< यशया 47 >
1 १ बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस. तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.
Herunter, Jungfrau, du Tochter Babel, setze dich in den Staub, setze dich auf die Erde! Denn die Tochter der Chaldäer hat keinen Stuhl mehr. Man wird dich nicht mehr nennen: Du Zarte und Lüstlin.
2 २ जाते घे आणि पीठ दळ; तुझा बुरखा काढ, तुझ्या झग्याचा घोळ काढून टाक, तुझे पाय उघडे कर, नद्या ओलांडून जा.
Nimm die Mühle und mahle Mehl, flicht deine Zöpfe aus, entblöße den Fuß, entdecke den Schenkel, wate durchs Wasser,
3 ३ तुझी नग्नता उघडी होईल, होय, तुझी लज्जा दिसेल. मी सूड घेईल आणि कोणा मनुष्यास सोडणार नाही.
daß deine Scham aufgedeckt und deine Schande gesehen werde. Ich will mich rächen, und soll mir kein Mensch abbitten.
4 ४ “आमचा उद्धारक, त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे.”
(Solches tut) unser Erlöser, welcher heißt der HERR Zebaoth, der Heilige in Israel.
5 ५ खास्द्यांच्या कन्ये शांत बस आणि अंधकारात जा; तुला यापुढे राज्याची राणी म्हणणार नाहीत.
Setzte dich in das Stille, gehe in die Finsternis, du Tochter der Chaldäer; denn du sollst nicht mehr heißen: Frau über Königreiche.
6 ६ मी माझ्या लोकांवर रागावलो होतो; मी माझे वतन अशुद्ध केले आहे आणि मी ते तुझ्या हातात दिले आहे, पण तू त्यांना दया दाखवली नाही; तू वृद्धांवर फार जड ओझे ठेवले आहे.
Denn da ich über mein Volk zornig war und entweihete mein Erbe, übergab ich sie in deine Hand; aber du beweisetest ihnen keine Barmherzigkeit; auch über die Alten machtest du dein Joch allzu schwer
7 ७ तू म्हटले, मी त्यांच्यावर सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाल राज्य करीन. म्हणून तू यागोष्टी मनात घेतल्या नाहीत, किंवा यांचा परिणाम लक्षात घेतला नाही.
und dachtest: Ich bin eine Königin ewiglich. Du hast solches bisher noch nicht zu Herzen gefasset noch daran gedacht, wie es mit ihnen hernach werden sollte.
8 ८ तेव्हा आता हे ऐका, अगे विलासिनी जी तू सुरक्षितपणे बसली आहेस, जी तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणीच नाही; मी कधीच विधवा अशी बसणार नाही किंवा मला मुले गमवल्याचा अनुभव कधी येणार नाही.
So höre nun dies, die du in Wollust lebest und so sicher sitzest und sprichst in deinem Herzen: Ich bin's und keine mehr; ich werde keine Witwe werden noch unfruchtbar sein.
9 ९ परंतु अपत्यहीनता व विधवापण या दोन्ही गोष्टी एका दिवशी एका क्षणात तुझ्यावर येतील; तुझे जादूटोणा आणि पुष्कळ मंत्रतंत्र व ताईत यांना न जुमानता तुजवर जोराने येतील.
Aber es werden dir solche alle beide kommen plötzlich auf einen Tag, daß du Witwe und unfruchtbar seiest; ja, vollkömmlich werden sie über dich kommen um der Menge willen deiner Zauberer und um deiner Beschwörer willen, deren ein großer Haufe bei dir ist.
10 १० तू आपल्या दुष्कृत्यांवर विश्वास ठेवलीस; तू म्हणालास, मला कोणी पाहणार नाही; तुझे शहाणपण आणि ज्ञान यांनी तुला बहकावले, पण तू आपल्या मनात म्हणतेस, मीच आहे आणि माझ्यासारखे कोणी नाही.
Denn du hast dich auf deine Bosheit verlassen, da du dachtest: Man siehet mich nicht; deine Weisheit und Kunst hat dich gestürzt und sprichst in deinem Herzen: Ich bin's und sonst keine.
11 ११ तुझ्यावर संकटे येतील; तुझ्या आपल्या मंत्रातंत्राने ते घालवून देण्यास तू समर्थ नाहीस. तुझ्यावर विपत्ती येईल; ती तू निवारण करू शकणार नाहीस. तुला समजण्या पूर्वीच अचानक तुझ्यावर संकटे येतील.
Darum wird über dich ein Unglück kommen, das du nicht weißest, wenn es daherbricht, und wird ein Unfall auf dich fallen, den du nicht sühnen kannst; denn es wird plötzlich ein Getümmel über dich kommen, des du dich nicht versiehest.
12 १२ ज्या तुझ्या पुष्कळ मंत्रतंत्रात आणि जादूटोणात आपल्या लहानपणापासून विश्वासाने त्याचे पठन करून त्यामध्ये टिकून राहीला; कदाचित त्यामध्ये तू यशस्वी होशील, कदाचित तू विपत्तीला घाबरून दूर होशील.
So tritt nun auf mit deinen Beschwörern und mit der Menge deiner Zauberer, unter welchen du dich von deiner Jugend auf bemühet hast, ob du dir möchtest raten, ob du möchtest dich stärken.
13 १३ तू आपले बहुत सल्लागार करून थकली आहेस; आणि तुला जे काय घडणार आहे त्यापासून तुझे रक्षण करो. जे आकाशाचा तक्ता आणि ताऱ्यांकडे पाहून नव चंद्रदर्शन जाहीर करतात, ती माणसे उभे राहून तुझे रक्षण करोत.
Denn du bist müde vor der Menge deiner Anschläge. Laß hertreten und dir helfen die Meister des Himmelslaufs und die Sterngucker, die nach den Monden rechnen, was über dich kommen werde.
14 १४ पाहा, ते धसकटाप्रमाणे होतील; अग्नी त्यांना जाळील; त्यांना स्वतःला ज्वालेच्या हातातून वाचवता येणार नाही; तेथे ती ज्वाला तिच्यासमोर बसण्यास किंवा हा कोळसा त्यांना शेकण्यासाठी योग्य नाही.
Siehe, sie sind wie Stoppeln, die das Feuer verbrennet; sie können ihr Leben nicht erretten vor der Flamme; denn es wird nicht eine Glut sein, dabei man sich wärme, oder ein Feuer, da man um sitzen möge.
15 १५ ज्यांच्यासाठी तू मेहनत केली, तुझ्या तरुणपणापासून तू त्यांच्याबरोबर व्यापार केलास; ते सर्व तुला सोडून जातील. ते प्रत्येकजण आपापल्या मार्गाने भरकटले; तुला वाचवायला कोणीही नाही.
Also sind sie, unter welchen du dich bemühet hast, deine Hantierer von deiner Jugend auf; ein jeglicher wird seines Ganges hie- und daher gehen, und hast keinen Helfer.