< यशया 22 >
1 १ दृष्टांताच्या खोऱ्याविषयी ही देववाणी; तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?
Beszéd a Látomás völgyéről. Mi lelt vajon, hogy fölmentél mindenestől a háztetőkre?
2 २ एक गोंगाटाने भरलेले शहर, आंनदाने भरलेली नगरी, तुझ्यातील जे तलवारीने ठार केलेले नाहीत आणि जे युद्धात मारले गेले नाहीत.
Zajjal teli zúgó város, ujjongó város megöltjeid nem kardnak megöltjei és nem harcnak halottjai.
3 ३ तुझे सर्व अधिकारी एकत्र होऊन पळाले, त्यांना धनुर्धारांनी धरले आहे, तुझ्यामध्ये जे सापडले त्या सर्वांना त्यांनी एकवट करून बांधले, ते दूर पळाले आहेत.
Vezéreid mind elszöktek egyetemben, íj nélkül fogattak el: mind, akik a tieid közül találtattak, elfogattak egyetemben: messzire menekültek.
4 ४ यास्तव मी म्हणालो, माझ्याकडे पाहू नका, मी कष्टाने रडेन, माझ्या लोकांच्या मुलीच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करु नका.
Azért mondtam: Forduljatok el tőlem, hadd sírjak keservesen; ne erőlködjetek vigasztalni engem népem leányának pusztulása miatt.
5 ५ कारण हा गोंगाटाचा, पायाखाली तुडवण्याचा आणि गडबडीचा दिवस सेनाधीश परमेश्वर, प्रभू याजकडून दृष्टांताच्या खोऱ्यात आला आहे. त्या दिवशी लोक भिंती फोडतील आणि डोंगराकडे ओरडतील.
Mert megzavarás, eltiprás és zavarodás napja lesz az Úrnak, az Örökkévalónak, a seregivel: urának a látomás völgyében, szétrombolva a falat, és kiáltás a hegy felé.
6 ६ एलामाने मनुष्यांचा रथ आणि घोडेस्वार घेऊन बाणांचा भाता वाहिला, आणि कीराने ढाल उघडी केली.
És Elám felvette a tegezt, szekérhad emberei meg lovasok, Kír pedig pajzsot meztelenített.
7 ७ आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील.
És völgyeidnek java telve lett szekérhaddal, és a lovasok elhelyezkedtek a kapu felé.
8 ८ त्याने यहूदावरील रक्षण काढून घेतले आहे, आणि त्या दिवशी तू वनांतील घरांत शस्त्रांवर दृष्टी लावली.
És fölfedte Jehúdának takaróját, és föltekintettél azon napon az erdőház fegyverére;
9 ९ दाविदाच्या नगराला पुष्कळ भगदाडे पडलेली तुम्ही पाहिले आहे, आणि तुम्ही खालच्या तळ्यातील पाणी जमा केले.
s Dávid városának repedéseit láttátok, hogy számosak; és összegyűjtöttétek az alsó tó vizét;
10 १० तू यरूशलेमेच्या घरांची मोजदाद केली, आणि भिंत बळकट करण्यासाठी तू घरे फोडली.
és Jeruzsálem házait megszámláltátok és lebontottátok a házakat, hogy erősítsétek a falat;
11 ११ दोन भिंतीच्या मध्ये हौद बांधून जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी सोय केली. पण तू शहर बांधनाऱ्याचा विचार केला नाही, ज्याने त्या बद्दल पूर्वीच योजिले होते.
és vízfogót csináltatok a két fal között a régi tó vizének, de nem tekintettetek arra, aki ezt teszi, és aki régtől fogva alkotja, azt nem láttátok.
12 १२ त्या दिवसात सेनाधीश परमेश्वर म्हणाला, रडावे, शोक करावा व टक्कल पाडावे आणि गोणताट घालावे.
És felhívott az Úr, az Örökkévaló a seregek ura ama napon sírásra és gyásztartásra, kopaszságra és gyászövezésre;
13 १३ परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे.
de íme vígság és öröm, ölnek marhát és vágnak juhot, esznek húst és isznak bort: együnk és igyunk, mert holnap meghalunk.
14 १४ आणि सैन्याच्या परमेश्वराने माझ्या कानात हे सांगितले की, जरी तू मेलास, तरी या तुझ्या पापांची क्षमा केली जाणार नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.
