< यशया 27 >

1 त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर व मोठ्या व दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील.
उस समय यहोवा अपनी कड़ी, बड़ी, और दृढ़ तलवार से लिव्यातान नामक वेग और टेढ़े चलनेवाले सर्प को दण्ड देगा, और जो अजगर समुद्र में रहता है उसको भी घात करेगा।
2 तेव्हा लोक रम्य द्राक्षमळ्याबद्दलचे गाणे म्हणतील.
उस समय एक सुन्दर दाख की बारी होगी, तुम उसका यश गाना!
3 “मी परमेश्वर, तिची नीगा राखणारा, मी प्रत्येक क्षणी तिला पाणी घातले; त्यामुळे कोणीही तिला दुखावणार नाही, म्हणून मी रात्र दिवस तिचे राखण करतो.
मैं यहोवा उसकी रक्षा करता हूँ; मैं क्षण-क्षण उसको सींचता रहूँगा। मैं रात-दिन उसकी रक्षा करता रहूँगा ऐसा न हो कि कोई उसकी हानि करे।
4 मी रागवलेलो नाही, लढाईत माझ्यापुढे काट्यांची झाडे व काटेरी झाडे कोण ठेवील! पण युध्दात मी त्याच्या विरूद्ध चाल करून जाईल आणि मी त्यास जाळून नष्ट करून टाकीन.
मेरे मन में जलजलाहट नहीं है। यदि कोई भाँति-भाँति के कटीले पेड़ मुझसे लड़ने को खड़े करता, तो मैं उन पर पाँव बढ़ाकर उनको पूरी रीति से भस्म कर देता।
5 अथवा त्याने माझ्याशी समेट करावा म्हणून त्याने माझ्या संरक्षणाला धरावे, त्याने माझ्याशी शांती प्रस्थापीत करावी.
या मेरे साथ मेल करने को वे मेरी शरण लें, वे मेरे साथ मेल कर लें।
6 येणाऱ्या दिवसात याकोब मुळावेल, इस्राएल उमलेले व त्यास नवीन पालवी फुटेल, आणि ते जगाची पाठ फळांनी भरतील.”
भविष्य में याकूब जड़ पकड़ेगा, और इस्राएल फूले-फलेगा, और उसके फलों से जगत भर जाएगा।
7 काय परमेश्वराने याकोबावर आणि इस्राएलावर हल्ला केला, जसा त्याने त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर हल्ला केला? अथवा यांनी ज्यांचा वध केला आहे त्यांच्या वधाप्रमाणे यांचा वध करण्यात आला आहे काय?
क्या उसने उसे मारा जैसा उसने उसके मारनेवालों को मारा था? क्या वह घात किया गया जैसे उसके घात किए हुए घात हुए?
8 याचप्रकारे तुम्ही याकोब आणि इस्राएलाला दूर पाठवून अचूक मापदंडांनी त्यांचा विरोध केला आहे. पुर्वेच्या वाऱ्याच्या दिवशी त्यांना तो प्रचंड वाऱ्याने दूर करतो.
जब तूने उसे निकाला, तब सोच-विचार कर उसको दुःख दिया: उसने पुरवाई के दिन उसको प्रचण्ड वायु से उड़ा दिया है।
9 याकरीता याकोबाच्या अपराधांना क्षमा कशी केली जाईल, आणि त्याचे पाप दूर करण्याचे फळ हेच आहे. तो वेदीचे सर्व दगड खडूच्या चूर्ण केलेल्या चुनखड्यासारखे करेल, आणि तसेच अशेरा देवीचे खांब किंवा धूप वेदीही उभ्या राहणार नाहीत.
इससे याकूब के अधर्म का प्रायश्चित किया जाएगा और उसके पाप के दूर होने का प्रतिफल यह होगा कि वे वेदी के सब पत्थरों को चूना बनाने के पत्थरों के समान चकनाचूर करेंगे, और अशेरा और सूर्य की प्रतिमाएँ फिर खड़ी न रहेंगी।
10 १० कारण तटबंदी असलेले शहर नाश झाले आहे आणि वस्ती असलेले राणासारखी सोडून दिलेली आहे. वासरू तेथे चरेल आणि तेथे बसेल आणि त्याच्या फांद्या खाऊन टाकेल.
१०क्योंकि गढ़वाला नगर निर्जन हुआ है, वह छोड़ी हुई बस्ती के समान निर्जन और जंगल हो गया है; वहाँ बछड़े चरेंगे और वहीं बैठेंगे, और पेड़ों की डालियों की फुनगी को खा लेंगे।
11 ११ त्याच्या फांद्या सुकतील तेव्हा त्या तोडल्या जातील, स्त्रिया त्या सरपणासाठी वापरतील. कारण हे लोक समजदार नाहीत. म्हणून त्यांना घडविणारा देव ह्यास्तव यांच्यावर दया करणार नाही, आणि त्यांचा निर्माणकरता यांच्यावर कृपा दाखवणार नाही.
११जब उसकी शाखाएँ सूख जाएँ तब तोड़ी जाएँगी; और स्त्रियाँ आकर उनको तोड़कर जला देंगी। क्योंकि ये लोग निर्बुद्धि हैं; इसलिए उनका कर्ता उन पर दया न करेगा, और उनका रचनेवाला उन पर अनुग्रह न करेगा।
12 १२ त्या दिवशी असे होईल की, परमेश्वर फरात नदीपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या आपल्या पिकाची मळणी करील, आणि तुम्ही इस्राएलच्या लोकांनो एकत्र गोळा केले जाणार.
१२उस समय यहोवा फरात से लेकर मिस्र के नाले तक अपने अन्न को फटकेगा, और हे इस्राएलियों तुम एक-एक करके इकट्ठे किए जाओगे।
13 १३ त्या दिवशी मोठा कर्णा वाजेल, आणि तेव्हा अश्शूर देशामध्ये नाश होणारे आणि मिसर देशात जे घालवले आहेत ते येतील. आणि यरूशलेमेस पवित्र पर्वतावर परमेश्वरास पुजतील.
१३उस समय बड़ा नरसिंगा फूँका जाएगा, और जो अश्शूर देश में नाश हो रहे थे और जो मिस्र देश में बरबस बसाए हुए थे वे यरूशलेम में आकर पवित्र पर्वत पर यहोवा को दण्डवत् करेंगे।

< यशया 27 >