< यशया 46 >
1 १ बेल खाली वाकला आहे, नबो झुकला आहे; त्यांच्या मूर्तींचे ओझे जनावरांवर वाहून नेण्यासाठी लादले आहे. या वाहून नेण्याच्या मूर्त्यांचे भारी ओझे थकलेल्या जनावरांवर लादले आहे.
Bel has bowed down, Nebo is stooping, Their idols have been for the beast and for livestock, Your burdens are loaded, a burden to the weary.
2 २ ते एकदम लवत आहेत, गुडघे टेकतात; ते प्रतिमा सांभाळू शकत नाहीत, परंतु ते स्वतःही बंदीवासात जातात.
They have stooped, they have bowed together, They have not been able to deliver the burden, And have gone into captivity themselves.
3 ३ याकोबाच्या घराण्या आणि याकोबाच्या घराण्यातील वाचलेले सर्व तुम्ही, ज्या तुम्हास मी जन्माच्या पूर्वीपासून, गर्भापासून वाहीले आहे. माझे ऐका.
“Listen to Me, O house of Jacob, And all the remnant of Israel, Who are borne from the belly, Who are carried from the womb,
4 ४ तुमच्या म्हातारपणापर्यंतही मी आहे आणि तुमचे केस पिकेपर्यंत मी तुम्हास वाहून नेईन. मी तुम्हास निर्माण केले आणि मी तुम्हास आधार देईल, मी वाहून तुमचे रक्षण करीन.
Even to old age, I [am] He, and to grey hairs I carry, I made, and I bear, indeed, I carry and deliver.
5 ५ तुम्ही माझी तुलना कोणाशी कराल? आणि मला कोणाशी सदृश्य लेखाल, या करता त्यांच्याशी आमची तुलना होईल?
To whom do you liken Me, and make equal? And compare Me, that we may be like?
6 ६ लोक पिशवीतून सोने ओततात आणि चांदी तराजूने तोलतात. ते सोनाराला मोलाने ठेवतात आणि तो त्यांचा देव करतो; ते नतमस्तक होतात आणि उपासना करतात.
They are pouring out gold from a bag, And they weigh silver on the beam, They hire a refiner, and he makes it a god, They fall down, indeed, they bow themselves.
7 ७ ते आपल्या खांद्यांवर उचलून घेतात आणि वाहून नेतात; तो नेऊन त्याच्या जागी ठेवतात आणि तो त्याच्या जागेवर उभा राहतो व त्या जागेतून हालत नाही. ते त्यास आरोळी मारतात, पण तो त्यांना उत्तर देत नाही किंवा कोणालाही त्याच्या संकटातून वाचवत नाही.
They lift him up on the shoulder, They carry him, and cause him to rest in his place, And he stands, he does not move from his place, Indeed, one cries to him, and he does not answer, He does not save him from his adversity.
8 ८ या गोष्टींबद्दल विचार करा; तुम्ही बंडखोरांनो! कधीही दुर्लक्ष करू नका.
Remember this, and show yourselves men, Turn [it] back, O transgressors, to the heart.
9 ९ प्राचीन काळच्या, पूर्वीच्या गोष्टीबद्दल विचार करा, कारण मी देव आहे आणि दुसरा कोणी नाही, मी देव आहे आणि माझ्यासारखा कोणीच नाही.
Remember former things of old, For I [am] Mighty, and there is none else, God—and there is none like Me.
10 १० मी आरंभीच शेवट घोषणा करतो आणि ज्या गोष्टी अजूनपर्यंत घडल्या नाहीत, त्या मी आधीपासून सांगत आलो आहे. मी म्हणतो, “माझ्या योजना सिद्धीस जातील आणि मी आपल्या इच्छेप्रमाणे करीन.”
Declaring the latter end from the beginning, And from of old that which has not been done, Saying, My counsel stands, And all My delight I do.
11 ११ मी पूर्वेककडून एका हिंस्त्र पक्षाला, माझ्या निवडीचा मनुष्य दूरच्या देशातून बोलावतो; होय, मी बोललो आहे; ते मी पूर्णही करीन; माझा उद्देश आहे, मी तोसुध्दा पूर्ण करीन.
Calling a ravenous bird from the east, The man of My counsel from a far land, Indeed, I have spoken, indeed, I bring it in, I have formed [it], indeed, I do it.
12 १२ चांगले करण्यापासून लांब राहणाऱ्या कठोर मनाच्या लोकांनो, तुम्ही माझे ऐका.
Listen to Me, you mighty in heart, Who are far from righteousness.
13 १३ मी आपला न्याय जवळ आणत आहे; तो फार दूर नाही आणि माझे तारण थांबणार नाही; आणि मी सियोनाला तारण देईन आणि माझी शोभा इस्राएलास देईन.
I have brought My righteousness near, It is not far off, And My salvation—it does not linger, And I have given salvation in Zion, For Israel My glory!”