< यशया 28 >
1 १ एफ्राइममधील मद्यप्यांनो तुमच्या गर्वाच्या मुकुटाला हायहाय! आणि धुंद झालेल्या सुपिक खोऱ्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फुल त्यास हायहाय!
Ak vai, tam kronim, ar ko lepojās Efraīma piedzērušies, vai tai savītušai puķei, viņu goda glītumam, kas pušķo bagātās ielejas galvu tiem, kas vīna pārvarēti.
2 २ पाहा! परमेश्वराकडे पराक्रमी आणि बलवान असा एक आहे. तो गारपिटीप्रमाणे आहे. नष्ट करणाऱ्या वादळाप्रमाणे, आणि प्रचंड ढगफूटी प्रमाणे, तो पृथ्वीला आपल्या हाताने ताडना करेल.
Redzi, viens stiprs un varens no Tā Kunga tā kā barga krusa, kā briesmīga vētra, tā kā vareni ūdens plūdi, kas varen uzplūst, tā Viņš gāzīs pie zemes ar varu.
3 ३ एफ्राइममधील मद्याप्यांचा अभिमानी मुकुट पायाखाली तुडवला जाईल.
Kājām samīs to kroni, ar ko lepojās Efraīma piedzērušies.
4 ४ त्याच्या वैभवशाली सौंदर्याचे कोमेजणारे फूल, जे खोऱ्याच्या माथ्यावर आहे, उन्हाळ्यात झाडावर प्रथम आलेल्या अंजिरांप्रमाणे त्याची स्थिती होईल, त्याकडे पाहणारा पाहतो तेव्हा तो त्याच्या हातांत असतानांच तो खाऊन टाकतो.
Un tai vīstošai puķei, viņu goda glītumam, kas pušķo tās bagātās ielejas galvu, notiek kā agri ienākušai vīģei priekš lasāmā laika; tiklīdz kas to redz un dabū savā rokā, tas to tūdaļ apēd.
5 ५ त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांच्या उरलेल्यांना सुंदर मुकुट असा होईल.
Tai dienā Tas Kungs Cebaot būs par skaistu kroni un par krāšņu vainagu Savu ļaužu atlikumam,
6 ६ आणि जो न्याय करत बसतो त्यास तो न्यायाचा आत्मा आणि जे वेशीजवळ लढाई मागे हटवतात त्यांना तो पराक्रम असा होईल.
Un par tiesas Garu tiem, kas sēž tiesas amatā, un par stiprumu tiem, kas karu(ienaidu) dzen atpakaļ līdz vārtiem.
7 ७ पण हे सुद्धा द्राक्षरसाने हेलकावे खात आहेत, आणि मादक मद्यानी अडखळत आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत आणि मद्याने त्यांना गिळून घेतले आहे. ते मद्याने अडखळून पडत आहेत आणि ते दृष्टांतात भ्रमतात, ते न्याय करण्यात अडखळतात.
Bet arī šie streipuļo no vīna un sajukuši no stipra dzēriena. Priesteris un pravietis streipuļo no stipra dzēriena, tie ir vīna pārvarēti, tie sajukuši no stipra dzēriena, tie streipuļo pie parādīšanām un klūp tiesu spriezdami.
8 ८ खरोखर सर्व मेजे ओकारीने भरलेली आहेत, कोठेही स्वच्छ जागा राहिलेली नाही.
Jo visi galdi ir pilni netīru vēmekļu, ka vietas vairs nav.
9 ९ तो कोणाला ज्ञान शिकवील? आणि तो कोणाला निरोप समजावेल? दुग्धापासून दूर केलेल्यांना किंवा स्तनपानापासून दूर केलेल्यांना काय?
Kam tad tas atzīšanu mācīs, un kam tas mācību darīs zināmu? Tiem no piena atradinātiem, tiem no krūtīm nošķirtiem?
10 १० कारण नियमा वर नियम, नियमावर नियम, ओळीवर ओळ, ओळीवर ओळ, इथे थोडे, तिथे थोडे, असे आहे.
Jo (tie saka: ) pavēli uz pavēli, pavēli uz pavēli, likumu uz likumu, likumu uz likumu, maķenīt še, maķenīt te!
11 ११ खरच, तोतऱ्या ओठांनी आणि अन्य भाषेने तो या लोकांशी बोलेल.
Tāpēc ar lūpām, kas stostās, un ar svešu mēli viņš runās uz šiem ļaudīm, kam viņš bija sacījis:
12 १२ पूर्वी तो त्यांना म्हणाला, “येथे विश्रांती आहे, थकलेल्यांना येथे येऊन विश्रांती घेऊ द्या, आणि हे उत्साहवर्धक आहे.” पण ते काही ऐकेनात.
„Še ir dusa, dodiet piekusušam atpūsties! Un še ir atspirgšana, “- bet tie to negribēja dzirdēt.
13 १३ लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत: ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.
Tādēļ tiem notiks Tā Kunga vārds: pavēli uz pavēli, pavēli uz pavēli, likumu uz likumu, likumu uz likumu, maķenīt še, maķenīt te, ka tie ies un atpakaļ kritīs un sadauzīsies un taps savaldzināti un sagūstīti.
14 १४ याकरिता, जे तुम्ही थट्टा करता, आणि जे तुम्ही यरूशलेमेवर राज्य करता, ते तुम्ही परमेश्वराचे वचन काय म्हणते ते ऐका.
Tādēļ klausiet Tā Kunga vārdu, jūs mēdītāji, kas valda pār šiem Jeruzālemes ļaudīm.
