< यशया 48 >
1 १ जे तुम्ही इस्राएलाच्या नावाने ओळखले जाता, आणि जे तुम्ही यहूदाच्या शुक्राणातून जन्मले आहा, याकोबाच्या घराण्या, हे ऐक. जे तुम्ही परमेश्वराच्या नावाची शपथ वाहता आणि इस्राएलाच्या देवाला विनंती करता, पण हे तुम्ही प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करीत नाही.
The hows of Jacob, that ben clepid bi the name of Israel, and yeden out of the watris of Juda, here these thingis, whiche sweren in the name of the Lord, and han mynde on God of Israel, not in treuthe, nether in riytfulnesse.
2 २ कारण ते स्वत: ला पवित्र नगराचे म्हणतात आणि इस्राएलाच्या देवावर विश्वास ठेवतात, ज्याचे नाव सेनाधीश परमेश्वर
For thei ben clepid of the hooli citee, and ben stablischid on the God of Israel, the Lord of oostis is his name.
3 ३ “मी काळापूर्वीच या गोष्टी जाहीर केल्या आहेत, त्या माझ्या मुखातून निघाल्या आणि मीच त्या कळविल्या. मी त्या अचानक करु लागलो, आणि त्या घडून आल्या.
Fro that tyme Y telde the former thingis, and tho yeden out of my mouth; and Y made tho knowun; sudenli Y wrouyte, and tho thingis camen.
4 ४ कारण मला माहित होते की तुम्ही हट्टी आहात, तुमच्या मानेचे स्नायु लोखंडाप्रमाणे ताठ आणि तुझे कपाळ कांस्याचे आहे.
For Y wiste that thou art hard, and thi nol is a senewe of irun, and thi forhed is of bras.
5 ५ यास्तव मी तुला या गोष्टी आधीच घोषीत केल्या, त्या घडण्या अगोदरच मी तुला सांगितले, जेणेकरून तू असे म्हणू नये की, माझ्या मूर्तीने ती कृत्ये केली, आणि माझ्या कोरीव मूर्तीने व माझ्या ओतीव मूर्तीने ती आज्ञापिले.”
Y biforseide to thee fro that tyme, bifore that tho thingis camen, Y schewide to thee, lest perauenture thou woldist seie, Myn idols diden these thingis, and my grauun ymagis and my yotun
6 ६ तू या गोष्टी बद्दल ऐकले; हे सर्व पुरावे पहा; आणि तू, मी जे काही बोललो ते खरे आहे का ते मान्य नाही करणार? आतापासून मी तुला नव्या गोष्टी, माहीत नसलेल्या गोष्टी दाखवील्या आहेत.
ymagis senten these thingis whiche thou herdist. Se thou alle thingis, but ye telden not. Y made herd newe thyngis to thee fro that tyme, and thingis ben kept whiche thou knowist not;
7 ७ या गोष्टी पूर्वी घडून गेलेल्या नाहीत, त्या आत्ताच अस्तित्वांत आणल्या या आता घडत असणाऱ्या गोष्टी आहेत, आणि आधी तू त्यांच्याबद्दल कधीच ऐकले नाहीस. त्यामुळे आम्हांला हे अगोदरच माहीत होते असे तू म्हणू शकणार नाही.
now tho ben maad of nouyt, and not fro that tyme, and bifor the dai, and thou herdist not tho thingis; lest perauenture thou seie, Lo! Y knew tho thingis.
8 ८ त्या तू ऐकल्या नाही, त्या तुला माहीत नाही, या गोष्टी पूर्वकालापासून तुझ्या कानाला माहित नव्हत्या, कारण मला माहित होते के तू फार कपट करणारा आहेस, आणि जन्मापासूनच तू बंडखोर आहेस.
Nether thou herdist, nether thou knewist, nether thin eere was openyd fro that tyme; for Y woot, that thou trespassynge schal trespasse, and Y clepide thee a trespassour fro the wombe.
9 ९ पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही.
For my name Y schal make fer my strong veniaunce, and with my preysyng Y schal refreyne thee, lest thou perische.
10 १० पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे.
Lo! Y haue sode thee, but not as siluer; Y chees thee in the chymeney of pouert.
