< यशया 12 >

1 त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.
וְאָֽמַרְתָּ בַּיּוֹם הַהוּא אוֹדְךָ יְהֹוָה כִּי אָנַפְתָּ בִּי יָשֹׁב אַפְּךָ וּֽתְנַחֲמֵֽנִי׃
2 पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”
הִנֵּה אֵל יְשׁוּעָתִי אֶבְטַח וְלֹא אֶפְחָד כִּֽי־עׇזִּי וְזִמְרָת יָהּ יְהֹוָה וַֽיְהִי־לִי לִֽישׁוּעָֽה׃
3 तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.
וּשְׁאַבְתֶּם־מַיִם בְּשָׂשׂוֹן מִמַּעַיְנֵי הַיְשׁוּעָֽה׃
4 त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
וַאֲמַרְתֶּם בַּיּוֹם הַהוּא הוֹדוּ לַֽיהֹוָה קִרְאוּ בִשְׁמוֹ הוֹדִיעוּ בָעַמִּים עֲלִילֹתָיו הַזְכִּירוּ כִּי נִשְׂגָּב שְׁמֽוֹ׃
5 परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.
זַמְּרוּ יְהֹוָה כִּי גֵאוּת עָשָׂה (מידעת) [מוּדַעַת] זֹאת בְּכׇל־הָאָֽרֶץ׃
6 अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”
צַהֲלִי וָרֹנִּי יוֹשֶׁבֶת צִיּוֹן כִּי־גָדוֹל בְּקִרְבֵּךְ קְדוֹשׁ יִשְׂרָאֵֽל׃

< यशया 12 >