< यशया 21 >

1 समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी. जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.
O fardo da natureza selvagem do mar. À medida que os redemoinhos no Sul varrem, ele vem do sertão, de uma terra fantástica.
2 दु: खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे, विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो. हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल, मी तिचे सर्व उसासे थांबवीन.
Uma visão dolorosa é declarada a mim. O homem traiçoeiro lida traiçoeiramente, e o destruidor destrói. Sobe, Elam; ataca! Eu parei todos os suspiros da Mídia.
3 यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
Portanto, minhas coxas estão cheias de angústia. As dores me tomaram, como as dores de uma mulher em trabalho de parto. Estou com tanta dor que não consigo ouvir. Estou tão consternado que não consigo ver.
4 माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो. रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून.
Meu coração treme. O horror me assustou. O crepúsculo que eu desejava se transformou em tremor para mim.
5 त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले व प्याले, उठा, अधिकाऱ्यांनो, आपल्या ढालींना तेल लावा.
Eles preparam a mesa. Eles preparam o relógio. Eles comem. Eles bebem. Levantem-se, seus príncipes, olear o escudo!
6 जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले, तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी.
Pois o Senhor me disse: “Vão, ponham um vigia. Deixem-no declarar o que ele vê.
7 जेव्हा तो रथ, घोडेस्वार, गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील, तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.
Quando ele vir uma tropa, cavaleiros aos pares, uma tropa de burros, uma tropa de camelos, ele escutará diligentemente com grande atenção”.
8 पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला, हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो.
Ele chorou como um leão: “Senhor, eu fico continuamente na torre de vigia durante o dia, e todas as noites fico no meu posto.
9 आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे. त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली, आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.
Eis que aí vem uma tropa de homens, cavaleiros em pares”. Ele respondeu: “Caído, caído é Babilônia; e todas as imagens gravadas de seus deuses são quebradas até o chão”.
10 १० हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.
Você é minha debulha, e o grão do meu chão”! O que ouvi de Javé dos Exércitos, o Deus de Israel, eu o declarei a vocês”.
11 ११ दूमाविषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?
O fardo da Dumah. Uma pessoa me chama de Seir: “Vigia, e a noite? Guardião, e a noite?”
12 १२ पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.
O vigia disse: “A manhã vem, e também a noite”. Se você quiser perguntar, pergunte. Volte novamente”.
13 १३ अरेबिया विषयी घोषणा, ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.
The carga sobre a Arábia. Vocês se hospedarão na mata da Arábia, suas caravanas de Dedanites.
14 १४ अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा, पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.
Eles trouxeram água para aquele que tinha sede. Os habitantes da terra de Tema encontraram os fugitivos com seu pão.
15 १५ कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.
Pois eles fugiram das espadas, da espada desembainhada, do arco dobrado e do calor da batalha.
16 १६ कारण परमेश्वराने मला सांगितले, एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.
Pois o Senhor me disse: “Dentro de um ano, como um trabalhador vinculado por contrato o contaria, toda a glória de Kedar falhará,
17 १७ फक्त थोडेच धनुर्धारी, वीर योद्धा केदार मध्ये उरतील, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर हे बोलला आहे.
e o resíduo do número dos arqueiros, os homens poderosos dos filhos de Kedar, serão poucos; pois Yahweh, o Deus de Israel, o disse”.

< यशया 21 >