< यशया 39 >

1 त्या वेळेला, बलदानाचा मुलगा मरोदख-बलदान, बाबेलचा राजा याने हिज्कीयाला पत्रे आणि भेटी पाठवल्या; कारण त्याने हिज्किया आजारी असल्याचे आणि बरा झाल्याचे ऐकले होते.
فِي ذَلِكَ ٱلزَّمَانِ أَرْسَلَ مَرُودَخُ بَلَادَانَ بْنُ بَلَادَانَ مَلِكُ بَابِلَ رَسَائِلَ وَهَدِيَّةً إِلَى حَزَقِيَّا، لِأَنَّهُ سَمِعَ أَنَّهُ مَرِضَ ثُمَّ صَحَّ.١
2 या गोष्टीमुळे हिज्कीयाला आनंद झाला; त्याने आपल्या भांडारातील मोल्यवान वस्तू चांदी, सोने, मसाले, अमूल्य तेल आणि त्याचे शस्त्रगार आणि त्याच्या भांडारात हे सर्व सापडले ते सर्व दाखवले. हिज्कीयाने त्यांना दाखविले नाही असे त्याच्या घरात किंवा त्याच्या सर्व राज्यात काहीच राहिले नव्हते.
فَفَرِحَ بِهِمْ حَزَقِيَّا وَأَرَاهُمْ بَيْتَ ذَخَائِرِهِ: ٱلْفِضَّةَ وَٱلذَّهَبَ وَٱلْأَطْيَابَ وَٱلزَّيْتَ ٱلطَّيِّبَ، وَكُلَّ بَيْتِ أَسْلِحَتِهِ وَكُلَّ مَا وُجِدَ فِي خَزَائِنِهِ. لَمْ يَكُنْ شَيْءٌ لَمْ يُرِهِمْ إِيَّاهُ حَزَقِيَّا فِي بَيْتِهِ وَفِي كُلِّ مُلْكِهِ.٢
3 मग यशया संदेष्टा हिज्कीया राजाकडे आला आणि त्यास विचारले, “ही माणसे तुला काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया म्हणाला, “ती दूरच्या बाबेल देशातून माझ्याकडे आली होती.”
فَجَاءَ إِشَعْيَاءُ ٱلنَّبِيُّ إِلَى ٱلْمَلِكِ حَزَقِيَّا وَقَالَ لَهُ: «مَاذَا قَالَ هَؤُلَاءِ ٱلرِّجَالُ، وَمِنْ أَيْنَ جَاءُوا إِلَيْكَ؟» فَقَالَ حَزَقِيَّا: «جَاءُوا إِلَيَّ مِنْ أَرْضٍ بَعِيدَةٍ، مِنْ بَابِلَ».٣
4 यशयाने विचारले, “तुझ्या घरात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीयाने उत्तर दिले, “माझ्या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. मी त्यांना माझ्या सर्व मोलवान वस्तू दाखविल्या नाहीत असे काहीच नाही.”
فَقَالَ: «مَاذَا رَأَوْا فِي بَيْتِكَ؟» فَقَالَ حَزَقِيَّا: «رَأَوْا كُلَّ مَا فِي بَيْتِي. لَيْسَ فِي خَزَائِنِي شَيْءٌ لَمْ أُرِهِمْ إِيَّاهُ».٤
5 मग यशया हिज्कीयाला म्हणाला, सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक
فَقَالَ إِشَعْيَاءُ لِحَزَقِيَّا: «ٱسْمَعْ قَوْلَ رَبِّ ٱلْجُنُودِ:٥
6 पाहा, असे दिवस येणार आहेत की, जेव्हा तुझ्या महालातील प्रत्येक गोष्ट, ज्या तुझ्या पूर्वजांनी आतापर्यंत जमविले आहे ते सर्व बाबेलाला घेऊन जातील. काहीच उरणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
هُوَذَا تَأْتِي أَيَّامٌ يُحْمَلُ فِيهَا كُلُّ مَا فِي بَيْتِكَ، وَمَا خَزَنَهُ آبَاؤُكَ إِلَى هَذَا ٱلْيَوْمِ، إِلَى بَابِلَ. لَا يُتْرَكُ شَيْءٌ، يَقُولُ ٱلرَّبُّ.٦
7 आणि तुझ्यापासून जी मुले जन्मतील, ज्यांचा तू स्वतः पिता असशील त्यांना घेऊन जातील आणि बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले षंढ म्हणून राहतील.
وَمِنْ بَنِيكَ ٱلَّذِينَ يَخْرُجُونَ مِنْكَ ٱلَّذِينَ تَلِدُهُمْ، يَأْخُذُونَ، فَيَكُونُونَ خِصْيَانًا فِي قَصْرِ مَلِكِ بَابِلَ».٧
8 मग हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन तू बोललास ते विश्वासयोग्य आहे.” कारण त्याने विचार केला, माझ्या दिवसात तेथे शांतता आणि स्थिरता राहील.
فَقَالَ حَزَقِيَّا لِإِشَعْيَاءَ: «جَيِّدٌ هُوَ قَوْلُ ٱلرَّبِّ ٱلَّذِي تَكَلَّمْتَ بِهِ». وَقَالَ: «فَإِنَّهُ يَكُونُ سَلَامٌ وَأَمَانٌ فِي أَيَّامِي».٨

< यशया 39 >