< यशया 36 >
1 १ हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर हल्ला केला, आणि त्यांचा ताबा घेतला.
希西家王十四年,亚述王西拿基立上来攻击犹大的一切坚固城,将城攻取。
2 २ नंतर अश्शूरच्या राजाने रब-शाके याला आपल्या मोठ्या सैन्यासह लाखीशाहून यरूशलेमेमध्ये हिज्कीया राजाकडे पाठवले, तो वरच्या तळ्याच्या नळाजवळ परटाच्या शेताच्या रस्त्यावर येऊन पोहचला, आणि उभा राहीला.
亚述王从拉吉差遣拉伯沙基率领大军往耶路撒冷,到希西家王那里去。他就站在上池的水沟旁,在漂布地的大路上。
3 ३ मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम, घरावरचा कारभारी व शेबना चिटणीस व आसाफचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे त्याच्याकडे भेटण्यास गेले.
于是希勒家的儿子家宰以利亚敬,并书记舍伯那和亚萨的儿子史官约亚,出来见拉伯沙基。
4 ४ रब-शाके त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीयाला सांगा, अश्शूरचा महान राजा म्हणतो, तुझ्या विश्वासाचा स्त्रोत काय आहे?
拉伯沙基对他们说:“你们去告诉希西家说,亚述大王如此说:‘你所倚靠的有什么可仗赖的呢?
5 ५ तेथे युद्धासाठी मसलत आणि सामर्थ्य आहे, असे सांगून, तू फक्त निरर्थक शब्द बोलतो, आता तू कोणावर विश्वास ठेवतो? माझ्याविरूद्ध बंड करण्यासाठी तुला कोण धैर्य देतो?
你说,有打仗的计谋和能力,我看不过是虚话。你到底倚靠谁才背叛我呢?
6 ६ पाहा, तू या मिसराच्या ठेचलेल्या बोरूच्या चालण्याच्या काठीवर विश्वास ठेवतोस, पण जर मनुष्य आपल्या हातातील काठीवर टेकतो, तर तो भेदून जाईल; जे कोणी एक मिसराचा राजा फारो याच्यावर भरवसा ठेवतात, तो त्यांना तसाच आहे.”
看哪,你所倚靠的埃及是那压伤的苇杖,人若靠这杖,就必刺透他的手。埃及王法老向一切倚靠他的人也是这样。
7 ७ पण जर तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्यांवर भरवसा ठेवतो, तर हिज्कीयाने ज्यांची उच्चस्थाने व वेद्या पूजेसाठी काढून टाकल्या आणि यहूदाला आणि यरूशलेमेला म्हटले, “तुम्ही यरूशलेमेत याच वेदीपुढे उपासना करा, तोच तो आहे की नाही?”
你若对我说:我们倚靠耶和华—我们的 神。希西家岂不是将 神的邱坛和祭坛废去,且对犹大和耶路撒冷的人说:你们当在这坛前敬拜吗?
8 ८ तर आता मी माझा धनी अश्शूरचा राजा याच्यापासून एक चांगला प्रस्ताव तुझ्याशी करण्याची इच्छा आहे, मी तुला दोन हजार घोडे देईन, जर तू त्यांच्यासाठी घोडेस्वार शोधण्यास समर्थ असलास तर.
现在你把当头给我主亚述王,我给你二千匹马,看你这一面骑马的人够不够。
9 ९ माझ्या धन्याच्या कनिष्ठ सेवकांतील एक नायकाचा तरी प्रतिकार तू कसा करू शकशील? तुम्ही रथ व घोडेस्वारांसाठी तुमचा भरवसा मिसरावर ठेवता?
若不然,怎能打败我主臣仆中最小的军长呢?你竟倚靠埃及的战车马兵吗?
10 १० तर आता, मी येथपर्यंत प्रवास करून आलो, ते या देशाविरूद्ध लढण्यास आणि नाश करण्यास, ते परमेश्वराशिवाय काय? परमेश्वर मला म्हणाला, या देशावर हल्ला कर आणि त्यांचा नाश कर.
现在我上来攻击毁灭这地,岂没有耶和华的意思吗?耶和华吩咐我说,你上去攻击毁灭这地吧!’”
11 ११ मग हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम आणि शेबना व यवाह हे रब-शाकेला म्हणाले, “कृपया आपल्या सेवकाशी अरामी भाषेत बोल, कारण ती आम्हास समजते. कोटावरील लोकांस तुमचे बोलणे समजेल म्हणून तुम्ही आमच्याशी यहूदी भाषेत बोलू नका.”
