< यशया 21 >
1 १ समुद्राजवळच्या राणाविषयी ही देववाणी. जसा दक्षिणेचा वादळवारा सर्व काही खरडून नेतो त्याप्रकारे तो रानांतून, भयंकर देशातून येत आहे.
해변 광야에 관한 경고라 적병이 광야에서 두려운 땅에서 남방 회리바람 같이 몰려왔도다
2 २ दु: खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे, विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो. हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल, मी तिचे सर्व उसासे थांबवीन.
혹독한 묵시가 내게 보였도다 주께서 가라사대 속이는 자는 속이고 약탈하는 자는 약탈하도다 엘람이여 올라가고 매대여 에워싸라 그의 모든 탄식을 내가 그치게 하였노라 하시도다
3 ३ यास्तव माझ्या कंबरेत वेदना भरल्या आहेत, प्रसुती वेदनेप्रमाणे तडफडणाऱ्या स्त्री प्रमाणे त्या वेदनांनी मला पकडले आहे. जे मी ऐकले त्यामुळे मी खाली वाकलो आहे, जे मी पाहिले त्यामुळे मी विचलीत झालो.
이러므로 나의 요통이 심하여 임산한 여인의 고통 같은 고통이 내게 임하였으므로 고통으로 인하여 듣지 못하며 놀라서 보지 못하도다
4 ४ माझे हृदय धडधडते, थरकाप माझ्यावर हावी होतो. रात्र मला किती सुखावह वाटे, ती आता मला भेदरून टाकणारी झाली असून.
내 마음이 진동하며 두려움이 나를 놀래며 희망의 서광이 변하여 내게 떨림이 되도다
5 ५ त्यांनी मेज तयार केला, त्यांनी कापड पसरवले आणि खाल्ले व प्याले, उठा, अधिकाऱ्यांनो, आपल्या ढालींना तेल लावा.
그들이 식탁을 베풀고 파수꾼을 세우고 먹고 마시도다 너희 방백들아 일어나 방패에 기름을 바를지어다
6 ६ जा, त्या ठिकाणी एक पहारेकरी ठेव असे प्रभूने मला सांगितले, तो जे काही पाहणार त्याची वार्ता सांगावी.
주께서 내게 이르시되 가서 파수꾼을 세우고 그 보는 것을 고하게 하되
7 ७ जेव्हा तो रथ, घोडेस्वार, गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील, तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.
마병대가 쌍쌍이 오는 것과 나귀떼와 약대떼를 보거든 자세히 유심히 들으라 하셨더니
8 ८ पहारेकरी सिंहनाद करून म्हणाला, हे प्रभू, पाहाऱ्याच्या बुरूजावर मी रोज दिवसभर उभा असतो आणि पूर्ण रात्र मी आपल्या चौकीवर उभा राहतो.
파수꾼이 사자 같이 부르짖기를 주여 내가 낮에 늘 망대에 섰었고 밤이 맞도록 파수하는 곳에 있었더니
9 ९ आणि जोडी जोडीने चालणाऱ्या घोडस्वारांचे एक सैन्य येत आहे. त्याने म्हटले, बाबेल पडली, पडली, आणि तिच्या सर्व कोरीव देव मूर्तींचा पूर्ण पणे नाश होऊन ते जमिनीस मिळाल्या आहेत.
마병대가 쌍쌍이 오나이다 그가 대답하여 가라사대 함락되었도다 함락되었도다 바벨론이여 그 신들의 조각한 형상이 다 부숴져 땅에 떨어졌도다 하시도다
10 १० हे माझ्या मळणी केलेल्या आणि खळ्यांतील धान्या! माझ्या खळ्यातील लेकरा! सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, ह्याकडून जे काही मी ऐकले, ते तुम्हास घोषीत केले.
너 나의 타작한 것이여 나의 마당의 곡식이여 내가 이스라엘의 하나님 만군의 여호와께 들은 대로 너희에게 고하였노라
11 ११ दूमाविषयीचा घोषणा, सेईर येथून मला कोणी मला हाक मारतो, पहारेकऱ्या, रात्री काय राहिल? पहारेकऱ्या, रात्री काय राहिल?
두마에 관한 경고라 사람이 세일에서 나를 부르되 파수꾼이여 밤이 어떻게 되었느뇨 파수꾼이여 밤이 어떻게 되었느뇨
12 १२ पाहारेकरी म्हणाला, सकाळ येते व रात्रही येते, जर तुम्ही विचाराल तर विचारा आणि परत या.
파수꾼이 가로되 아침이 오나니 밤도 오리라 네가 물으려거든 물으라 너희는 돌아올지니라
13 १३ अरेबिया विषयी घोषणा, ददानीच्या काफिल्यालो, अरबस्तानच्या रानांत तुम्ही रात्र घालवणार.
아라비아에 관한 경고라 드단 대상이여 너희가 아라비아 수풀에서 유숙하리라
14 १४ अहो तेमाच्या राहणाऱ्यांनो, तहानलेल्यांना पाणी आणा, पळून गेलेल्यांना भाकरी घेऊन भेटा.
데마 땅의 거민들아 물을 가져다가 목마른 자에게 주고 떡을 가지고 도피하는 자를 영접하라
15 १५ कारण ते तलवारी, वाकवलेले धनुष्य, काढलेल्या तलवारी आणि युद्धाच्या दडपणापासून पळाले आहेत.
그들이 칼날을 피하며 뺀 칼과 당긴 활과 전쟁의 어려움에서 도망하였음이니라
16 १६ कारण परमेश्वराने मला सांगितले, एका वर्षाच्या आत, जसा मोलकरी एका वर्षासाठी नियूक्त केला जातो, त्याच प्रकारे केदारचे वैभव तुम्ही संपलेले पाहाल.
주께서 이같이 내게 이르시되 품군의 정한 기한 같이 일 년내에 게달의 영광이 다 쇠멸하리니
17 १७ फक्त थोडेच धनुर्धारी, वीर योद्धा केदार मध्ये उरतील, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर हे बोलला आहे.
게달 자손 중 활 가진 용사의 남은 수가 적으리라 하시니라 이스라엘의 하나님 여호와의 말씀이니라