15 १५ तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही, जेव्हा बुडवणारी शिक्षा पार केली जाईल तेव्हा ती आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही; कारण आम्ही कपटाच्या मागे लपलो आहोत व असत्याला आपले आश्रय केले आहे.” (Sheol )
Jo jūs sakāt, mēs derību esam derējuši ar nāvi un esam saderējušies ar elli; lai arī tādas pātagas nāk kā plūdi, tomēr tās mūs neaizņems; jo melus esam likuši sev par patvērumu, un apakš viltus esam apslēpušies. (Sheol )
16 १६ यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.
Tādēļ tā saka Tas Kungs Dievs: redzi, Es esmu, kas Ciānā liek pamata akmeni, izraudzītu akmeni, dārgu stūra akmeni, kas it stipri nolikts: kas tic, tas nebēgs.
17 १७ मी न्याय मोजमापाची काठी, आणि नितीमत्ता हा ओळंबा असे करीन, तेव्हा गारपीट खोट्यांचे आश्रय झाडून टाकील, आणि पूराचे पाणी लपण्याच्या जागा झाकून टाकील.”
Un Es iecelšu tiesu par mēru un taisnību par svaru, un krusa aizraus to melu patvērumu, un ūdens pārpludinās to slēpšanas vietu.
18 १८ तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल. जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल, त्या द्वारे तुम्ही झाकले जाल. (Sheol )
Un jūsu derība ar nāvi taps iznīcināta, un jūsu līgums ar elli, tas nepastāvēs. Kad tās pātagas nāks kā plūdi, tad jūs no tām tapsiet samīti. (Sheol )
19 १९ जेव्हा तो पार जाईल तेव्हा तो तुला झाकून टाकेल. आणि रोज रोज सकाळी, दिवसा आणि रात्री तो पार जाईल. आणि जेव्हा संदेश कळेल, तर ते भयच असे होईल.
Cikkārt tās nāks, tās jūs aizraus, jo ik rītu tās nāks, dienu nakti. Tikai briesmas būs, dzirdēt to sludināšanu.
20 २० कारण अंथरूण पाय पसरावयास खूप लहान आहे, आणि पांघरुण पांघरायला पुरत नाही एवढे ते अरुंद आहे.
Jo gulta ir īsa, ka nevar izstiepties, un apsegs šaurs, ka nevar ietīties.
21 २१ जसा परासीम डोंगरामध्ये परमेश्वर उभा राहिला होता, जसा तो गिबोन दरीत रागावला होता त्याप्रमाणे तो रागावेल. अशासाठी की त्याने आपले कार्य, त्याचे अद्भूत कृत्य आणि त्याचे विस्मयकारी कृत्य करावे.
Jo Tas Kungs tāpat celsies kā pie Pracim kalna, Viņš tāpat dusmosies kā Gibeonas ielejā, Savu darbu darīt, - Viņa darbs būs dīvains, un Savu strādāšanu pastrādāt, Viņa strādāšana būs dīvaina.
22 २२ तर आता तुम्ही थट्टा करू नका, नाहीतर तुमची बंधणे घट्ट करण्यात येतील. कारण पृथ्वीवर नाश होण्याचा ठराव, मी सेनाधीश परमेश्वरापासून ऐकला आहे.
Nu tad, nemēdiet vairs, ka jūsu saites netop cietākas, jo es esmu dzirdējis izdeldēšanu, noliktu no Tā Kunga Dieva Cebaot pār visu zemi.
23 २३ मी सांगत असलेला संदेश लक्षपूर्वक ऐका, सावध असा, माझे शब्द ऐका.
Griežat šurp ausis un klausiet manu balsi, ņemiet vērā un klausiet, ko es runāju.
24 २४ पेरणी करण्यासाठी शेतकरी सतत शेत नांगरतो का? तो सतत मशागत करतो का?
Vai tad arājs vienmēr ars, kad grib sēt, kārtos un ecēs savu zemi?
25 २५ त्याने जमीन तयार केल्यावरच तो काळे जिरे टाकतो व जिरे विखरतो, तो गहू रांगेत आणि जव नेमलेल्या ठिकाणी आणि त्याच्या काठाला काठ्या गहू पेरीत नाही काय?
Vai nav tā? Kad viņš to virsu ir līdzinājis, tad kaisa dilles un met ķimenes, vai sēj kviešus pēc kārtas, vai miežus, vai rudzus, ikkatru savā vietā.
26 २६ कारण त्याचा देव त्यास सूचना देतो, तो त्यास सुज्ञपणे शिकवतो.
Un viņa Dievs viņam rādījis, kā piederas, un viņu pamācījis.
27 २७ शिवाय, काळे जिरे घणाने मळत नाही, किंवा तिच्यावर गाडीचे चाक फिरवले जात नाही, पण काळे जिरे काठीने आणि जिरे दंडाने झोडतात.
Jo dilles netop kultas ar ruļļiem, nedz bluķi top vesti pār ķimenēm, bet dilles top kultas ar spriguli, un ķimenes ar kulstekli.
28 २८ भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही. आणि जरी त्याच्या गाडीचे चाक व त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही.
Vai maizes labība top sagrūsta? Nē, to nesakuļ pavisam; to izkuļ ar saviem bluķiem un zirgiem, bet nesagrūž.
29 २९ सेनाधीश परमेश्वर, जो संकल्पात सुंदर आहे आणि ज्ञानाने श्रेष्ठ आहे. त्याच्याकडून हे आहे.
Arī tas nāk no Tā Kunga Cebaot, Viņš ir brīnišķīgs padomā un liels gudrībā.