< यशया 41 >

1 अहो द्वीपांनो, तुम्ही माझ्यापुढे शांत राहा; राष्ट्रे त्यांची शक्ती संपादन करोत; ते जवळ येवोत आणि बोलोत; चर्चा आणि वादविवाद करण्यास आपण एकमेकांजवळ येऊ.
Hallgassatok reám, ti szigetek, és a népek vegyenek új erőt, közelgjenek, majd szóljanak, együtt hadd szálljunk perbe!
2 पूर्वेकडून येणाऱ्याला कोणी उठविले? त्यास त्याच्या क्रमाने चांगल्यासेवेसाठी कोणी बोलावले आहे? त्याने राष्ट्रे त्याच्यापुढे दिली आणि तो राजावर अधिकार चालवीन असे केले; त्याने त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या आणि उडवलेल्या धसकटासारखे त्याच्या धनुष्याला दिले.
Ki támasztá fel azt keletről, a kit igazságban hív az ő lábához? A népeket kezébe adja és királyok felett uralkodóvá teszi, kardjával mint port szórja szét, mint repülő polyvát kézíve által!
3 तो त्यांचा पाठलाग करतो आणि ज्या जलद वाटेवर मोठ्या कष्टाने त्यांच्या पावलाचा स्पर्श होतो, ते सुरक्षित पार जातात.
Kergeti őket, békességgel vonul az úton, a melyen lábaival nem járt.
4 ही कृत्ये कोणी शेवटास आणि सिद्धीस नेली? सुरवातीपासून पिढ्यांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वर, जो पहिला आणि जो शेवटल्यासह आहे तोच मी आहे.
Ki tette és vitte végbe ezt? A ki elhívja eleitől fogva a nemzetségeket: én, az Úr, az első és utolsókkal is az vagyok én!
5 द्वीपे पाहतात आणि भितात; पृथ्वीच्या सीमा भीतीने थरथर कापतात; त्या जवळ येतात.
Látták a szigetek és megrémülének, a földnek végei reszkettek, közelegtek és egybegyűltek.
6 प्रत्येकजण त्याच्या शेजाऱ्याला मदत करतो आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला म्हणतो, धीर धर.
Kiki társát segíti, és barátjának ezt mondja: Légy erős!
7 तेव्हा सुतार सोनाराला धीर देतो, आणि तो जो हातोड्याने काम करतो जो ऐरणीसह काम करतो, त्यास धीर देऊन सांधण्याविषयी, ते चांगले आहे. असे म्हणतो मग ते सरकू नये म्हणून तो ते खिळ्यांनी घट्ट बसवतो.”
És bátorítja a mester az ötvöst, és a kalapácscsal simító azt, a ki az ülőt veri; így szól a forrasztásról: jó az, és megerősíti szegekkel, hogy meg ne mozduljon.
8 परंतु तू, इस्राएला, माझ्या सेवका, याकोबा, माझ्या निवडलेल्या, अब्राहाम याच्या संताना,
De te Izráel, én szolgám, Jákób, a kit én elválasztottam, Ábrahámnak, az én barátomnak magva;
9 मी तुला पृथ्वीच्या सीमांपासून परत आणले आणि मी तुला खूप लांबपासूनच्या दूर ठिकाणाहून बोलावले, आणि मी तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस; मी तुला निवडले आहे आणि तुला नाकारले नाही.
Te, a kit én a föld utolsó részéről hoztalak és véghatárairól elhívtalak, és ezt mondám néked: Szolgám vagy te, elválasztottalak és meg nem útállak:
10 १० भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.
Ne félj, mert én veled vagyok; ne csüggedj, mert én vagyok Istened; megerősítelek, sőt megsegítlek, és igazságom jobbjával támogatlak.
11 ११ पाहा, जे सर्व तुझ्यावर रागावले आहेत ते लज्जित व फज्जित होतील; जे तुला विरोध करतात ते काहीच नसल्यासारखे होतील आणि नष्ट होतील.
Ímé, megszégyenülnek és meggyaláztatnak, a kik fölgerjednek ellened, semmivé lesznek és elvesznek, a kik veled perlekednek.
12 १२ जे तुझ्याबरोबर भांडण करतात त्यांचा शोध तू करशील आणि तरी ते तुला सापडणार नाहीत. जे तुझ्याविरूद्ध लढाई करतात ते शून्यवत, काहीच नसल्यासारखे होतील.
Keresed őket és meg nem találod a veled versengőket; megsemmisülnek teljesen, a kik téged háborgatnak.
13 १३ कारण मी, परमेश्वर तुझा देव, तुझा उजवा हात धरतो, मी तुला सांगतो: घाबरू नकोस; मी तुला मदत करीन.
Mivel én vagyok Urad, Istened, a ki jobbkezedet fogom, és a ki ezt mondom néked: Ne félj, én megsegítelek!
14 १४ हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको. मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे.
Ne félj, férgecske Jákób, maroknyi Izráel, én megsegítlek, szól az Úr, a te megváltód, Izráelnek Szentje!
15 १५ पाहा, मी तुला नवीन व दुधारी, मळणीच्या घणाप्रमाणे करीत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील; तू टेकडयांना भुसांप्रमाणे करशील.
Ímé, én teszlek éles, új cséplőhengerré, a melynek két éle van; hegyeket csépelj és zúzz össze, és a halmokat pozdorjává tegyed.
