< यशया 33 >
1 १ अरे विध्वंसका, जो तुझा नाश झाला नाही! अरे विश्वासघातक्या, जो तुझा त्यांनी विश्वासघात केला नाही, तुला धिक्कार असो! जेव्हा तू विध्वंस करणे थांबवशील तेव्हा तू नाश पावशील, जेव्हा तू विश्वासघातकीपणा सोडशील, तेव्हा ते तुझा विश्वासघात करतील.
禍哉!你這毀滅人的, 自己倒不被毀滅; 行事詭詐的, 人倒不以詭詐待你。 你毀滅罷休了, 自己必被毀滅; 你行完了詭詐, 人必以詭詐待你。
2 २ हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी वाट पाहतो; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आमच्या संकटकाळी आमचा उद्धारक हो.
耶和華啊,求你施恩於我們; 我們等候你。 求你每早晨作我們的膀臂, 遭難的時候為我們的拯救。
3 ३ मोठा आवाज ऐकताच लोक पळून गेले; जेव्हा तू उठलास, राष्ट्रांची पांगापांग झाली.
喧嚷的響聲一發,眾民奔逃; 你一興起,列國四散。
4 ४ टोळ नाश करतात त्याप्रमाणे तुमची लूट गोळा करतील, जसे टोळ धाड टाकतात तसे मनुष्ये तिजवर धाड टाकतील.
你們所擄的必被斂盡, 好像螞蚱吃盡禾稼。 人要蹦在其上,好像蝗蟲一樣。
5 ५ परमेश्वर उंचावला आहे. तो उच्चस्थानी राहतो. त्याने सियोनेस प्रामाणिकपणा व चांगुलपणा यांनी भरले आहे.
耶和華被尊崇,因他居在高處; 他以公平公義充滿錫安。
6 ६ तुझ्याकाळी तो स्थिरता देईल, तारण, सुज्ञता व ज्ञान, यांची विपुलता देईल, परमेश्वराचे भय त्याचा धनसंग्रह होईल.
你一生一世必得安穩- 有豐盛的救恩, 並智慧和知識; 你以敬畏耶和華為至寶。
7 ७ पाहा त्याचे वीर बाहेर रस्त्यात रडत आहेत; शांतीचा संदेश आणणारे शांतीच्या आशेने स्फुंदून जोराने रडत आहेत.
看哪,他們的豪傑在外頭哀號; 求和的使臣痛痛哭泣。
8 ८ राजमार्ग ओसाड पडले आहेत; तेथे कोणीही प्रवासी नाही. त्याने निर्बंध मोडला आहे, साक्षीदारांसह तुच्छ लेखले, आणि नगरांचा अनादर केला.
大路荒涼,行人止息; 敵人背約, 藐視城邑, 不顧人民。
9 ९ भूमी शोक करते आणि ती शुष्क झाली आहे; लबानोन निस्तेज झाला आहे आणि शुष्क झाला आहे; शारोन सपाट रानाप्रमाणे झाला आहे; आणि बाशान व कर्मेल आपली पाने गाळीत आहेत.
地上悲哀衰殘; 黎巴嫩羞愧枯乾; 沙崙像曠野; 巴珊和迦密的樹林凋殘。
10 १० परमेश्वर म्हणतो आता मी उठेन, आता मी उठून उभा राहिल, आता मी उंचावला जाईन.
耶和華說: 現在我要起來; 我要興起; 我要勃然而興。
11 ११ तुम्ही भुसकटाची गर्भधारणा कराल व धसकट प्रसवाल, तुमचा श्वास अग्नी आहे तो तुम्हास खाऊन टाकील.
你們要懷的是糠詷, 要生的是碎稭; 你們的氣就是吞滅自己的火。
12 १२ लोक भाजलेल्या चुन्याप्रमाणे भस्म होतील, जसे काटेरी झुडपे तोडून व अग्नीत टाकतात.
列邦必像已燒的石灰, 像已割的荊棘在火中焚燒。
13 १३ जे तुम्ही फार दूर आहात, मी काय केले आहे ते ऐका; आणि जे तुम्ही जवळ आहात, ते तुम्ही माझे सामर्थ्य जाणून घ्या.
