< यशया 35 >
1 १ निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल.
O deserto e o lugar seco terão prazer disto; e o lugar desabitado se alegrará e florescerá como a rosa.
2 २ ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.
Abundantemente florescerá, e também se encherá de alegria e júbilo; a glória do Líbano lhe será dada, a honra do Carmelo e de Sarom; eles verão a glória do SENHOR, a honra de nosso Deus.
3 ३ दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.
Fortalecei as mãos fracas, e firmai os joelhos que tremem.
4 ४ जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
Dizei aos perturbados de coração: Fortalecei-vos! Não temais! Eis que nosso Deus virá para a vingança, aos pagamentos de Deus; ele virá e vos salvará.
5 ५ मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.
Então os olhos dos cegos serão abertos, e os ouvidos dos surdos se abrirão.
6 ६ नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील.
Então os aleijados saltarão como cervos, e a língua dos mudos falará alegremente; porque águas arrebentarão no deserto, e ribeiros no lugar desabitado.
7 ७ मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल.
E a terra seca se tornará em lagoas, e a terra sedenta em mananciais de águas; nas habitações em que repousavam os chacais, haverá erva com canas e juncos.
8 ८ तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही.
E ali haverá uma estrada, e um caminho que se chamará caminho da santidade; o impuro não passará por ele, mas será para os [que podem] andar pelo caminho; até mesmo os tolos [que por ele passarem] não errarão.
9 ९ तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील.
Ali não haverá leão, nem animal selvagem subirá a ele, nem se achará nele; porém os redimidos [por ele] andarão.
10 १० परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु: ख आणि शोक दूर पळून जातील.
E os resgatados do SENHOR voltarão, e virão a Sião com júbilo, e alegria eterna haverá sobre suas cabeças; eles terão prazer e alegria, e a tristeza e o gemido [deles] fugirão.