< यशया 35 >

1 निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि कमळाप्रमाने बहरेल.
荒野と、かわいた地とは楽しみ、さばくは喜びて花咲き、さふらんのように、
2 ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील; त्यास लबानोनाचे वैभव, कर्मेल व शारोन याचे सौदर्य दिले जाईल; ते परमेश्वराचे गौरव, आमच्या देवाचे सौदर्य पाहतील.
さかんに花咲き、かつ喜び楽しみ、かつ歌う。これにレバノンの栄えが与えられ、カルメルおよびシャロンの麗しさが与えられる。彼らは主の栄光を見、われわれの神の麗しさを見る。
3 दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.
あなたがたは弱った手を強くし、よろめくひざを健やかにせよ。
4 जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;” पाहा, तुमचा देव अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात, देवाच्या भरपाईसह येईल. तो येईल आणि तुमचा उद्धार करील.
心おののく者に言え、「強くあれ、恐れてはならない。見よ、あなたがたの神は報復をもって臨み、神の報いをもってこられる。神は来て、あなたがたを救われる」と。
5 मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.
その時、目しいの目は開かれ、耳しいの耳はあけられる。
6 नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल. अराबाहून पाण्याचे झरे आणि निर्जन प्रदेशातून पाण्याचे प्रवाह वाहतील.
その時、足なえは、しかのように飛び走り、おしの舌は喜び歌う。それは荒野に水がわきいで、さばくに川が流れるからである。
7 मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल; कोल्हे राहण्याच्या जागी जेथे ते एकदा निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे ह्यांसहीत गवत उगवेल.
焼けた砂は池となり、かわいた地は水の源となり、山犬の伏したすみかは、葦、よしの茂りあう所となる。
8 तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील. अशुद्ध त्यामध्ये चालणार नाहीत. परंतु जे त्याच्यावर चालतील तो त्यांच्यासाठी आहे, कोणी मूर्ख त्याच्यावरून जाणार नाही.
そこに大路があり、その道は聖なる道ととなえられる。汚れた者はこれを通り過ぎることはできない、愚かなる者はそこに迷い入ることはない。
9 तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत, परंतु तेथे उद्धारलेले चालतील.
そこには、ししはおらず、飢えた獣も、その道にのぼることはなく、その所でこれに会うことはない。ただ、あがなわれた者のみ、そこを歩む。
10 १० परमेश्वराने खंडून घेतलेले माघारी येतील आणि ते सियोनात गायन करीत आणि त्यांच्या मस्तकावर सदासर्वकाळ असणारा आनंद राहील; आनंदाने व हर्षांने ते भरून जातील; दु: ख आणि शोक दूर पळून जातील.
主にあがなわれた者は帰ってきて、その頭に、とこしえの喜びをいただき、歌うたいつつ、シオンに来る。彼らは楽しみと喜びとを得、悲しみと嘆きとは逃げ去る。

< यशया 35 >