< यशया 24 >
1 १ पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.
देखो ख़ुदावन्द ज़मीन को ख़ाली और सरनगूँ करके वीरान करता है और उसके बाशिन्दों को तितर — बितर कर देता है।
2 २ आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी, जशी विकत घेणाऱ्याची तशी विकणाऱ्याची, जशी उसणे देणाऱ्याची तशी उसणे घेणाऱ्याची, जशी उधार घेणाऱ्याची तशी जो त्यास उधार देतो त्याची स्थिती होईल.
और यूँ होगा कि जैसा र'इयत का हाल, वैसा ही काहिन का; जैसा नौकर का, वैसा ही उसके साहिब का; जैसा लौंडी का, वैसा ही उसकी बीबी का; जैसा ख़रीदार का, वैसा ही बेचनेवाले का; जैसा क़र्ज़ देनेवाले का, वैसा ही क़र्ज़ लेनेवाले का; जैसा सूद देनेवाले का, वैसा ही सूद लेनेवाले का।
3 ३ पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे.
ज़मीन बिल्कुल ख़ाली की जाएगी, और बशिद्दत ग़ारत होगी; क्यूँकि यह कलाम ख़ुदावन्द का है।
4 ४ मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे.
ज़मीन ग़मगीन होती और मुरझाती है, जहाँ बेताब और पज़मुर्दा होता है, ज़मीन के 'आली क़द्र लोग नातवान होते हैं।
5 ५ पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले, आणि सार्वकालीक करार मोडला आहे.
ज़मीन अपने बाशिन्दों से नापाक हुई, क्यूँकि उन्होंने शरी'अत को 'उदूल किया, क़ानून से मुन्हरिफ़ हुए, हमेशा के 'अहद को तोड़ा।
6 ६ त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत. त्यांना त्याचे फळ भोगावे लागत आहे; शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील.
इस वजह से ला'नत ने ज़मीन को निगल लिया और उसके बाशिन्दे मुजरिम ठहरे, और इसीलिए ज़मीन के लोग भसम हुए और थोड़े से आदमी बच गए।
7 ७ नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत.
मय ग़मज़दा, ताक पज़मुर्दा है; और सब जो दिलशाद थे आह भरते हैं।
8 ८ डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मौजमजा करीत ते थांबले आहेत, वीणेचा आनंद बंद केला आहे.
ढोलकों की ख़ुशी बन्द हो गई, ख़ुशी मनानेवालों का गु़ल — ओ — शोर तमाम हुआ, बरबत की शादमानी जाती रही।
9 ९ ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल.
वह फिर गीत के साथ मय नहीं पीते, पीनेवालों को शराब तल्ख़ मा'लूम होगी।
10 १० अंदाधूंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे.
सुनसान शहर वीरान हो गया, हर एक घर बन्द हो गया कि कोई अन्दर न जा सके।
11 ११ द्राक्षरसामुळे चौका चौकात रडणे आहे. सर्व हर्ष अंधकारमय आहे, भूमीचा आनंद नाहीसा झाला आहे.
मय के लिए बाज़ारों में वावैला हो रहा है; सारी ख़ुशी पर तारीकी छा गई, मुल्क की 'इश्रत जाती रही।
12 १२ नगरात ओसाडी उरली आहे, आणि दरवाज्याचा नाश झाला आहे.
शहर में वीरानी ही वीरानी है, और फाटक तोड़ फोड़ दिए गए।
13 १३ द्राक्षांचा हंगाम सपंल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर, झाडावर जशी थोडीशी फळे उरतात तशी या देशाची अवस्था झालेली असणार तसे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे होईल.
क्यूँकि ज़मीन में लोगों के बीच यूँ होगा जैसा जै़तून का दरख़्त झाड़ा जाए, जैसे अंगूर तोड़ने के बाद ख़ोशा — चीनी।
14 १४ ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर्य ओरडतील, आणि समुद्रावरून मोठ्याने आरोळी मारतील.