11 ११ माझ्यासाठी, माझ्यासाठीच, मी हे करेन, कारण मी माझ्या नावाचा अनादर कसा होऊ देऊ? मी माझे वैभव दुसऱ्याला देणार नाही.
Y schal do for me, that Y be not blasfemyd, and Y schal not yyue my glorie to another.
12 १२ याकोबा, माझे ऐक, आणि इस्राएला, ज्याला मी बोलाविले आहे, माझे ऐक. मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे.
Jacob and Israel, whom Y clepe, here thou me; Y my silf, Y am the firste and Y am the laste.
13 १३ होय, माझ्याच हाताने पृथ्वीचे पाये घातले, आणि माझ्या उजव्या हाताने स्वर्गे पसरली, जेव्हा मी त्यांना हाक मारतो तेव्हा ते एकत्र उभे राहतात
And myn hond foundide the erthe, and my riyt hond mat heuenes; Y schal clepe tho, and tho schulen stonde togidere.
14 १४ तुम्ही सर्व एकत्र या आणि माझे ऐका. ज्या कोणी तुमच्या मध्ये कोणी या गोष्टी सांगितल्या? परमेश्वराची सहमती, त्याचा बाबेलविरूद्ध असणारा हेतू साध्य करीन. तो खास्द्यांविरूद्ध परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करीन.
Alle ye be gaderid togidere, and here; who of hem telde these thingis? The Lord louyde hym, he schal do his wille in Babiloyne, and his arm in Caldeis.
15 १५ मी, मी बोललो आहे, होय, मी त्यास बोलाविले आहे, मी त्यास आणले आहे आणि तो यशस्वी होईल.
Y, Y spak, and clepide hym; Y brouyte hym, and his weie was dressid.
16 १६ माझ्या जवळ या आणि हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे. आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे.
Neiye ye to me, and here ye these thingis; at the bigynnyng Y spak not in priuete; fro tyme, bifore that thingis weren maad, Y was there, and now the Lord God and his Spirit sente me.
17 १७ जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो.
The Lord, thin ayen biere, the hooli of Israel, seith these thingis, Y am thi Lord God, techynge thee profitable thingis, and Y gouerne thee in the weie, wher ynne thou goist.
18 १८ जर तू फक्त माझ्या आज्ञा पाळल्या असत्या तर किती बरे झाले असते! तेव्हा भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुझी शांती असती आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे तुझे तारण असते.
Y wolde that thou haddist perseyued my comaundementis, thi pees hadde be maad as flood, and thi riytfulnesse as the swolowis of the see;
19 १९ तुझे वंशज वाळूच्या प्रमाणे आणि तुझ्या पोटची मुले तिच्या कणांप्रमाणे झाले असते. आणि तुमचे नाव माझ्यासमोर काढून टाकले गेले नसते अथवा नष्ट केले गेले नसते.
and thi seed hadde be as grauel, and the generacioun of thi wombe, as the litle stoonys therof; the name of it hadde not perischid, and hadde not be al to-brokun fro my face.
20 २० माझ्या लोकांनो, बाबेल सोडा, खास्दयापांसून पळा, गायनाच्या शब्दाने तुम्ही हे कळवा, तुम्ही हे सांगा, पृथ्वीच्या अंता पर्यंत गाजवून बोला. सांगा, परमेश्वराने त्याचा सेवक याकोब याला खंडूण घेतले आहे.
Go ye out of Babiloyne, fle ye fro Caldeis; telle ye in the vois of ful out ioiying; make ye this herd, and bere ye it `til to the laste partis of erthe; seie ye, The Lord ayenbouyte his seruaunt Jacob.
21 २१ तो त्यांचे वाळवंटांतून मार्गदर्शन करत असता, त्यांना तहान लागली नाही, त्याने खडकातून त्यांच्यासाठी पाणी वाहायला लावले, आणि त्याने खडक फोडला आणि पाणी बाहेर वाहू लागले.
Thei thirstiden not in desert, whanne he ladde hem out; he brouyte forth to hem watir of a stoon, and he departide the stoon, and watris flowiden.
22 २२ पण परमेश्वर म्हणतो, “पाप्यांस शांती नाही.”
Pees is not to wickid men, seith the Lord.