以利亚敬、舍伯那、约亚对拉伯沙基说:“求你用亚兰言语和仆人说话,因为我们懂得;不要用犹大言语和我们说话,达到城上百姓的耳中。”
12 १२ पण रब-शाके म्हणाला “माझ्या धन्याने, मला तुझ्या धन्याशी व तुजशी हे शब्द बोलण्यास मला पाठवले आहे काय? कोटावर बसलेल्या मनुष्यांनी तुम्हाबरोबर आपली स्वतःची विष्ठा खावी आणि आपल्या स्वतःचे मूत्र प्यावे हे सांगण्यासाठी मला पाठवले नाही काय?”
拉伯沙基说:“我主差遣我来,岂是单对你和你的主说这些话吗?不也是对这些坐在城上、要与你们一同吃自己粪喝自己尿的人说吗?”
13 १३ नंतर रब-शाके उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहूदी भाषेत म्हणाला, “महान राजा, अश्शूरचा राजा याचे शब्द ऐका.”
于是,拉伯沙基站着,用犹大言语大声喊着说:“你们当听亚述大王的话。
14 १४ राजा म्हणाला, “हिज्कीयास तुम्हास भुरळ घालू देऊ नका; कारण तो तुमचे रक्षण करण्यास समर्थ नाही.
王如此说:‘你们不要被希西家欺哄了,因他不能拯救你们。
15 १५ परमेश्वर आम्हास खात्रीने सोडवील; हे नगर अश्शूर राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे बोलून हिज्कीयाने तुम्हास परमेश्वरावर भरवसा ठेवायला लावू नये.”
也不要听希西家使你们倚靠耶和华说:耶和华必要拯救我们,这城必不交在亚述王的手中。
16 १६ हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा असे म्हणतोः माझ्याशी शांतीचा करार करा आणि माझ्याकडे बाहेर या, नंतर प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलाचे व आपापल्या अंजिराचे फळ खा आणि प्रत्येकजण आपल्या स्वत: च्या टाकीतले पाणी प्या.
不要听希西家的话,因亚述王如此说:你们要与我和好。出来投降我,各人就可以吃自己葡萄树和无花果树的果子,喝自己井里的水。
17 १७ मी येईन आणि जो देश तुमच्या स्वतःच्या देशासारखा आहे, धान्याचा व नव्या द्राक्षरसाचा देश, भाकरीचा व द्राक्षमळ्याचा देश, त्यामध्ये मी तुम्हास नेईपर्यंत तुम्ही असे करा.
等我来领你们到一个地方,与你们本地一样,就是有五谷和新酒之地,有粮食和葡萄园之地。
18 १८ परमेश्वर आपल्याला सोडवील असे सांगून हिज्कीयाने तुम्हास चुकीचा मार्ग दाखवू नये. अश्शूर राज्याच्या सामर्थ्यापासून कोणत्या राष्ट्रातील देवाने आपल्या लोकांस सोडवीले आहे काय?
你们要谨防,恐怕希西家劝导你们说:耶和华必拯救我们。列国的神有哪一个救他本国脱离亚述王的手呢?
19 १९ हमाथ आणि अर्पद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोनाला माझ्या सामर्थ्यापासून सोडविले काय?
哈马和亚珥拔的神在哪里呢?西法瓦音的神在哪里呢?他们曾救撒马利亚脱离我的手吗?
20 २० ज्यांनी आपला देश माझ्या सामर्थ्यापासून सोडवला आहे, असे या देशांच्या सर्व देवांपैकी कोण आहेत, तर परमेश्वर माझ्या हातून यरूशलेम सोडवील काय?
这些国的神有谁曾救自己的国脱离我的手呢?难道耶和华能救耶路撒冷脱离我的手吗?’”
21 २१ पण लोक शांत राहीले, आणि त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यास उत्तर देऊ नका अशी राजाची आज्ञा होती.
百姓静默不言,并不回答一句,因为王曾吩咐说:“不要回答他。”
22 २२ नंतर हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम जो घरावरचा कारभारी होता, शेबना चिटणीस व आसाफाचा मुलगा यवाह इतिहास लेखक हे आपले कपडे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्यास रब-शाकेचे शब्द सांगितले.
当下希勒家的儿子家宰以利亚敬和书记舍伯那,并亚萨的儿子史官约亚,都撕裂衣服,来到希西家那里,将拉伯沙基的话告诉了他。