< यशया 34 >
1 १ तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.
列国啊,要近前来听! 众民哪,要侧耳而听! 地和其上所充满的, 世界和其中一切所出的都应当听!
2 २ कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे; त्याने त्यांचा समूळ नाश केला आहे. त्याने त्यांचा संहार करण्यासाठी त्यांच्या हवाली केले आहे.
因为耶和华向万国发忿恨, 向他们的全军发烈怒, 将他们灭尽,交出他们受杀戮。
3 ३ त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल, आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल.
被杀的必然抛弃, 尸首臭气上腾; 诸山被他们的血融化。
4 ४ आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील, आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील, जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो.
天上的万象都要消没; 天被卷起,好像书卷。 其上的万象要残败, 像葡萄树的叶子残败, 又像无花果树的叶子残败一样。
5 ५ ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
因为我的刀在天上已经喝足; 这刀必临到以东和我所咒诅的民, 要施行审判。
6 ६ परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे, ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे. कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे.
耶和华的刀满了血, 用脂油和羊羔、公山羊的血, 并公绵羊腰子的脂油滋润的; 因为耶和华在波斯拉有献祭的事, 在以东地大行杀戮。
7 ७ रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल. त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल.
野牛、牛犊,和公牛要一同下来。 他们的地喝醉了血; 他们的尘土因脂油肥润。
8 ८ कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.
因耶和华有报仇之日, 为锡安的争辩有报应之年。
9 ९ अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल, आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल.
以东的河水要变为石油, 尘埃要变为硫磺; 地土成为烧着的石油,
10 १० तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.
昼夜总不熄灭, 烟气永远上腾, 必世世代代成为荒废, 永永远远无人经过。
11 ११ पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील. तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील.
鹈鹕、箭猪却要得为业; 猫头鹰、乌鸦要住在其间。 耶和华必将空虚的准绳, 混沌的线铊,拉在其上。
12 १२ तिच्या सरदारांना राज्यावर बोलावतील पण तेथे त्यातले कोण असणार नाहीत, आणि तिचे सर्व अधिपती नाहीसे होतील.
以东人要召贵胄来治国; 那里却无一个, 首领也都归于无有。
13 १३ तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल.
以东的宫殿要长荆棘; 保障要长蒺藜和刺草; 要作野狗的住处, 鸵鸟的居所。
14 १४ हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल.
旷野的走兽要和豺狼相遇; 野山羊要与伴偶对叫。 夜间的怪物必在那里栖身, 自找安歇之处。
15 १५ तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील. होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील.
箭蛇要在那里做窝, 下蛋,抱蛋,生子, 聚子在其影下; 鹞鹰各与伴偶聚集在那里。
16 १६ परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही. कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे.
你们要查考宣读耶和华的书。 这都无一缺少, 无一没有伴偶; 因为我的口已经吩咐, 他的灵将它们聚集。
17 १७ त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे. ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील.
他也为它们拈阄, 又亲手用准绳给它们分地; 它们必永得为业, 世世代代住在其间。