< यशया 4 >

1 त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला ताब्यात घेऊन म्हणतील आमचे स्वतःचेच अन्न आम्ही खाऊ, आमचे स्वतःचेच कपडे आम्ही घालू परंतु आमची लज्जा दूर करण्याकरिता आम्हास तुझे नाव घेऊ दे.
那一日,七個女人要抓住一個男人說:「我們吃自己的食糧,穿自己的衣服,只要你容許我們歸於你名下,除去我們的恥辱。」
2 त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल.
那一日,由上主所發出的苗芽,必成為以色列遺民的光輝與榮耀;地上的果實必成為他們的誇耀與光彩。
3 यानंतर जो कोणी सियोनात राहील, जो कोणी यरूशलेमेत बाकी राहील, प्रत्येक जण जो कोणी येरुशलेमेत जिवंत असा गणला जाईल त्यास पवित्र असे म्हणतील,
凡留在熙雍的,遺在耶路撒冷的,即凡錄在耶路撒冷的生命冊上的,都必將稱為聖者。
4 ज्या वेळेस परमेश्वर सियोनेच्या कन्यांची अशुद्धता दूर करेल, आणि यरूशलेमेच्या गर्भातील रक्ताचे डाग त्याच्या न्यायाच्या आत्म्याने व ज्वलंत अग्नीच्या आत्म्याने स्वच्छ करील तेव्हा हे होईल.
當吾主以懲治的神和毀滅的神,洗淨熙雍女子的污穢,滌除耶路撒冷中間的血漬時,
5 नंतर परमेश्वर सियोन पर्वताच्या संपूर्ण जागेवर व तिच्या मेळ्यांच्या जागेवर दिवसा ढग व धूर, आणि रात्री जळत्या अग्नीच्या ज्वालेचा प्रकाश, परमेश्वराच्या वैभवाचे छत, निर्माण करील.
上主將顯現在熙雍山整個地盤與其集會之上:白日藉著雲煙,黑夜藉光亮的火燄;因為在一切之上,有上主的榮耀,有如天蓋和帳棚,
6 दिवसा उष्णतेपासून आश्रयासाठी सावली व आसरा, आणि वादळ व पाऊस यापासून आच्छादन असे ते होईल.
白日作蔭影以免炎暑,又可作庇護,以避狂風暴雨。

< यशया 4 >