< यशया 14 >
1 १ परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील.
Il Signore infatti avrà pietà di Giacobbe e si sceglierà ancora Israele e li ristabilirà nel loro paese. A loro si uniranno gli stranieri, che saranno incorporati nella casa di Giacobbe.
2 २ राष्ट्रे त्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणावर आणतील. मग इस्राएलाचे घराणे त्यांना परमेश्वराच्या देशात दास व दासी करून ठेवतील. ज्यांनी त्यास बंदिवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवतील आणि ते आपल्या पीडणाऱ्यावर राज्य करतील.
I popoli li accoglieranno e li ricondurranno nel loro paese e se ne impossesserà la casa di Israele nel paese del Signore come schiavi e schiave; così faranno prigionieri coloro che li avevano resi schiavi e domineranno i loro avversari.
3 ३ त्या दिवशी तुझ्या दुःखापासून आणि यातनेपासून आणि तुजवर लादलेले कठीण दास्यापासून परमेश्वर तुला विसावा देईल,
In quel giorno il Signore ti libererà dalle tue pene e dal tuo affanno e dalla dura schiavitù con la quale eri stato asservito.
4 ४ बाबेलाच्या राजा विरूद्धचे हे टोचणारे गाणे तू म्हणशील, “जाचणाऱ्याचा कसा नाश झाला आहे, गर्विष्ठाचा त्वेष संपला.
«Ah, come è finito l'aguzzino, è finita l'arroganza! Allora intonerai questa canzone sul re di Babilonia e dirai:
5 ५ दुष्टाची काठी, अधिकाऱ्याचा जो राजदंड, तो परमेश्वराने मोडला आहे.
Il Signore ha spezzato la verga degli iniqui, il bastone dei dominatori,
6 ६ जो क्रोधाने लोकांस निरंतर ठोसे मारत असे, तो रागाने राष्ट्रावर राज्य करीत असे, कोणाला आडकाठी घालता येईना असा हल्ला करत असे तो परमेश्वराने मोडला आहे.
di colui che percuoteva i popoli nel suo furore, con colpi senza fine, che dominava con furia le genti con una tirannia senza respiro.
7 ७ सर्व पृथ्वी विसावा पावली आहे आणि शांत झाली आहे; त्यांनी गाणे गाऊन उत्सावाला सुरवात केली आहे.
Riposa ora tranquilla tutta la terra ed erompe in grida di gioia.
8 ८ लबानोनाचे गंधसरूबरोबर देवदारूवृक्षसुध्दा तुझ्यावर हर्षित होतात; ते म्हणतात, ‘तू खाली पडलास तेव्हापासून लाकडे कापणारा आम्हावर चढून आला नाही.’
Persino i cipressi gioiscono riguardo a te e anche i cedri del Libano: Da quando tu sei prostrato, non salgono più i tagliaboschi contro di noi.
9 ९ जेव्हा तू अधोलोकात खाली जाशील तेव्हा तुला भेटण्यास ते उत्सुक आहे. तो तुजसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व राजांना उठवील, सर्व राष्ट्रांच्या राजांना आपल्या सिंहासनावरून उठवीत आहे. (Sheol )
Gli inferi di sotto si agitano per te, per venirti incontro al tuo arrivo; per te essi svegliano le ombre, tutti i dominatori della terra, e fanno sorgere dai loro troni tutti i re delle nazioni. (Sheol )
10 १० ते सर्व बोलतील आणि तुला म्हणतील, ‘तू आमच्यासारखा अशक्त झाला आहे. तू आमच्या सारखा झाला आहे.
Tutti prendono la parola per dirti: Anche tu sei stato abbattuto come noi, sei diventato uguale a noi.
11 ११ तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे. तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’ (Sheol )
Negli inferi è precipitato il tuo fasto, la musica delle tue arpe; sotto di te v'è uno strato di marciume, tua coltre sono i vermi. (Sheol )
12 १२ हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!
Come mai sei caduto dal cielo, Lucifero, figlio dell'aurora? Come mai sei stato steso a terra, signore di popoli?
13 १३ जो तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढेन, देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन करीन, आणि उत्तरेच्या अगदी शेवटच्या भागात मी मंडळीच्या पर्वतावर बसेन.
Eppure tu pensavi: Salirò in cielo, sulle stelle di Dio innalzerò il trono, dimorerò sul monte dell'assemblea, nelle parti più remote del settentrione.
14 १४ मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’
Salirò sulle regioni superiori delle nubi, mi farò uguale all'Altissimo.
15 १५ तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे. (Sheol )
E invece sei stato precipitato negli inferi, nelle profondità dell'abisso! (Sheol )
16 १६ जे तुझ्याकडे निरखून पाहतील; तुझ्याबद्दल विचार करतील. ते म्हणतील, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष?
Quanti ti vedono ti guardano fisso, ti osservano attentamente. E' questo l'individuo che sconvolgeva la terra, che faceva tremare i regni,
17 १७ जो जग रानासारखे करीत असे, त्यांची नगरे उलथून टाकत असे आणि ज्यांने त्याच्या कैद्यांना आपल्या घरी जाऊ दिले नाही तो हाच का?’
che riduceva il mondo a un deserto, che ne distruggeva le città, che non apriva ai suoi prigionieri la prigione?
18 १८ सर्व राष्ट्रांचे राजे, त्यांच्यातील सर्व, गौरवाने प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या कबरेत निजले आहेत.
