< यशया 26 >

1 त्या दिवशी यहूदा प्रदेशात हे गीत गातील, आम्हास बळकट शहर आहे, देवाने त्याच्या भींतींना व तटबंदीना तारण असे केले आहे.
當那日,在猶大地人必唱這歌說: 我們有堅固的城。 耶和華要將救恩定為城牆,為外郭。
2 वेशी उघडा म्हणजे नितीमान राष्ट्र जो विश्वास पाळतो, ते आत येतील.
敞開城門, 使守信的義民得以進入。
3 परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.
堅心倚賴你的, 你必保守他十分平安, 因為他倚靠你。
4 सर्वकाळ परमेश्वरावर विश्वास ठेव, कारण प्रभू परमेश्वर, याच्या ठायी सर्वकाळचा खडक आहे.
你們當倚靠耶和華直到永遠, 因為耶和華是永久的磐石。
5 कारण जे अभिमानाने राहतात त्यांना तो खाली आणील, तो उंच गढांना, खाली आणणार, तो तिला भूमीपर्यंत खाली नीच करणार, तो तिला धुळीस मिळवणार.
他使住高處的與高城一併敗落, 將城拆毀,拆平,直到塵埃,
6 दीनदुबळ्यांचे पाय व दरिद्र्यांचे पाय त्यांना तुडवतील.
要被腳踐踏, 就是被困苦人的腳和窮乏人的腳踐踏。
7 सरळपण हा नितीमानाचा मार्ग आहे, जो तू सरळ आहेस तो तू नितीमानाची वाट सपाट करतो.
義人的道是正直的; 你為正直的主,必修平義人的路。
8 होय, परमेश्वरा, तुझ्या न्यायाच्या मार्गात आम्ही तुझी वाट पाहिली आहे, आमच्या जीवाची इच्छा तुझ्या नावाकडे, तुझ्या स्मरणाकडेच आहे.
耶和華啊,我們在你行審判的路上等候你; 我們心裏所羨慕的是你的名, 就是你那可記念的名。
9 प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, माझा आत्मा माझ्यामध्ये आतुरतेने तुला शोधीन, कारण जेव्हा तुझा न्याय या पृथ्वीवर येतो, तेव्हा या जगातील राहणारे न्यायीपण शिकतात.
夜間,我心中羨慕你; 我裏面的靈切切尋求你。 因為你在世上行審判的時候, 地上的居民就學習公義。
10 १० पापी मनुष्यावर तू फक्त दयाच करीत राहिलास तर तो कधीच न्यायीपण शिकणार नाही. सरळपणाच्या भूमीत तो दुष्टतेनेच वागणार, आणि परमेश्वराचा महिमा पाहणार नाही.
以恩惠待惡人, 他仍不學習公義; 在正直的地上,他必行事不義, 也不注意耶和華的威嚴。
11 ११ परमेश्वरा, तुझा हात उंचावलेला आहे, पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुझ्या लोकांबद्दल असलेला तुझा आवेश ते पाहतील आणि फजित होतील. तुझे शत्रू नक्कीच त्यांच्याच आगीत भस्मसात होतील.
耶和華啊,你的手高舉, 他們仍然不看; 卻要看你為百姓發的熱心,因而抱愧, 並且有火燒滅你的敵人。
12 १२ परमेश्वरा, तू आमच्यासाठी शांती ठरवशील, कारण खरच तू आमची सर्व कामे आमच्यासाठी पूर्ण केले आहेत.
耶和華啊,你必派定我們得平安, 因為我們所做的事都是你給我們成就的。
13 १३ परमेश्वर आमचा देव, तुला सोडून इतर देवतांनी आम्हावर राज्य केले. पण आम्ही फक्त तुझीच स्तुती करतो.
耶和華-我們的上帝啊, 在你以外曾有別的主管轄我們, 但我們專要倚靠你,提你的名。
14 १४ ते मृत आहेत, ते जिवंत नाहीत; ते प्रेते आहेत, ते उठणार नाहीत. खरोखर, तू त्यांना दंड देऊन त्यांचा नाश केला आहेस आणि त्यांची आठवण तू नष्ट केली आहेस.
他們死了,必不能再活; 他們去世,必不能再起; 因為你刑罰他們,毀滅他們, 他們的名號就全然消滅。
15 १५ हे परमेश्वरा, तू राष्ट्र वाढवले आहेस, तू राष्ट्र वाढवले आहे, तू सन्मानीत आहेस, तू भूमीच्या सर्व सीमा विस्तारित केल्या आहेत.
耶和華啊,你增添國民, 你增添國民; 你得了榮耀, 又擴張地的四境。
16 १६ परमेश्वरा, संकटात असताना ते तुझे स्मरण करतात. तुझी शिक्षा त्यांच्यावर असता त्यांनी तुझ्यापुढे प्रार्थना केली.
耶和華啊,他們在急難中尋求你; 你的懲罰臨到他們身上, 他們就傾心吐膽禱告你。
17 १७ जेव्हा एखादी स्त्री प्रसूतीची वेळ जवळ आली म्हणजे ती वेदनेने विव्हळते आणि आपल्या वेदनांमध्ये ओरडते, प्रभू, तसे आम्ही तुझ्यापुढे आहोत.
婦人懷孕,臨產疼痛, 在痛苦之中喊叫; 耶和華啊,我們在你面前也是如此。
18 १८ त्याचप्रमाणे आम्ही गरोदर होतो, आम्ही प्रसूतीवेदनेमध्ये होतो, पण आम्ही फक्त वाऱ्याला जन्म दिला. पृथ्वीत आम्ही काही तारण केले नाही, आणि जगातील राहणारे पडले नाहीत.
我們也曾懷孕疼痛, 所產的竟像風一樣。 我們在地上未曾行甚麼拯救的事; 世上的居民也未曾敗落。
19 १९ तुझे मरण पावलेले जिवंत होतील, आमचे मृत शरीरे उठतील. जे धुळीत स्थायिक झाले ते तुम्ही जागे व्हा आणि आनंदाने गायन करा. कारण तुझ्यावरील दहिवर हे प्रभातीचे जिवनदायी दहिवर आहे, पृथ्वी तिचे भक्ष तिच्यातील मृत बाहेर टाकील.”
死人要復活, 屍首要興起。 睡在塵埃的啊,要醒起歌唱! 因你的甘露好像菜蔬上的甘露, 地也要交出死人來。
20 २० माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा आणि दारे लावून घ्या. क्रोध टळून जाईपर्यंत थोडा वेळासाठी लपा.
我的百姓啊,你們要來進入內室, 關上門,隱藏片時, 等到忿怒過去。
21 २१ कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.
因為耶和華從他的居所出來, 要刑罰地上居民的罪孽。 地也必露出其中的血, 不再掩蓋被殺的人。

< यशया 26 >