< यशया 30 >
1 १ परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, अशी ती पापाने पापाची भर घालतात.
Ve de affälliga barnen, säger Herren; de som rådslå utan mig, och utan min Anda beskydd söka, samla synd öfver synd;
2 २ ते फारोकडे संरक्षण मागण्याकरिता आणि त्याच्या छायेत आश्रय घेण्याकरता मला न विचारता मिसरकडे खाली उतरून जातात.
De som draga neder uti Egypten, och fråga intet min mun, att de skola stärka sig med Pharaos magt, och beskärma sig under Egypti skugga.
3 ३ यास्तव फारोचे संरक्षण हे तुम्हास लाज आणि मिसरमधील आश्रय हे तुमच्या साठी मानखंडणा असे होईल.
Ty Pharaos starkhet skall eder på skam komma, och det beskydd under Egypti skugga till försmädelse.
4 ४ तुमचे अधिकारी सोअनला आणि तुमचे दूत हानेसला गेले आहेत.
Deras Förstar hafva varit i Zoan, och deras bådskap äro till Hanes komne.
5 ५ कारण ते मदत करू न शकणाऱ्या, जे साहाय्य किंवा हित करणारे नाहीत तर लाज व निंदा असे आहेत त्यांच्यामुळे ते सर्व लाजवले जातील.”
Men de måste likväl allesamman på skam komma, öfver det folk som dem till intet bestånd vara kan, antingen med hjelp; eller eljest till nytto; utan allenast till skam och hån.
6 ६ नेगेबमधल्या प्राण्यांविषयी घोषणा संदेश: आपले काही चांगले करता न येणाऱ्या लोकांकडे, संकटाच्या आणि धोक्याच्या प्रदेशातून, सिंहीण व सिंह, विषारी साप आणि आग्या उडता सर्प, ते आपले धन गाढवांच्या खांद्यावर व आपली संपत्ती उंटाच्या पाठीवर घालून नेतात.
Detta är tungen öfver de djur, som draga söderåt; der lejon och lejinnor äro, ja, huggormar och brinnande flygande drakar, uti bedröfvelses och jämmers lande. De föra deras gods på fålars rygg, och deras skatt på camelers rygg, till det folk som dem intet till nytto vara kan.
7 ७ मिसरच्या मदतीला काही किंमत नाही. म्हणून मी मिसरला स्वस्थ बसणारा रहाब असे नाव दिले.
Ty Egypten är intet, och dess hjelp är fåfäng; derföre predikar jag eder deraf alltså: Rahab skall sitta stilla dertill.
8 ८ आता तू त्यांच्या उपस्थितीत पाटीवर लिही आणि पुस्तकावरही कोरून ठेव, अशासाठी की पुढल्या काळासाठी साक्षी म्हणून ते साठून राहील.
Så gack nu, och skrif detta för dem på en taflo, och teckna det uti en bok, att det må blifva evinnerliga och utan ända.
9 ९ कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले, मुले जी परमेश्वराची शिकवणूक ऐकण्यास नकार देतात.
Ty det är ett ohörsamt folk, och lögnaktig barn, som Herrans lag icke höra vilja;
10 १० ते पाहणाऱ्यांना म्हणतात, “तुम्ही पाहू नका.” आणि भविष्यवाद्याला म्हणता, “आमच्या जवळ सरळ भविष्य सांगू नको; आम्हास बऱ्या वाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांग, कपटी भविष्ये सांग.
Utan säga till Siarena: I skolen intet se; och till skådarena: I skolen intet skåda oss den rätta läron; men prediker oss ljufliga, skåder oss bedrägeri.
11 ११ मार्गातून बाजूला फिर, वाटेतून बाजूला फिर, इस्राएलाच्या पवित्र देवाला आमच्यापासून दूर घेऊन जा.”
Viker af vägen, öfvergifver denna stigen; låter Israels Heliga återvända när oss.
12 १२ यामुळे इस्राएलचा पवित्र असे म्हणतो, “कारण तुम्ही हा संदेश नाकारता आणि जुलूम व कपट यांवर विसंबून राहता.
Derföre säger Israels Helige alltså: Efter thy I förkasten detta ordet, och förtrösten uppå försmädare och förförare, och förlåten eder deruppå;
13 १३ म्हणून हा अन्याय तुम्हास, जसा तुटलेला भाग पडण्यास तयार असतो, जसा उंच भिंतीमध्ये फुगवटा असतो, ज्याचे पडणे अकस्मात एकाएकी होते त्यासारखा होईल.
