< यशया 26 >
1 १ त्या दिवशी यहूदा प्रदेशात हे गीत गातील, आम्हास बळकट शहर आहे, देवाने त्याच्या भींतींना व तटबंदीना तारण असे केले आहे.
Azon a napon éneklik azt a dalt Jehúda országában: Erős városunk van, a segítséget teszi fallá és bástyává.
2 २ वेशी उघडा म्हणजे नितीमान राष्ट्र जो विश्वास पाळतो, ते आत येतील.
Nyissátok ki a kapukat, hogy bevonuljon az igaz nemzet, a hűséget őrző.
3 ३ परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
A lelkület szilárd, megóvod a békét, a békét; mert benned bízik.
4 ४ सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे.
Bízzatok az Örökkévalóban mindétig, mert Jáh, az Örökkévaló örök szikla.
5 ५ कारण जे अभिमानाने राहतात त्यांना तो खाली आणील, तो उंच गढांना, खाली आणणार, तो तिला भूमीपर्यंत खाली नीच करणार, तो तिला धुळीस मिळवणार.
Mert lealázta a magasban lakókat, a fölemelkedő várat; lealacsonyítja, alacsonyítja a földig, éreti a porig.
6 ६ दीनदुबळ्यांचे पाय व दरिद्र्यांचे पाय त्यांना तुडवतील.
Láb tapossa, a szegénynek lábai, a szűkölködők léptei.
7 ७ सरळपण हा नितीमानाचा मार्ग आहे, जो तू सरळ आहेस तो तू नितीमानाची वाट सपाट करतो.
Az igaznak útja egyenesség; egyenes, te az igaznak ösvényét egyengeted.
8 ८ होय, परमेश्वरा, तुझ्या न्यायाच्या मार्गात आम्ही तुझी वाट पाहिली आहे, आमच्या जीवाची इच्छा तुझ्या नावाकडे, तुझ्या स्मरणाकडेच आहे.
Ítéleteid útján is, Örökkévaló, reméltünk benned, nevedre és emlékedre kívánkozik a lélek.
9 ९ प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, माझा आत्मा माझ्यामध्ये आतुरतेने तुला शोधीन, कारण जेव्हा तुझा न्याय या पृथ्वीवर येतो, तेव्हा या जगातील राहणारे न्यायीपण शिकतात.
Lelkemmel kívántalak az éjjel, szellememmel is én bennem kereslek: mert midőn ítéleteid a földre jutnak, igazságot tanulnak a világ lakói.
10 १० पापी मनुष्यावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच न्यायीपण शिकणार नाही. सरळपणाच्या भूमीत तो दुष्टतेनेच वागणार, आणि परमेश्वराचा महिमा पाहणार नाही.
Ha megkegyelmeztetik a gonosz, nem tanul igazságot, a jogosság országában jogtalankodik és nem látja az Örökkévaló felségét.
11 ११ परमेश्वरा, तुझा हात उंचावलेला आहे, पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुझ्या लोकांबद्दल असलेला तुझा आवेश ते पाहतील आणि फजित होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.
Örökkévaló, magas a te kezed, de nem látják, lássák szégyenülve a népért való buzgalmat, az ellenségeidet érő tűz is eméssze meg őket.
12 १२ परमेश्वरा, तू आमच्यासाठी शांती ठरवशील, कारण खरच तू आमची सर्व कामे आमच्यासाठी पूर्ण केले आहेत.
Örökkévaló, békét szerzel majd nekünk, mert mind a mi dolgainkat is művelted nekünk.
13 १३ परमेश्वर आमचा देव, तुला सोडून इतर देवतांनी आम्हावर राज्य केले. पण आम्ही फक्त तुझीच स्तुती करतो.
Örökkévaló, mi Istenünk, bírtak bennünket urak rajtad kívül; egyedül általad emlegetjük nevedet.
14 १४ ते मृत आहेत, ते जिवंत नाहीत; ते प्रेते आहेत, ते उठणार नाहीत. खरोखर, तू त्यांना दंड देऊन त्यांचा नाश केला आहेस आणि त्यांची आठवण तू नष्ट केली आहेस.
Holtak nem élednek föl, árnyak nem támadnak föl, ezért rendelted és megsemmisítetted őket és kipusztítottad minden emléküket.
15 १५ हे परमेश्वरा, तू राष्ट्र वाढवले आहेस, तू राष्ट्र वाढवले आहे, तू सन्मानीत आहेस, तू भूमीच्या सर्व सीमा विस्तारित केल्या आहेत.
Gyarapítottad a nemzetet, Örökkévaló, gyarapítottad a nemzetet, megdicsőültél, messzivé tetted mind a föld végeit.
16 १६ परमेश्वरा, संकटात असताना ते तुझे स्मरण करतात. तुझी शिक्षा त्यांच्यावर असता त्यांनी तुझ्यापुढे प्रार्थना केली.
Örökkévaló, a szorultságban gondoltak rád, halk fohászuk ömlött, midőn fenyítésed érte őket.
17 १७ जेव्हा एखादी स्त्री प्रसूतीची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत.
Mint várandós, ki közel van a szüléshez, vajúdik, kiált fájdalmaiban, úgy voltunk mi előtted, Örökkévaló.
18 १८ त्याचप्रमाणे आम्ही गरोदर होतो, आम्ही प्रसूतीवेदनेमध्ये होतो, पण आम्ही फक्त वाऱ्याला जन्म दिला. पृथ्वीत आम्ही काही तारण केले नाही, आणि जगातील राहणारे पडले नाहीत.
Várandósak voltunk, vajúdtunk, mintegy szelet szültünk; segítség nem érkezett az országba és nem születnek meg világlakók.
19 १९ तुझे मरण पावलेले जिवंत होतील, आमचे मृत शरीरे उठतील. जे धुळीत स्थायिक झाले ते तुम्ही जागे व्हा आणि आनंदाने गायन करा. कारण तुझ्यावरील दहिवर हे प्रभातीचे जिवनदायी दहिवर आहे, पृथ्वी तिचे भक्ष तिच्यातील मृत बाहेर टाकील.”
Éledjenek föl a te halottaid, hulláim támadjanak föl; ébredjetek és ujjongjatok, ti porban lakozók, mert világosság harmata a te harmatod és a föld megszüli az árnyakat.
20 २० माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा आणि दारे लावून घ्या. क्रोध टळून जाईपर्यंत थोडा वेळासाठी लपा.
Eredj népem, menj be kamaráidba és zárd be mögötted ajtódat, rejtőzzél el kis pillanatra, míg elmúlik a harag.
21 २१ कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.
Mert íme az Örökkévaló elindul helyéről, hogy megbüntesse bűnéért a föld lakóját; és feltakarja a föld a rajta elontott vért és nem fedi be többé a rajta megölteket.