< यशया 12 >
1 १ त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.
Na ta dan boš rekel: »Oh Gospod, hvalil te bom. Čeprav si bil jezen name, je tvoja jeza odvrnjena in me ti tolažiš.«
2 २ पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”
Glej, Bog je rešitev moje duše. Zaupal bom in ne bom prestrašen, kajti Gospod Jahve je moja moč in moja pesem; prav tako je postal rešitev moje duše.
3 ३ तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.
Zatorej boste z radostjo zajemali vodo iz vodnjakov rešitve duš.
4 ४ त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
Na ta dan boste rekli: »Hvalimo Gospoda, kličimo njegovo ime, med ljudstvom razglašajmo njegova dela, omenjajmo, da je njegovo ime povišano.«
5 ५ परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.
Prepevajmo Gospodu, kajti storil je odlične stvari. To je znano po vsej zemlji.
6 ६ अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”
Zavriskaj in zavpij, ti prebivalec Siona, kajti velik je Sveti Izraelov v tvoji sredi.