Så skall denna missgerningen vara eder såsom en refva på en hög mur, då han begynner remna, hvilken hastigt omkullfaller och förkrossas;
14 १४ कुंभाराची मडकी फोडावी तसे तो ते फोडून त्याचे तुकडे करील, तो त्यास सोडणार नाही. आणि त्याचे तुकडे चुलीतून विस्तव घ्यायला किंवा डबक्यातून पाणी उपसायला खापरही ठेवणार नाही.”
Såsom ett lerkäril sönderkrossadt vorde, det man sönderkrossar, och skonar thy intet, tilldess man deraf icke finner ett stycke så stort, att man dermed kan eld taga af en eldstad, eller vatten ösa utur en brunn.
15 १५ कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” पण तुम्ही इच्छुक नव्हते.
Ty så säger Herren Herren, den Helige i Israel: Om I stilla blifven, så vorde eder hulpet; genom stillhet och hopp vorden I starke; men I villen icke;
16 १६ तुम्ही म्हणता, नाही! कारण आम्ही घोड्यांवर बसून पळू, म्हणून तुम्हास पळावे लागेल. आणि आम्ही चपळ घोड्यांवर स्वार होऊन जाऊ, पण जे तुमच्या पाठीस लागतील ते पण चपळ होतील.
Och saden: Nej; utan vi vilje fly till hästar; derföre skolen I flyktige varda; och uppå löpare vilje vi rida; derföre skola edra förföljare varda eder för snare.
17 १७ एकाने धमकी दिल्यास तुमची हजारो माणसे पळून जातील. पाच जणांच्या धमकीने तुम्ही पळून जाल. पर्वताच्या शिखरावर ध्वजस्तंभासारखे किंवा डोंगरावरच्या झेंड्यासारखे तुम्ही शिल्लक उराल तोपर्यंत असे होईल.
Ty tusende af eder skola fly för ens mans rop allena; ja, för fem skolen I fly allesammans, tilldess af eder skola igenblifva, såsom ett mastträ, ofvanuppå ett berg, och såsom ett baner ofvanuppå en hög.
18 १८ तरीही परमेश्वर तुमच्यावर दया करावी म्हणून वाट पाहील. तुम्हावर दया दाखवावी म्हणून तो उंचावला जाईल, कारण परमेश्वर न्यायाचा देव आहे, जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादीत आहेत.
Derföre bidar Herren, att han skall vara eder nådelig, och är uppstånden, att han skall förbarma sig öfver eder; ty Herren är en Gud, som handlar med dom. Väl är allom dem som förbida honom.
19 १९ कारण यरूशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस. खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करील, जेव्हा ते ऐकल, तो तुला उत्तर देईल.
Ty Zions folk skall bo i Jerusalem; du skall icke gråta. Han skall varda dig nådelig, när du ropar; han varder dig svarandes, så snart han det hörer.
20 २० जरी परमेश्वर तुला संकटाची भाकर आणि दु: खाचे पाणी देईल, तरी तुझे शिक्षक पुन्हा लपू शकणार नाही, तर तुझे डोळे तुझ्या शिक्षकांना पाहतील.
Och Herren skall uti edor bedröfvelse gifva eder bröd, och vatten uti edor ångest; ty han låter icke dina lärare mer bortflyga; utan din ögon skola se dina lärare;
21 २१ जेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे वळाल तर तुझे कान तुझ्यामागून वाणी ऐकतील, “हा मार्ग बरोबर आहे. तुम्ही या मार्गात चालावे.”
Och din öron skola höra ordet efter dig, så sägandes: Detta är vägen, går honom, och eljest hvarken på högra handena, eller på den venstra.
22 २२ तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल. तुम्ही त्या देवांना मासिकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.”
Och I skolen ohelga edra besilfrada afgudar, och edor belätes gyldene kläder, och skolen bortkasta dem såsom träck, och säga till dem: Härut.
23 २३ तुम्ही जे बी भूमीत पेराल त्यासाठी पाऊस तो देईल आणि भूमीतून मुबलक अशी भाकर देईल. आणि पिके विपुल होईल. त्या दिवसात तुझी गुरे मोठ्या कुरणांमध्ये चरतील.
