَّبُّ مُخَلِّصُكِ وَفَادِيكِ إِلَهُ يَعْقُوبَ الْقَدِيرُ».٢٦

< यशया 49 >