< यशया 44 >
1 १ तर आता याकोबा, माझ्या सेवका आणि इस्राएला, ज्या तुला मी निवडले आहे तो तू माझे ऐक.
我的僕人雅各, 我所揀選的以色列啊, 現在你當聽。
2 २ ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, जो तुझे साहाय्य करतो तो परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा, माझ्या सेवका, आणि यशुरुना, ज्या तुला मी निवडले आहे तो तू भिऊ नको.
造作你,又從你出胎造就你, 並要幫助你的耶和華如此說: 我的僕人雅各, 我所揀選的耶書崙哪, 不要害怕!
3 ३ कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील. मी तुझ्या संततीवर आपला आत्मा आणि तुझ्या मुलांवर आपला आशीर्वाद ओतीन.
因為我要將水澆灌口渴的人, 將河澆灌乾旱之地。 我要將我的靈澆灌你的後裔, 將我的福澆灌你的子孫。
4 ४ पाण्याच्या प्रवाहाजवळ जसे वाळुंज, तसे ते गवतामध्ये उगवते.
他們要發生在草中, 像溪水旁的柳樹。
5 ५ “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबाचे’ नाव आपणास ठेवील; आणि दुसरा आपल्या हातावर परमेश्वरासाठी असे लिहील आणि त्यास इस्राएलाच्या नावाने बोलावतील.”
這個要說:我是屬耶和華的; 那個要以雅各的名自稱; 又一個要親手寫:歸耶和華的, 並自稱為以色列。
6 ६ इस्राएलाचा राजा परमेश्वर, तिचा उद्धारक, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मीच आरंभ आहे आणि मीच शेवट आहे; आणि माझ्याशिवाय कोणी देव नाही.
耶和華-以色列的君, 以色列的救贖主-萬軍之耶和華如此說: 我是首先的,我是末後的; 除我以外再沒有真神。
7 ७ माझ्यासारखा कोण आहे? तर त्याने जाहीर करावे आणि मला स्पष्टीकरण करावे माझे पुरातन लोक स्थापले तेव्हापासून ज्या गोष्टी घडत आहेत व पुढे ज्या घडतील त्या त्यांनी कळवाव्या.
自從我設立古時的民, 誰能像我宣告,並且指明,又為自己陳說呢? 讓他將未來的事和必成的事說明。
8 ८ तुम्ही भिऊ नका किंवा घाबरे होऊ नका. पुरातन काळापासून मी तुला सांगितले आणि जाहीर केले नाही काय? तू माझा साक्षीदार आहे. माझ्याशिवाय तेथे कोणी देव आहे काय? तेथे कोणी दुसरा ‘खडक’ नाही; मला कोणी माहीत नाही.”
你們不要恐懼,也不要害怕。 我豈不是從上古就說明指示你們嗎? 並且你們是我的見證! 除我以外,豈有真神嗎? 誠然沒有磐石,我不知道一個!
9 ९ जे कोरीव मूर्ती घडवतात ते सर्व काहीच नाहीत; ज्या गोष्टीत ते आनंदीत होतात त्या कवडीमोलाच्या आहेत. त्यांचे साक्षी पाहू शकत नाही किंवा काहीच समजत नाही आणि ते लज्जित होतील.
製造雕刻偶像的盡都虛空;他們所喜悅的都無益處;他們的見證無所看見,無所知曉,他們便覺羞愧。
10 १० हे देव कोणी किंवा जी ओतीव मूर्ती क्षुल्लक आहे ती कोणी घडवली आहे?
誰製造神像,鑄造無益的偶像?
11 ११ पाहा, त्याचे सर्व सोबती लज्जित होतील; कारागीर तर केवळ माणसे आहेत. ते सर्व एकत्र जमून निर्णय घेवोत; ते एकत्र भयभीत व लज्जित होतील.
看哪,他的同伴都必羞愧。工匠也不過是人,任他們聚會,任他們站立,都必懼怕,一同羞愧。
12 १२ लोहार त्याच्या हत्याराने, निखाऱ्यांवर काम करून, घडवत असतो. तो त्यास हातोड्याने आकार देतो आणि आपल्या बळकट बाहूने काम करतो. तो भुकेला होतो आणि त्याची शक्ती जाते. तो पाणी पीत नाही आणि क्षीण होतो.
鐵匠把鐵在火炭中燒熱,用鎚打鐵器,用他有力的膀臂錘成;他飢餓而無力,不喝水而發倦。
13 १३ सुतार लाकडाचे माप दोरीने रेष मारून करतो आणि गेरूने आखणी करतो. त्याच्या हत्याराने त्यास आकार देतो आणि कंपासाने त्यावर खुणा करतो. ती पवित्रस्थानात रहावी म्हणून त्यास मनुष्याच्या आकाराची, आकर्षक मनुष्यासारखी घडवून तयार करतो.
木匠拉線,用筆劃出樣子,用鉋子鉋成形狀,用圓尺劃了模樣,仿照人的體態,做成人形,好住在房屋中。
14 १४ तो आपणासाठी गंधसरू तोडतो, किंवा सरू वा अल्लोनची झाडे निवडतो. तो आपणासाठी जंगलात झाडे तोडतो. तो देवदारूचे झाड लावतो पाऊस ते वाढवतो.
他砍伐香柏樹,又取柞樹和橡樹,在樹林中選定了一棵。他栽種松樹,得雨長養。
15 १५ मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय! त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो. मग त्यांपासून देव बनवतो आणि त्याच्या पाया पडतो; तो त्यापासून मूर्ती करतो व त्याच्या पाया पडतो.