16 १६ तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.
Te szórd, és a szél vigye el őket, és elszéleszsze őket a forgószél, és te örülsz az Úrban, és dicsekedel Izráelnek Szentjében.
17 १७ खिन्न झालेले आणि गरजवंत पाण्याचा शोध घेतात, पण तेथे काहीच नाही आणि त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला उत्तर देईल; मी, इस्राएलाचा देव, त्यांना सोडणार नाही.
A nyomorultak és szegények keresnek vizet, de nincs, nyelvök a szomjúságban elepedt: én, az Úr meghallgatom őket, én, Izráel Istene, nem hagyom el őket.
18 १८ मी उतरणीवरून खाली प्रवाह आणि दऱ्यांमधून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन; मी वाळवंटात पाण्याचे तळे आणि शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
Kopasz hegyeken folyókat nyitok és a rónák közepén forrásokat; a pusztát vizek tavává teszem és az aszú földet vizeknek forrásivá.
19 १९ मी रानात गंधसरू, बाभूळ, व मेंदीचे, जैतून वृक्ष वाढतील. मी वाळवंटात देवदारू, भद्रदारू आणि सरू एकत्र वाढण्यास कारण करील.
A pusztában czédrust, akáczot nevelek és mirtust és olajfát, plántálok a kietlenben cziprust, platánt, sudarczédrussal együtt,
20 २० मी हे यासाठी करीन की, लोकांनी पाहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे, परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे.
Hogy lássák, megtudják, eszökbe vegyék és megértsék mindnyájan, hogy az Úrnak keze mívelte ezt, és Izráel Szentje teremtette ezt!
21 २१ परमेश्वर म्हणतो, आपला वाद पुढे आणा; याकोबाचा राजा म्हणतो, आपल्या मूर्तींसाठी आपले उत्तम वादविवाद पुढे आणा.
Hozzátok ide ügyeteket, szól az Úr, adjátok elő erősségeiteket, így szól Jákób királya.
22 २२ त्यांनी आपले वादविवाद आमच्याकडे आणावे; त्यांनी पुढे यावे आणि काय घडणार आहे ते सांगावे, पूर्वीच्या होणाऱ्या गोष्टी आम्हास सांगा, म्हणजे आम्ही त्यावर काळजीपूर्वक विचार करू आणि त्याची परिपूर्तता कशी होईल ते जाणू. म्हणजे ह्यागोष्टी आम्हास चांगल्या कळतील.
Adják elő és jelentsék meg nékünk, a mik történni fognak; a mik először lesznek, jelentsétek meg, hogy eszünkbe vegyük és megtudjuk végöket, vagy a jövendőket tudassátok velünk!
23 २३ भविष्यात होणाऱ्या गोष्टीविषयी सांगा, म्हणजे जर तुम्ही देव असाल तर आम्हास समजेल; काही तरी चांगले किंवा वाईट करा, म्हणजे आम्ही विस्मीत आणि प्रभावीत होऊ.
Jelentsétek meg, mik lesznek ezután, hogy megtudjuk, hogy ti Istenek vagytok; vagy hát míveljetek jót vagy gonoszt, hogy mérkőzzünk és majd lássuk együtt!
24 २४ पाहा, तुमच्या मूर्ती आणि तुमचे कृत्ये काहीच नाहीत; जो कोणी तुम्हास निवडतो तो तिरस्करणीय आहे.
Ímé, ti semmiből valók vagytok, és dolgotok is semmiből való; útálat az, a ki titeket szeret.
25 २५ “मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो, आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.”
Feltámasztám északról, és eljött napkelet felől; hirdeti nevemet, és tapodja a fejedelmeket, mint az agyagot, és mint a fazekas a sarat tapossa.
26 २६ आम्हास कळावे, म्हणून पहिल्यापासून कोणी जाहीर केले? आणि त्यावेळेपूर्वी आम्ही असे म्हणावे, तो योग्य आहे? खरोखर त्यांनी काहीच सांगितले नाही, होय! तू सांगितलेले कोणीच ऐकले नाही.
Ki jelenté meg ezt eleitől fogva, hogy megtudnók? vagy régen, hogy ezt mondanók: Igaz? De nem jelenté meg, de nem tudatá senki, nem hallá szavatokat senki sem!
27 २७ मी सियोनेला प्रथम म्हणालो, पाहा, ते येथे आहेत; मी यरूशलेमेकडे अग्रदूत पाठविला आहे.
Sionnak először én hirdetém, ímé itt vannak a tanúk, és örömmondót adtam Jeruzsálemnek.
28 २८ जेव्हा मी पाहिले, तेथे कोणी नाही, मी त्यांना विचारले असता, एका शब्दाने तरी उत्तर देऊ शकेल असा त्यांच्यामध्ये कोणीही नाही, एक चांगला सल्ला देऊ शकेल असा कोणी नाही.
És néztem és nem volt senki, ezek közül nem volt tanácsadó, hogy megkérdezzem őket és feleljenek nékem.
29 २९ पाहा, त्यातले सर्व काहीच नाहीत, आणि त्यांची कृत्ये काहीच नाहीत; त्यांच्या धातूच्या ओतीव प्रतिमा वारा आणि शून्यवतच आहेत.
Ímé, mindnyájan semmik ők, semmiség cselekedetök, szél és hiábavalóság képeik.

< यशया 41 >