Så skall han gifva dine säd, som du på åkrenom sått hafver, regn och bröd af åkrens årsväxt, och det öfvernog, och din boskap skall på den tiden gå i bet på en vid gräsmark.
24 २४ आणि बैल व गाढव जे नांगरतात ते सुपाने व दांताळ्याने उफणलेल्या धान्याचे आंबवण खातील.
Oxar och fålar, der åkren med brukas, skola blandadt korn äta, det kastadt är med kastoskofvel och vanno.
25 २५ आणि वधाच्या मोठ्या दिवशी बुरुज खाली पडतील. तेव्हा उंच पर्वतावर व प्रत्येक उंच डोंगरावर पाण्याचे झरे व ओघ वाहतील.
Och på all stor berg, och på alla stora högar, skola åtskilde vattuströmmar gå, på den stora slagtningenes tid, när tornen falla.
26 २६ त्यावेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश जसा सात दिवसाचा प्रकाश तसा सात पट होईल. परमेश्वर त्याच्या जखमी लोकांस मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.
Och månans sken skall varda såsom solenes sken, och solenes sken skall varda sju resor klarare än det nu är, på den tid då Herren förbinda skall sins folks skada, och hela deras sår.
27 २७ पाहा! परमेश्वराचे नाव त्याच्या क्रोधाने जळते, व दाट धुराच्या लोटाने दुरवरून येत आहे, त्याचे ओठ क्रोधाने भरले आहेत आणि त्याची जीभ खाऊन टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे.
Si, Herrans Namn kommer fjerranefter; hans vrede bränner, och är ganska svår; hans läppar äro fulle med grymhet, och hans tunga såsom en förtärande eld;
28 २८ त्याचा श्वास जणूकाय नदीच्या जोराच्या प्रवाहासारखा आहे जो मानेपर्यंत चढत आहे, अशासाठी की नाशाच्या चाळणीने राष्ट्रांना चाळावे, आणि त्याचा श्वास लोकांच्या तोंडामध्ये बहकविणारा लगाम राहील.
Och hans ande såsom en vattuflod, den upp till halsen räcker, till att förströ Hedningarna, tilldess de omintet varda, och drifva folken hit och dit med ett betsel uti deras mun.
29 २९ जसे पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रामाणे तुमचे गीत होते. आणि जसा कोणी परमेश्वराच्या डोंगरावर इस्राएलाच्या खडकाकडे जाताना पावा वाजवत जातो तसा तुम्हास आनंद होईल.
Då skolen I sjunga, såsom på en helgedagsnatt, och fröjda eder af hjertat, lika som så man går med en pipo till Herrans berg, till Israels tröst.
30 ३० परमेश्वर आपला वैभवी आवाज लोकांस ऐकू जाऊ देईल आणि वारा, पाऊस व गारपीट सह क्रोधाविष्ट व अग्नी यांनी तो आपला भुज चालवील.
Och Herren skall låta höra sina härliga röst, att man må se hans uträckta arm, med vredsamt trug, och med en förtärande eldslåga, med strålar, med starkt regn, och med hagel.
31 ३१ परमेश्वराचा आवाज ऐकून अश्शूर विखुरला जाईल. तो त्यास आपल्या काठीने मारील.
Ty Assur skall förskräckt varda för Herrans röst, den honom med ris slår.
32 ३२ आणि काठीचा जो प्रत्येक फटका परमेश्वर त्याच्यावर मारील तो, डफ व वीणा वाजत असताना होईल, आणि हात खाली वर करीत युद्धांमध्ये तो त्यांच्याशी लढेल.
Ty riset skall väl drabba och bita igenom, då Herren det öfver dom förer med trummor och harpor, och allestäds emot dem strider.
33 ३३ पूर्वीपासून तोफेत तयार करून ठेवले आहे. ते राजासाठी तयार केले आहे, ते पुष्कळ खोल आणि रूंद केले आहे. त्याच्या चीतेसाठी विस्तव आणि खूप लाकडे असे आहे. परमेश्वराचा श्वास जळत्या गंधकाच्या प्रवाहाप्रमाणे त्यास पेटवतो.
Ty gropen är tillredd sedan i går; ja, hon är ock Konungenom tillredd, djup och vid nog. Så är boningen derinne, eld och mycken ved. Herrans ande skall upptända henne såsom en svafvelström.