< यशया 15 >
1 १ मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले.
论摩押的默示: 一夜之间,摩押的亚珥变为荒废, 归于无有; 一夜之间,摩押的基珥变为荒废, 归于无有。
2 २ दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत.
他们上巴益,又往底本, 到高处去哭泣。 摩押人因尼波和米底巴哀号, 各人头上光秃, 胡须剃净。
3 ३ ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत
他们在街市上都腰束麻布, 在房顶上和宽阔处俱各哀号, 眼泪汪汪。
4 ४ हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे.
希实本和以利亚利悲哀的声音达到雅杂, 所以摩押带兵器的高声喊嚷, 人心战兢。
5 ५ मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाईमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करीत आहेत.
我心为摩押悲哀; 他的贵胄逃到琐珥, 到伊基拉·施利施亚。 他们上鲁希坡,随走随哭; 在何罗念的路上,因毁灭举起哀声。
6 ६ पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही.
因为宁林的水成为干涸, 青草枯干,嫩草灭没, 青绿之物,一无所有。
7 ७ यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत.
因此,摩押人所得的财物 和所积蓄的都要运过柳树河。
8 ८ मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे; त्यांचा आकांत एग्लाइमापर्यंत आणि बैर-एलीमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहचला आहे.
哀声遍闻摩押的四境; 哀号的声音达到以基莲; 哀号的声音达到比珥·以琳。
9 ९ दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.
底们的水充满了血; 我还要加增底们的灾难, 叫狮子来追上摩押逃脱的民 和那地上所余剩的人。