< यशया 13 >
1 १ आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.
Видение на Вавилона, еже виде Исаиа сын Амосов.
2 २ उघडया डोंगरावर इशारा देणारा ध्वज उभारा, त्यांना मोठयाने हाक मारा, त्यांनी सरदारांच्या द्वारात यावे म्हणून त्यांना हाताने खुणवा.
На горе польней воздвигните знамение, вознесите глас им, не бойтеся, поущайте рукою, отверзите, князи.
3 ३ मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे.
Аз повелеваю, освященни суть: и Аз веду их, исполини идут исполнити ярость Мою радующеся, вкупе и укаряюще.
4 ४ अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे.
Глас языков многих на горах, подобен языков многих, глас царей и языков собравшихся: Господь Саваоф заповеда языку оружеборцу
5 ५ ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत. परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे.
приити от земли издалеча, от края основания небесе, Господь и оружеборцы Его, растлити всю вселенную.
6 ६ आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आहे; सर्वसमर्थाकडून विनाशासहीत तो येत आहे.
Рыдайте: близ бо день Господень, и сокрушение от Бога приидет:
7 ७ त्यामुळे सर्व हात गळाले आहेत, आणि प्रत्येक हृदय विरघळले आहे;
сего ради всяка рука разслабеет, и всяка душа человеча убоится,
8 ८ ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.
и смятутся послы, и болезни приимут я яко жены раждающия: и поскорбят друг ко другу, и ужаснутся, и лице свое яко пламень изменят.
9 ९ पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे.
Се бо, день Господень грядет неизцельный, ярости и гнева, положити вселенную (всю) пусту и грешники погубити от нея.
10 १० आकाशाचे तारे आणि नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत. अरुणोदयापासूनच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाशणार नाही.
Звезды бо небесныя и орион и все украшение небесное света своего не дадят, и помрачится солнце возсиявающее, и луна не даст света своего.
11 ११ मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.
И заповем всей вселенней злая и нечестивым грехи их, и погублю укоризну беззаконных и укоризну гордых смирю:
12 १२ मी पुरुषांना उत्कृष्ट सोन्यापेक्षा अधिक दुर्मिळ करील आणि मानवजात ओफीरच्या शुध्द सोन्याहून शोधण्यास कठिण करील.
и будут оставшии честнии паче, нежели злато нежженое, и человек честен будет паче, нежели камень, иже от Суфира.
13 १३ म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल.
Разярится бо небо, и земля потрясется от оснований своих, за ярость гнева Господа Саваофа в день, в оньже приидет ярость Его.
14 १४ शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल.
И будут оставшии яко серна бежащая и яко овца заблудившая, и не будет собираяй, яко человеку в люди своя возвратитися, и человек во страну свою побегнет.
15 १५ जो कोणी सापडेल त्यास मारण्यात येईल आणि जो कोणी पकडला जाईल त्यास तलवारीने मारण्यात येईल.
Иже бо аще пленится, поразится, и иже собрани суть, мечем падут.
16 १६ त्यांच्या डोळ्यादेखत त्यांची बालके आपटून तुकडे तुकडे करण्यात येतील. त्यांची घरे लुटली जातील आणि त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार होतील.
И чада их пред ними разбиют, и домы их пленят, и жены их поймут.
17 १७ पाहा, मी त्यांच्याविरुद्ध माद्य लोकांस हल्ला करण्यासाठी उठवीन, ते रुप्याबद्दल पर्वा करणार नाहीत किंवा ते सोन्याने आनंदीत होणार नाही.
Се, Аз возбуждаю на вы Мидов, иже сребра не вменяют, ниже злата требуют:
18 १८ त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत.
стреляния юношеская сокрушат, и чад ваших не помилуют, ниже пощадят чад твоих очи их.
19 १९ आणि राज्याचे अधिक कौतुक, खास्द्यांच्या वैभवाचा अभिमान अशी बाबेल, तिला सदोम आणि गमोराप्रमाणे देवाकडून उलथून टाकण्यात येईल.
И будет Вавилон, иже нарицается славный от царя Халдейска, якоже разсыпа Бог Содому и Гоморру,
20 २० ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत.
не населится в вечное время, и не внидут в онь чрез многия роды, ниже пройдут его Аравляне, ниже пастуси почиют в нем.
21 २१ परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील; आणि शहामृग व रानबोकड तेथे उड्या मारतील.
И почиют тамо зверие, и наполнятся домове шума, и почиют ту сирини, и беси тамо воспляшут,
22 २२ तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही.
и онокентавры тамо вселятся, и вогнездятся ежеве в домех их.