वह अपनी आवाज़ बलन्द करेंगे, वह गीत गाएँगे; ख़ुदावन्द के जलाल की वजह से समन्दर से ललकारेंगे।
15 १५ यास्तव पूर्वेत परमेश्वराचे गौरव करा, आणि सागरातील द्वीपांमध्ये इस्राएलाचा देव परमेश्वर, याच्या नावाला गौरव द्या.
तुम पूरब में ख़ुदावन्द की और समन्दर के जज़ीरों में ख़ुदावन्द के नाम की, जो इस्राईल का ख़ुदा है, तम्जीद करो।
16 १६ पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मिकास वैभव असो.” पण मी म्हणालो, मी वाया गेलो आहे, मी दूर वाया गेलो आहे, मला हाय हाय! कारण विश्वास घातकीने विश्वासघात केला आहे, होय, विश्वास घातक्याने विश्वास घात केला आहे.
इन्तिहा — ए — ज़मीन से नग़मों की आवाज़ हम को सुनाई देती है, जलाल — ओ — 'अज़मत सादिक़ के लिए। लेकिन मैंने कहा, मैं गुदाज़ हो गया, मैं हलाक हुआ; मुझ पर अफ़सोस! दग़ाबाज़ों ने दग़ा की; हाँ, दग़ाबाज़ों ने बड़ी दग़ा की।
17 १७ पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत.
ऐ ज़मीन के बाशिन्दे, ख़ौफ़ और गढ़ा और दाम तुझ पर मुसल्लित हैं।
18 १८ जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खांचेत पडेल, आणि जो खांचेमधून वर निघेल तो पाशात पडेल. स्वर्गाच्या खिडक्या उघडल्या आहेत, आणि पृथ्वीचे पाये हालत आहेत.
और यूँ होगा कि जो ख़ौफ़नाक आवाज़ सुन कर भागे, गढ़े में गिरेगा; और जो गढ़े से निकल आए, दाम में फँसेगा; क्यूँकि आसमान की खिड़कियाँ खुल गईं, और ज़मीन की बुनियादें हिल रही हैं।
19 १९ पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे. पृथ्वी फार हिंसकरीतीने हलवली आहे.
ज़मीन बिल्कुल उजड़ गई, ज़मीन यकसर शिकस्ता हुई, और शिद्दत से हिलाई गई।
20 २० पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकांड्या खाईल, आणि एखाद्या टांगत्या बिछान्याप्रमाने झोके खाईल, तिचा अपराध तिच्यावर भारी होईल तेव्हा ती पडेल आणि पुन्हा उठणार नाही.
वह मतवाले की तरह डगमगाएगी और झोपड़ी की तरह आगे पीछे सरकाई जाएगी; क्यूँकि उसके गुनाह का बोझ उस पर भारी हुआ, वह गिरेगी और फिर न उठेगी।
21 २१ त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल.
और उस वक़्त यूँ होगा कि ख़ुदावन्द आसमानी लश्कर को आसमान पर और ज़मीन के बादशाहों को ज़मीन पर सज़ा देगा।
22 २२ त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील, नंतर त्यांचा न्याय केला जाईल.
और वह उन कै़दियों की तरह जो गढ़े में डाले जाएँ, जमा' किए जाएँगे और वह कै़दख़ाने में कै़द किए जाएँगे, और बहुत दिनों के बाद उनकी ख़बर ली जाएगी।
23 २३ नंतर सेनाधीश परमेश्वर सीयोनातील आपला राजासनावर आरूढ होईल तेव्हा त्याच्या तेजाने चंद्र तांबूस होईल व सूर्य फिका पडेल, तो सियोन पर्वतावरून आपल्या वडिलांसमोर वैभवाने यरूशलेमेत राज्य करील.
और जब रब्ब — उल — अफ़वाज सिय्यून पहाड़ पर और येरूशलेम में अपने बुज़ुर्ग बन्दों के सामने हश्मत के साथ सल्तनत करेगा, तो चाँद मुज़्तरिब' सूरज शर्मिन्दा होगा।