< यशया 20 >
1 १ ज्या वर्षी सेनापती तर्तान अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले.
In the yeere that Tartan came to Ashdod, (when Sargon King of Asshur sent him) and had fought against Ashdod, and taken it,
2 २ त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा व तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला.
At the same time spake the Lord by ye hand of Isaiah the sonne of Amoz, saying, Goe, and loose the sackecloth from thy loynes, and put off thy shooe from thy foote. And he did so, walking naked and barefoote.
3 ३ परमेश्वर म्हणाला, “माझा सेवक यशया ज्याप्रमाणे मिसराविषयी आणि कूशाविषयी चिन्ह व शकुन असा तीन वर्षे नग्न व अनवाणी चालला आहे,
And the Lord said, Like as my seruant Isaiah hath walked naked, and barefoote three yeeres, as a signe and wonder vpon Egypt, and Ethiopia,
4 ४ त्याप्रमाणे मिसऱ्यांना लाज वाटावी म्हणून अश्शूरचा राजा मिसरच्या कैद्यांना व कूशाच्या तडीपार केलेल्या तरुणांना व वृद्धांना, नग्न आणि अनवाणी आणि त्यांचे कुल्ले उघडे करून नेईल.
So shall the King of Asshur take away the captiuitie of Egypt, and the captiuitie of Ethiopia, both yong men and olde men, naked and barefoote, with their buttockes vncouered, to the shame of Egypt.
5 ५ जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.”
And they shall feare, and be ashamed of Ethiopia their expectation, and of Egypt their glory.
6 ६ त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”
Then shall the inhabitant of this yle say in that day, Behold, such is our expectation, whither we fledde for helpe to be deliuered from the King of Asshur, and howe shall we be deliuered?