這樹,人可用以燒火;他自己取些烤火,又燒着烤餅,而且做神像跪拜,做雕刻的偶像向它叩拜。
16 १६ लाकडाचा एक भाग अग्नीसाठी जाळतो, त्यावर मांसाचा भाग भाजतो. तो खातो आणि तृप्त होतो. तो स्वत: ला ऊबदार ठेवतो आणि म्हणतो, “अहा! मला ऊब आहे, मी अग्नी पाहीला आहे.”
他把一分燒在火中,把一分烤肉吃飽。自己烤火說:「啊哈,我暖和了,我見火了。」
17 १७ शिल्लक राहिलेल्या लाकडाचे तो देव बनवतो, आपली कोरीव प्रतिमा घडवतो; तो त्याच्यापुढे नतमस्तक होतो व पूजा करतो, आणि प्रार्थना करून म्हणतो, तू माझा देव आहेस म्हणून मला वाचव.
他用剩下的做了一神,就是雕刻的偶像。他向這偶像俯伏叩拜,禱告它說:「求你拯救我,因你是我的神。」
18 १८ त्यांना कळत नाही, किंवा त्यांना समजत नाही, कारण त्यांचे डोळे आंधळे आहेत व ते पाहू शकत नाही, आणि त्यांच्या हृदयाला आकलन होत नाहीत.
他們不知道,也不思想;因為耶和華閉住他們的眼,不能看見,塞住他們的心,不能明白。
19 १९ कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात, मी लाकडाचा एक भाग अग्नीत जाळला; होय, मी त्याच्या निखाऱ्यावर भाकर भाजली. मी त्याच्या निखाऱ्यावर मांस भाजले व खाल्ले. आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या लाकडाचा आराधनेसाठी काहीतरी ओंगळ बनवू काय? मी लाकडाच्या ठोकळ्याच्या पाया पडू काय?
誰心裏也不醒悟,也沒有知識,沒有聰明,能說:「我曾拿一分在火中燒了,在炭火上烤過餅;我也烤過肉吃。這剩下的,我豈要做可憎的物嗎?我豈可向木墩子叩拜呢?」
20 २० हे जसे तो जर राख खातो; त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचवू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, “माझ्या हातात धरलेल्या या गोष्टी खोटे देव आहेत.” असे तो म्हणणार नाही.
他以灰為食,心中昏迷,使他偏邪,他不能自救,也不能說:「我右手中豈不是有虛謊嗎?」
21 २१ “हे याकोबा, आणि इस्राएला, यागोष्टीबद्दल विचार कर, कारण तू माझा सेवक आहेस. मी तुला निर्माण केले; तू माझा सेवक आहेस. हे इस्राएला, मला तुझा विसर पडणार नाही.
雅各,以色列啊, 你是我的僕人,要記念這些事。 以色列啊,你是我的僕人, 我造就你必不忘記你。
22 २२ मी तुझी बंडखोरीची कृत्ये, दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे, पुसून टाकली आहेत; माझ्याकडे माघारी ये, कारण मी तुला उद्धारीले आहे.”
我塗抹了你的過犯,像厚雲消散; 我塗抹了你的罪惡,如薄雲滅沒。 你當歸向我,因我救贖了你。
23 २३ अहो, आकाशांनो, गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांनो आरोळी मारा; अहो पर्वतांनो व रान, त्यातली सर्व झाडे गायन करा; कारण परमेश्वराने याकोबास उद्धारीले आहे आणि इस्राएलात आपले प्रताप दाखविले आहे.
諸天哪,應當歌唱, 因為耶和華做成這事。 地的深處啊,應當歡呼; 眾山應當發聲歌唱; 樹林和其中所有的樹都當如此! 因為耶和華救贖了雅各, 並要因以色列榮耀自己。
24 २४ तुझा उद्धारक, ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर, ज्याने सर्वकाही निर्माण केले, जो एकटा आकाश पसरतो, ज्या एकट्याने पृथ्वी तयार केली तो म्हणतो मीच परमेश्वर आहे.
從你出胎,造就你的救贖主-耶和華如此說: 我-耶和華是創造萬物的, 是獨自鋪張諸天、鋪開大地的。 誰與我同在呢?
25 २५ व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो; जो मी ज्ञानाचे ज्ञान मागे फिरवतो आणि त्यांचे सल्ले मूर्खपण करतो.
使說假話的兆頭失效, 使占卜的癲狂, 使智慧人退後, 使他的知識變為愚拙;
26 २६ मी परमेश्वर! जो आपल्या सेवकाची घोषणा परिपूर्ण करतो आणि आपल्या दूतांचा सल्ला सिद्धीस नेणारा, जो यरूशलेमेविषयी म्हणतो की, ती वसविली जाईल आणि यहूदाच्या नगराविषयी म्हणतो की, ती पुन्हा बांधली जातील आणि मी त्याच्या उजाड जागेची उभारणी करीन.
使我僕人的話語立定, 我使者的謀算成就。 論到耶路撒冷說:必有人居住; 論到猶大的城邑說:必被建造, 其中的荒場我也必興起。
27 २७ जो खोल समुद्राला म्हणतो, आटून जा आणि मी तुझे प्रवाह सुकवीन.
對深淵說:你乾了吧! 我也要使你的江河乾涸。
28 २८ जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.
論塞魯士說:他是我的牧人, 必成就我所喜悅的, 必下令建造耶路撒冷, 發命立穩聖殿的根基。