< यशया 19 >

1 मिसराविषयी घोषणा. पाहा, परमेश्वर, वेगवान मेघावर स्वार होऊन मिसराकडे येत आहे; मिसराच्या मूर्ती त्याच्यापुढे थरथरतील आणि मिसऱ्यांचे हृदय आतल्या आत वितळेल.
پیامی برای مصر: خداوند بر ابری تندرو سوار شده و به جنگ مصر می‌آید. بتهای مصر در برابر او می‌لرزند و دلهای مصری‌ها از ترس ضعف می‌کنند.
2 देव म्हणतो, मी मिसऱ्यांना मिसराविरूद्ध चिथावेल, ते माणसे आपल्या भावाविरूद्ध, आणि आपल्या शेजाऱ्याविरूद्ध; नगर नगराविरूद्ध आणि राज्य राज्याविरूद्ध लढेल.
خداوند می‌فرماید: «مصری‌ها را بر ضد یکدیگر خواهم برانگیخت تا برادر با برادر، همسایه با همسایه، شهر با شهر، و مملکت با مملکت بجنگند.
3 मिसराचा उत्साह त्याच्यामध्ये कमजोर होईल. मी त्यांचा सल्ला नष्ट करील, जरी ते मूर्तीना, मृत मनुष्याच्या आत्म्याला, व मांत्रिकाजवळ व भूतवैद्यांचा सल्ला शोधतील.
تدبیرهایی را که مصری‌ها اندیشیده‌اند بی‌اثر خواهم کرد و آنان روحیهٔ خود را خواهند باخت. ایشان برای دریافت کمک، به بتهایشان پناه خواهند برد و برای چاره‌جویی، به احضارکنندگان ارواح و افسونگران و جادوگران متوسل خواهند شد.»
4 “मी मिसऱ्यांना एका कठोर धन्याच्या हातात देईन आणि एक सामर्थ्यवान राजा त्यांच्यावर राज्य करील. असे प्रभू सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
خداوند لشکرهای آسمان می‌فرماید: «من مصری‌ها را به دست حاکمی ستمگر و بیرحم تسلیم می‌کنم تا بر آنها حکمرانی کند.»
5 समुद्राचे पाणी पूर्ण कोरडे पडेल आणि नदी आटेल व रिक्त होईल.”
آب رود نیل کم خواهد شد و بعد از مدتی خشک خواهد گردید.
6 नद्यांना दुर्गंध येईल; मिसराचे प्रवाह कमी होतील आणि सुकून जातील. बोरू व लव्हाळे सुकून जातील
نهرها متعفن خواهند شد و آب جویها کم شده، خواهند خشکید. نی و بوریا پژمرده خواهند گردید،
7 नीलजवळचे बोरू, नीलच्या मुखाजवळची आणि नीलजवळ सर्व पेरलेली शेते सुकून जातील, धुळीत बदलतील आणि वाऱ्याने उडून जातील.
تمام سبزه‌ها و مزرعه‌های کنار رود نیل خشک شده، از بین خواهند رفت و تمام محصول تلف خواهد شد.
8 कोळी विलाप आणि शोक करतील व जे सर्व नील नदीत गळ टाकणारे शोक करतील त्यासारखे जे पाण्यावर जाळी पसरतात ते दुःखीत होतील.
همهٔ ماهیگیرانی که تور و قلاب به رود نیل می‌اندازند نومید خواهند شد و زاری خواهند کرد.
9 जे पिंजलेला ताग तयार करतात आणि जे पांढरे कापड विणतात ते निस्तेज होतील.
پارچه‌بافانی که با کتان پارچه می‌بافتند مأیوس خواهند گردید،
10 १० मिसरचे वस्त्र कामगार चिरडले जातील; जे सर्व मोलासाठी काम करतात ते नाउमेद होतील.
و همهٔ بافندگان و کارگران نومید و دل شکسته خواهند شد.
11 ११ सोअनाचे सरदार पूर्णपणे मूर्ख आहेत. फारोचे शहाणे सल्लागार बुद्धिहीन झाले आहेत. तुम्ही फारोला कसे म्हणू शकता, मी ज्ञानाचा मुलगा, प्राचीन काळच्या राजाचा मुलगा आहे?
بزرگان شهر صوعن نادانند و هر مشورت و پندی که به پادشاه مصر می‌دهند احمقانه است. پس چگونه به پادشاه می‌گویند: «ما از نسل حکیمان و پادشاهان قدیم هستیم!»
12 १२ मग ते, तुझी सुज्ञ माणसे कोठे आहेत? तर आता त्यांनी तुला सांगावे आणि सेनाधीश परमेश्वराने मिसराबद्दल काय योजले आहे ते त्यांनी समजावे.
ای پادشاه مصر مشاوران دانای تو کجا هستند؟ بگذار آنها به تو اطلاع دهند که خداوند لشکرهای آسمان بر ضد مصر چه اراده کرده است.
13 १३ सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत, नोफाचे सरदार फसले आहेत; जे तिच्या गोत्राची कोनशिला असे आहेत त्यांनी मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.
رهبران صوعن و ممفیس و تمام بزرگان مصر نادان و گمراهند و مصر را به نابودی کشانده‌اند.
14 १४ परमेश्वराने त्यांच्यामध्ये विकृतीचा आत्मा मिसळला आहे आणि जसा मद्यपी आपल्या ओकारीत लटपटत चालतो तसे त्यांनी सर्व कामात जे तिने केले, मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.