你們遠方的人當聽我所行的; 你們近處的人當承認我的大能。
14 १४ सियोनेतील पापी घाबरले आहेत. अधर्म्यास थरकाप सुटला आहे. आमच्यातला कोण जाळून टाकणाऱ्या अग्नीत वस्ती करील?
錫安中的罪人都懼怕; 不敬虔的人被戰兢抓住。 我們中間誰能與吞滅的火同住? 我們中間誰能與永火同住呢?
15 १५ तो, नीतीने वागतो व सत्य बोलतो, जुलूमजबरी करून मिळणारा लाभ तुच्छ लेखतो; जो लाच नाकारतो, घातपातांचा कट करीत नाही व दुष्कृत्याकडे पाहत नाही.
行事公義、說話正直、 憎惡欺壓的財利、 擺手不受賄賂、 塞耳不聽流血的話, 閉眼不看邪惡事的,
16 १६ तो आपले घर उच्च स्थळी करील; त्याचे रक्षणाचे स्थान पाषाणाच्या तटबंदीचे दुर्ग असे होतील; त्यांना अन्न व पाण्याचा मुबलक पुरवठा अखंडीत चालू राहील.
他必居高處; 他的保障是磐石的堅壘; 他的糧必不缺乏; 他的水必不斷絕。
17 १७ तुझे नेत्र राजाला त्याच्या शोभेत पाहतील; ते विस्तीर्ण भूमी पाहतील.
你的眼必見王的榮美, 必見遼闊之地。
18 १८ भयप्रद गोष्टींचे स्मरण तुझ्या मनाला होईल; लिखाण करणारा कोठे आहे, पैसे तोलणारा कोठे आहे? मनोऱ्यांची गणती करणारा कोठे आहे?
你的心必思想那驚嚇的事, 自問說:記數目的在哪裏呢? 平貢銀的在哪裏呢? 數戍樓的在哪裏呢?
19 १९ उद्धट मनोवृतीचे लोक, अनोळखी भाषा बोलणारे लोक, ज्यांचे तुला पुर्णपणे आकलन झाले नाही अशा लोकांस तू फार काळ पाहणार नाहीस.
你必不見那強暴的民, 就是說話深奧,你不能明白, 言語呢喃,你不能懂得的。
20 २० सियोनेकडे पाहा, हे नगर आपल्या मेजवाणीचे आहे; तुझे डोळे यरूशलेमेकडे शांतीचे वस्तीस्थान म्हणून पाहतील. त्याचा तंबू कधीही काढणार नाहीत, त्याच्या खुंट्या कधीही उपटणार नाहीत, ज्याच्या दोरखंडातील एकही दोरी तुटणार नाही.
你要看錫安-我們守聖節的城! 你的眼必見耶路撒冷為安靜的居所, 為不挪移的帳幕, 橛子永不拔出, 繩索一根也不折斷。
21 २१ त्या जागी वैभवी परमेश्वर आपल्या समवेत असेल, ती जागा रूंद नदी व प्रवाहांची अशी होईल. त्यामध्ये वल्हेकऱ्यांच्या युद्ध नौका आणि मोठे जहाज त्यातून प्रवास करणार नाहीत.
在那裏,耶和華必顯威嚴與我們同在, 當作江河寬闊之地; 其中必沒有盪槳搖櫓的船來往, 也沒有威武的船經過。
22 २२ कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आम्हास न्याय देणारा आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तोच आम्हास तारील.
因為,耶和華是審判我們的; 耶和華是給我們設律法的; 耶和華是我們的王; 他必拯救我們。
23 २३ तुझे दोर ढिले झाले आहेत; त्यांना आपल्या डोलकाठीस घट्ट धरून ठेवत आधार नाहीत; ते शीड पसरीत नाहीत; जेव्हा मोठ्या लुटीची लूट वाटण्यात आली, जे पांगळे त्यांनी लूट वाटून घेतली.
你的繩索鬆開: 不能栽穩桅杆, 也不能揚起篷來。 那時許多擄來的物被分了; 瘸腿的把掠物奪去了。
24 २४ मी रोगी आहे, असे म्हणणारा त्यामध्ये वस्ती करणार नाही. जे लोक त्यामध्ये राहतात त्यांच्या अन्यायांची क्षमा करण्यात येईल.
城內居民必不說:我病了; 其中居住的百姓,罪孽都赦免了。