< यशया 34 >

1 तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.
萬民,你們前來聆聽!列邦,你們側耳靜聽!大地與充塞其中的一切,世界與其所有的產物,都要諦聽!
2 कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे; त्याने त्यांचा समूळ नाश केला आहे. त्याने त्यांचा संहार करण्यासाठी त्यांच्या हवाली केले आहे.
因為上主向萬民生了氣,對他們的一切軍隊發了怒,他注定了他們的劫數,命定了他們遭受屠殺。
3 त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल, आणि त्यांच्या रक्ताने पर्वत भिजून चिंब होईल.
他們的被殺者被棄於外,他們屍體的腥臭浮浮上騰,他們的血溶化了諸山。
4 आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील, आणि एखाद्या गुंडाळीप्रमाणे आकाश गुंडाळले जाईल; आणि सर्व तारे लुप्त होतील, जसे द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, जसा अंजिराच्या झाडाचा सुकलेला पाला गळून पडतो.
天上的萬象必將解體,諸天要如卷軸般捲起;天上的星辰必將隕墜,有如葡萄葉的凋零,有如無花果葉的萎謝。
5 ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.
當上主的刀在天上痛飲之後,看哪!它將若在厄東,落在他所毀滅的百姓身上,實行懲罰。
6 परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे, ती कोकऱ्यांच्या आणि बोकड्यांच्या रक्ताने माखली असून मेंढ्याच्या गुर्द्यांच्या चरबीने पुष्ट झाली आहे. कारण परमेश्वर बस्रा नगरात यज्ञबली व अदोमाच्या भूमीत मोठा संहार करणार आहे.
上主的刀劍染滿了血,漬滿了脂油,就是羔羊和羚羊的血,以及公羊腎臟的脂油:因為上主在波責辣舉行了一番祭祀,在厄東地方施行了一場屠殺。
7 रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल. त्यांची भूमी रक्त पिईल व तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल.
野牛與肥畜必同墮死,牛犢與公牛必同跌斃。他們的地區浸滿了血,他們的地面漬染了脂油。
8 कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.
因為這是上主復讎的日子,是為報復熙雍敵人的一年。
9 अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल, आणि त्याची भूमी जळत्या डांबराप्रमाणे होईल.
她的河水將變為瀝青,她的土壤將變為硫磺:大地成了燃灼的瀝青,
10 १० तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल. ती पिढ्यानपिढ्यापासून ओसाड पडेल; सर्वकाळपर्यंत कोणी तिच्यावरून चालणार नाही.
晝夜燃燒不息,濃煙永遠上升;世世代代成為荒野,永久無人經過此地。
11 ११ पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील. तो तिच्यावर अस्ताव्यस्ततेची दोरी ताणील आणि ओसाडीचा ओळंबा लावील.
鵜鶘和刺蝟據守其地,鴞鴟和烏鴉棲於其間;上主將以破壞性的繩墨和毀滅性的線錘測量那地。
12 १२ तिच्या सरदारांना राज्यावर बोलावतील पण तेथे त्यातले कोण असणार नाहीत, आणि तिचे सर्व अधिपती नाहीसे होतील.
顯貴中沒有一個在那裏能夠建國,她所有的王侯都歸於烏有。
13 १३ तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील. ती कोल्ह्यांचे वस्तीस्थान, शहामृगाचे अंगण होईल.
她的宮闕將生滿荊棘,她的保壘將繁生蒺藜和薊草;她將成為豺狼的洞穴,鴕鳥的苑囿。
14 १४ हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील. निशाचर प्राणीही तेथे राहतील व त्यास विश्रांतीचे स्थान मिळेल.
野貓在那裏將與野狗相會,野羊將呼叫牠的同類;夜間的魑魅將在那裏休憩,尋得一個安息的處所。
15 १५ तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील. होय, घार आपआपल्या जोडीदारांसोबत जमा होतील.
箭頭蛇將在那裏築穴、下蛋、伏卵,並加以孵化;鷙鳥群集其間,雌雄相配。
16 १६ परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही. कोणी एक जोडप्याविना असणार नाही; कारण माझ्याच मुखाने हे आज्ञापिले आहे, आणि त्याच्या आत्म्याने त्यांना एकवट केले आहे.
你們可查看上主的書,且閱讀一下,牠們中一種也不會缺少,沒有一個沒有配偶的,因為上主的口已這樣命定,他的神集合了牠們。
17 १७ त्यांच्या जागेसाठी त्यांनी चिठ्ठी टाकली आहे, आणि त्याने आपल्या हाताने ती भूमी दोरीने मापून त्यांना वाटून दिली आहे. ते त्यांचे सर्वकाळचे वतनदार होतील; ते पिढ्यानपिढ्या त्यामध्ये राहतील.
上主親自要為牠們抽籤,他親手用繩索將為牠們分開這地;牠們將永久佔有這地,世世代代住在那裏。

< यशया 34 >