خداوند سرگیجه به آنها داده و آنها مردم مصر را مانند اشخاص مست که بر قی خود می‌افتند و بلند می‌شوند و نمی‌دانند به کجا می‌روند، گمراه کرده‌اند.
15 १५ तेथे मिसरासाठी डोके किंवा शेपूट, झावळ्याची फांदी किंवा लव्हाळा कोणीही एक काहीच करू शकत नाही.
هیچ‌کس نمی‌تواند مصر را نجات دهد نه بزرگ نه کوچک، نه ثروتمند و نه فقیر.
16 १६ त्या दिवशी मिसरी बायकांसारखे होतील. ते थरथर कापतील आणि भयभीत होतील कारण सेनाधीश परमेश्वर आपला हात वर उंचावेल तो त्यांच्यावर उगारील.
در آن روز، مصری‌ها مانند زنان ضعیف خواهند شد و هنگامی که ببینند خداوند لشکرهای آسمان دستش را برای مجازات آنان دراز کرده است از ترس خواهند لرزید.
17 १७ यहूदाची भूमी मिसराला लटपटविण्याचे कारण होईल. जेव्हा कोणीएक तिची आठवण त्यास करून देईल, ते घाबरतील, परमेश्वराने त्यांच्याविरुद्ध जी योजना आखली आहे त्यामुळे असे होईल.
ایشان با شنیدن اسم سرزمین یهودا به وحشت خواهند افتاد. این را خداوند لشکرهای آسمان اراده نموده است.
18 १८ त्या दिवशी मिसर देशामध्ये पाच नगरे कनानाची भाषा बोलतील आणि ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील. त्यातील एका नगरास सूर्याचे नगर म्हणतील.
در آن زمان، پنج شهر در سرزمین مصر از خداوند لشکرهای آسمان پیروی نموده، به زبان کنعانیان سخن خواهند گفت، و یکی از این شهرها «شهر آفتاب» نامیده خواهد شد.
19 १९ त्या दिवशी मिसर देशाच्या मध्ये परमेश्वरासाठी एक वेदी होईल आणि त्याच्या सीमेवर परमेश्वरासाठी एक दगडी स्तंभ होईल.
در آن روز، مذبحی در وسط مصر، و ستون یادبودی در مرز آن، برای خداوند بر پا خواهد شد.
20 २० ही मिसर देशात सेनाधीश परमेश्वराचे चिन्ह व साक्ष अशी होतील. कारण ते जुलूमामुळे परमेश्वराकडे जेव्हा आरोळी मारतील तेव्हा तो त्यांच्यासाठी एक तारणारा व संरक्षणकर्ता पाठवील, आणि तो त्यांना सोडवील.
اینها نشان دهندهٔ حضور خداوند لشکرهای آسمان در سرزمین مصر خواهند بود. از آن پس، هرگاه مصری‌ها دعا کرده، از خداوند بخواهند تا آنها را از دست ظالمان برهاند، او برای ایشان حامی و نجات دهنده‌ای خواهد فرستاد و ایشان را نجات خواهد داد.
21 २१ त्या काळी परमेश्वर मिसऱ्यांस ओळख करून देईल आणि मिसरी परमेश्वरास ओळखतील. ते यज्ञ व अर्पणासह उपासना करतील आणि बली अर्पण करतील. ते परमेश्वरास नवस करतील आणि तो पूर्ण करतील.
خداوند خود را به مصری‌ها آشکار خواهد کرد و ایشان خداوند را خواهند شناخت. مردم مصر با تقدیم قربانیها و هدایا او را عبادت خواهند کرد و نذرهای خود را به وی ادا خواهند نمود.
22 २२ परमेश्वर मिसराला पीडील, पीडील व बरे ही करील. ते परमेश्वराकडे परत येतील; तो त्यांची प्रार्थना ऐकेल व त्यांना बरे करील.
به این ترتیب، خداوند اول مصری‌ها را تنبیه خواهد کرد، سپس برگشته ایشان را شفا خواهد داد. بله، مصری‌ها به سوی خداوند بازگشت خواهند کرد و او دعایشان را شنیده، آنان را شفا خواهد داد.
23 २३ त्या दिवसात मिसरातून अश्शूराकडे महामार्ग होईल आणि अश्शूरी मिसरात व मिसरी अश्शूरात येईल; आणि मिसरी अश्शूऱ्यांच्या बरोबर उपासना करतील.
در آن روز، شاهراهی از مصر به آشور کشیده خواهد شد، و مصری‌ها و آشوری‌ها به سرزمینهای یکدیگر رفت و آمد خواهند کرد و هر دو یک خدا را خواهند پرستید.
24 २४ त्या दिवसात इस्राएल मिसराशी व अश्शूराशी मिळालेला असा तिसरा सोबती होईल; तो पृथ्वीच्यामध्ये आशीर्वाद होईल.
اسرائیل نیز با ایشان متحد خواهد شد و هر سه مملکت با هم باعث برکت تمام جهان خواهند گردید.
25 २५ सेनाधीश परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. मिसर माझे लोक व अश्शूर माझ्या हातचे कृत्य व इस्राएल माझे वतन आशीर्वादीत असो.
خداوند لشکرهای آسمان آنها را برکت داده، خواهد گفت: «متبارک باد قوم من مصر و صنعت دست من آشور و میراث من اسرائیل!»

< यशया 19 >