Tutti i re dei popoli, tutti riposano con onore, ognuno nella sua tomba.
19 १९ पण, तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे तुझ्या कबरेतून काढून बाहेर फेकले आहे. जे तलवारीने भोसकलेले, खाचेतल्या दगडांमध्ये खाली उतरले जातात, तसे तू मृत्युने झाकला आहेस.
Tu, invece, sei stato gettato fuori del tuo sepolcro, come un virgulto spregevole; sei circondato da uccisi trafitti da spada, come una carogna calpestata. A coloro che sono scesi in una tomba di pietre
20 २० जसे पाया खाली तुडवलेले मृत शरीर, तुला कधीच त्यांच्याबरोबर पुरण्यात येणार नाही, कारण तू आपल्या देशाचा नाश केला आहे. तू आपले लोक वधले आहेत, जे वाईट करणाऱ्यांची मुले आहेत आणि त्यांचा कधी पुन्हा उल्लेख होणार नाही.”
tu non sarai unito nella sepoltura, perché hai rovinato il tuo paese, hai assassinato il tuo popolo; non sarà più nominata la discendenza dell'iniquo.
21 २१ त्यांच्या पूर्वजांच्या अन्यायामुळे त्यांच्या मुलांसाठी तुम्ही कत्तल करण्याची तयारी करा, म्हणजे ते उठणार नाहीत आणि पृथ्वी ताब्यात घेणार नाहीत व संपूर्ण जग नगरांनी भरणार नाही.
Preparate il massacro dei suoi figli a causa dell'iniquità del loro padre e non sorgano più a conquistare la terra e a riempire il mondo di rovine».
22 २२ “मी त्यांच्याविरुद्ध उठेन,” असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो. “मी बाबेलापासून नाव, वंशज आणि भावी पिढ्या ह्यांना तोडून टाकीन,” हे परमेश्वर जाहीर करतो.
Io insorgerò contro di loro - parola del Signore degli eserciti -, sterminerò il nome di Babilonia e il resto, la prole e la stirpe - oracolo del Signore -.
23 २३ मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन, आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.
Io la ridurrò a dominio dei ricci, a palude stagnante; la scoperò con la scopa della distruzione - oracolo del Signore degli eserciti -.
24 २४ सेनाधीश परमेश्वराने शपथ वाहून म्हणाला, खात्रीने, माझे जे उद्देश आहेत, त्याप्रमाणे होईल; आणि जसे मी योजले तसेच होईल.
Il Signore degli eserciti ha giurato: «In verità come ho pensato, accadrà e succederà come ho deciso.
25 २५ मी आपल्या देशात अश्शूराला तोडीन आणि माझ्या पर्वतावर त्यास पायाखाली तुडवीन. नंतर त्याचे जोखड त्यांच्यावरून निघेल आणि त्याचे ओझे त्यांच्या खांद्यावरून दूर सारले जाईल.
Io spezzerò l'Assiro nella mia terra e sui miei monti lo calpesterò. Allora sparirà da loro il suo giogo, il suo peso dalle loro spalle».
26 २६ संपूर्ण पृथ्वीसाठी योजिलेला उद्देश हाच आहे आणि जो हात सर्व राष्ट्रांवर उगारलेला आहे तो हात हाच आहे.
Questa è la decisione presa per tutta la terra e questa è la mano stesa su tutte le genti.
27 २७ कारण सेनाधीश परमेश्वराने हा संकल्प केला आहे; तो कोण थांबवू शकेल? त्याचा हात उगारलेला आहे, आणि तो कोणाच्याने मागे वळवू शकेल?
Poiché il Signore degli eserciti lo ha deciso; chi potrà renderlo vano? La sua mano è stesa, chi gliela farà ritirare?
28 २८ राजा आहाजाच्या मृत्यूच्या वर्षात ही घोषणा आली.
Nell'anno in cui morì il re Acaz fu comunicato questo oracolo:
29 २९ अगे पलिष्टी, तुला मारणारी काठी मोडली आहे म्हणून आनंद करू नको. कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल आणि उडता आग्या सर्प त्याचे फळ होईल.
«Non gioire, Filistea tutta, perché si è spezzata la verga di chi ti percuoteva. Poiché dalla radice del serpe uscirà una vipera e il suo frutto sarà un drago alato.
30 ३० गरीबाचे प्रथम जन्मलेले खातील, आणि गरजवंत सुरक्षितेत पडून राहतील. मी तुझे मूळ उपासमारीने मारीन तो तुझे उरलेले सर्व मारून टाकील.
I poveri pascoleranno sui miei prati e i miseri vi riposeranno tranquilli; ma farò morire di fame la tua stirpe e ucciderò il tuo resto.
31 ३१ वेशीनो मोठ्याने आक्रोश करा; नगरांनो आरोळी करा. पलिष्टी तू सर्व वितळून जाशील. कारण उत्तरेकडून धुराचे ढग येत आहे आणि तेथे त्याच्या सैन्यात मागे राहणारा कोणी नाही.
Urla, porta; grida, città; trema, Filistea tutta, perché dal settentrione si alza il fumo e nessuno si sbanda dalle sue schiere».
32 ३२ तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल? परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील.
Che si risponderà ai messaggeri delle nazioni? «Il Signore ha fondato Sion e in essa si rifugiano gli oppressi del suo popolo».