És megnyilatkozott füleim előtt az Örökkévaló a seregek ura: nem bocsáttatik meg nektek ez a bűn, míg meg nem haltok, szólt az Úr, az Örökkévaló a seregek ura.
15 १५ सेनाधीश परमेश्वर, प्रभू असे म्हणतो, हा कारभारी शेबना, जो राजाच्या घरावर नेमला आहे, त्याकडे जा व त्यास बोल;
Így szól az Úr, az Örökkévaló a seregek ura: Eredj, menj el ehhez az intézőhöz, Sebnához, ki a ház fölött van.
16 १६ तू येथे काय करीत आहेस? तू कोण आहेस? जसा कोणी आपली कबर उंच ठिकाणांत खोदतो आणि आपले राहण्याचे स्थान खडकामध्ये करतो तशी तू आपणासाठी कबर खोदीत आहेस.
Mid van itt és kid van itt, hogy magadnak sírt vágtál itt? Aki magasban vágja sírját, a sziklában váj magának hajlékot!
17 १७ पाहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला फेकून देईल आणि तुला घट्ट धरील.
Íme az Örökkévaló elhajít téged elhajítással, oh férfi, megragadva megragad téged,
18 १८ तो तुला गुंडाळून चेंडुसारखा मोठ्या देशात फेकून देईन, तू आपल्या धन्याच्या घरात अप्रतिष्ठा असा आहेस तो तू मरशील, आणि तुझ्या गौरवाचे रथ तेथेच राहतील.
gomolyítva gomolyit téged gomolyítással, mint labdát széles határú földre; ott fogsz meghalni, ott lesznek dicső szekereid, urad házának szégyene te!
19 १९ प्रभू परमेश्वर म्हणतो मी तुला उच्च पदावरून काढून टाकिल तुझे उच्च पद हिसकावून घेईल. तू खाली ओढला जाशील.
Letaszítlak állásodról, és helyedről ledöntenek téged.
20 २० आणि त्या दिवशी असे होईल हिल्कीयाचा पुत्र एल्याकीम यास मी बोलावीन.
És lesz azon napon, hívom szolgámat Eljákímot, Chilkíjáhú fiát;
21 २१ तुझा झगा मी त्यास घालीन आणि तुझा कमरबंध त्यास देईन व तुझे अधिकर मी त्याच्या हाती देईन. यरूशलेमेच्या राहणाऱ्यांना व यहूदाच्या घराण्याला पिता असा होईल.
és felöltöztetem a köntösödbe és öveddel erősítem, és uralmadat kezébe adom, hogy atyjává legyen Jeruzsálem lakójának és Jehúda házának.
22 २२ दाविदाच्या घराण्याची किल्ली मी त्याच्या खांद्यावर ठेवीन, तो उघडील आणि कोणीच ते बंद करणार नाही, आणि जे काही बंद करील ते कोणीच उघडू शकणार नाही.
És teszem vállára Dávid házának a kulcsát; ha nyit, nem zár senki; ha zár, nem nyit senki.
23 २३ त्यास मी सुरक्षीत ठिकाणी खिळ्याप्रमाणे पक्का करीन, आणि तो आपल्या पित्याच्या घराला वैभवशाली राजासन असे होईल.
És beütöm szegül szilárd helyre, és dicsőség székévé lesz atyja házának.
24 २४ त्याच्या पित्याच्या घराण्यातील सर्व गौरव, मुले व संतती, सर्व लहान पात्रे, पेल्यापासून सुरईपर्यंत सर्व भांडी तिच्यावर टांगून ठेवतील.
És ráaggatják atyja házának egész dicsőségét, a csemetéket és hajtásokat, mind a kis edényeket a medence edényektől egészen a korsó edényekig.
25 २५ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, मग असे घडेल की, भिंतीत पक्का केलेला खिळा असतो तो शिळ्या जवळ ढिला होउन पडेल व जो भार तिच्यावर होता तो छेदला जाईल, कारण परमेश्वर हे बोलला आहे.
Ama napon, úgymond az Örökkévaló a seregek ura, elmozdul a szilárd helyre beütött szeg, levágatik, leesik, és elpusztul a teher, mely rajta volt, mert az Örökkévaló szólt.