< यशया 2 >

1 यरूशलेम व यहूदा याविषयीच्या गोष्टी दृष्टांताद्वारे आमोज याचा मुलगा यशया यास प्राप्त झाल्या.
Ésaiásnak, Ámós fiának beszéde, a melyet látott Júda és Jeruzsálem felől.
2 शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.
Lészen az utolsó időkben, hogy erősen fog állani az Úr házának hegye, hegyeknek felette, és magasabb lészen a halmoknál, és özönleni fognak hozzá minden pogányok;
3 “चला, आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ, म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकवील व आपण त्याच्या मार्गात चालू” असे पुष्कळ लोक म्हणतील. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरूशलेमेतून देवाचे वचन बाहेर येईल.
És eljönnek sok népek, mondván: Jertek menjünk fel az Úr hegyére, Jákób Istenének házához, hogy megtanítson minket az Ő útaira, és mi járjunk az Ő ösvényein, mert tanítás Sionból jő, és Jeruzsálemből az Úrnak beszéde;
4 तो राष्ट्रांमध्ये न्याय करील व अनेक लोकांबद्दल निर्णय देईल, ते आपल्या तलवारी मोडून त्याचे फाळ बनवतील व आपल्या भाल्यांचे कोयते करतील, यानंतर राष्ट्र राष्ट्रांवर तलवार उगारणार नाही किंवा युद्धकला सुद्धा अवगत करणार नाही.
Ki ítéletet tesz a pogányok között, és bíráskodik sok nép felett; és csinálnak fegyvereikből kapákat, és dárdáikból metszőkéseket, és nép népre kardot nem emel, és hadakozást többé nem tanul.
5 याकोबाच्या घराण्या, ये, आणि आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.
Jákóbnak háza! jertek járjunk az Úrnak világosságában!
6 कारण तू तुझ्या लोकांचा म्हणजे याकोबाच्या घराण्याचा त्याग केला आहेस, कारण ते पूर्वेकडील लोकांच्या चालीरितीने भरले आहेत आणि ते पलिष्ट्याप्रमाणे शकुन पाहणारे आहेत, व ते परदेशी लोकांच्या पुत्रांबरोबर हातमिळवणी करतात.
Mert elhagytad, Uram, a Te népedet, Jákób házát; mivel telvék napkeleti erkölcsökkel, és szemfényvesztők, mint a Filiszteusok, és idegenek fiaival kötnek szövetséget;
7 त्यांची भूमी चांदी व सोन्याने भरगच्च झाली आहे; त्यांच्या श्रीमंतीला सीमा राहिलेली नाही, त्यांची भूमी घोडे व रथ यांनी भरलेली असून त्यासही सीमा उरलेली नाही.
És betelt földje ezüsttel és aranynyal, és nincs szere-száma kincseinek; betelt földje lovakkal, és nincs szere-száma szekereinek;
8 तसेच त्यांची संपूर्ण भूमी मूर्तींनी भरलेली आहे; ते स्वहस्ते बनविलेल्या कलाकृतीची, स्वतःच्या बोटांनी बनविलेल्या गोष्टीची पूजा करतात.
És betelt földje bálványokkal, és kezeik csinálmányának hajolnak meg, mit ujjaik csináltak.
9 ते लोक पाया पडतील, आणि वैयक्तिक खाली पडतील; म्हणून त्यांचा स्विकार करू नका.
Ezért porba hajtatik a közember, és megaláztatik a főember, és meg nem bocsátsz nékik.
10 १० खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून जमिनीत लप.
Menj be a kősziklába, és rejtőzzél el a porba az Úr félelme elől, és az Ő nagyságának dicsősége előtt.
11 ११ न्यायाच्या त्या दिवशी गर्विष्ठ मनुष्याची दृष्टी नीच केली जाईल, व त्याचा गर्व खाली करण्यात येईल, आणि फक्त परमेश्वराचेच नाव उंचावले जाईल.
A kevély szemű közember megaláztatik, és a főemberek magassága porba hajtatik, és csak az Úr magasztaltatik fel ama napon.
12 १२ कारण सेनाधीश परमेश्वराचा दिवस, प्रत्येक गर्विष्ठ व उंचावलेला यांच्या विरोधात, प्रत्येक उन्मत्त व्यक्तीच्या विरोधात येईल व तो नमविला जाईल.
Mert a seregek Urának napja eljő minden kevély és magas ellen, és minden felemelkedett ellen, és az megaláztatik.
13 १३ आणि लबानोनातील देवदारूची सर्व उंच झाडे, आणि बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे यांच्या विरोधात,
És Libánon minden czédrusai ellen, a melyek magasak és felemelkedettek, s Básánnak minden tölgyfái ellen;
14 १४ आणि सर्व उंच पर्वत व उंचावलेल्या टेकड्या यांच्या विरोधात,
Minden magas hegyek ellen, és minden felemelkedett halmok ellen;
15 १५ आणि प्रत्येक उंच बुरुज व प्रत्येक अभेद्य भिंत यांच्याविरोधात,
Minden magas torony ellen, és minden erős kőfal ellen;
16 १६ आणि तार्शीशातील सर्व जहाजे व समुद्र पर्यटन करणाऱ्या सर्व सुंदर नौका यांच्याविरोधात येईल.
És Társisnak minden hajói ellen, és minden gyönyörűséges drágaságok ellen.
17 १७ त्या दिवशी मनुष्याचा गर्व उतरवला जाईल, त्याचा ताठा गळून पडेल; फक्त परमेश्वरच उंचावला जाईल.
És porba hajtatik a közember kevélysége, és megaláztatik a főemberek magassága, és egyedül az Úr magasztaltatik fel ama napon.
18 १८ सर्व मूर्ती पूर्णपणे नष्ट होतील.
És a bálványokat teljességgel elveszti.
19 १९ परमेश्वर जेव्हा पृथीवर हाहाकार करण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयामुळे व त्याच्या तेजाच्या भव्यतेमुळे लोक खडकातील गुहेत व जमिनीतील भगदाडात शिरतील.
És bemennek a sziklák barlangjaiba és a föld hasadékaiba, az Úr félelme elől és nagyságának dicsősége előtt, mikor felkél, hogy megrettentse a földet.
20 २० त्या दिवशी लोक त्यांच्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती ज्या त्यांनी त्यांची पूजा करावयास बनविल्या त्या दूर फेकून देतील, ते त्या मूर्ती दूरवर उंदरांजवळ व वटवाघूळ यांच्याकडे फेकून देतील.
Ama napon odadobja az ember ezüst bálványait és arany bálványait, miket magának csinált, hogy azok előtt meghajoljon, a vakondokoknak és denevéreknek,
21 २१ जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल, तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील.
Hogy elmenjen a sziklák lyukaiba és a hegyek hasadékiba, az Úr félelme elől és az Ő nagyságának dicsősége előtt, mikor felkél, hogy megrettentse a földet.
22 २२ ज्याचे जीवन नाकपुड्यातील श्वासात आहे, त्या मनुष्यावर विश्वास ठेवण्याचे थांबवा, कारण त्यास काय जमेस धरायचे?
Oh szünjetek meg hát az emberben bízni, a kinek egy lehellet van orrában, mert hát ugyan mire becsülhető ő?

< यशया 2 >