< यशया 10 >
1 १ जे कोणी अन्यायकारक कायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो.
Biada tym, którzy wydają niesprawiedliwe ustawy, i tym, którzy wypisują dekrety ucisku;
2 २ ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात, विधवांना लूटतात आणि पितृहीनांना आपले भक्ष्य करतात.
Aby odepchnąć ubogiego od sądu i pozbawić sprawiedliwości ubogich mego ludu, aby wdowy stały się ich łupem i aby mogli ograbiać sieroty.
3 ३ न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल? मदतीकरिता कोणाकडे पळाल आणि तुमची संपत्ती कोठे ठेवाल?
A co uczynicie w dniu nawiedzenia i spustoszenia, który przyjdzie z daleka? Do kogo będziecie uciekać się o pomoc? I gdzie zostawicie swoją chwałę?
4 ४ बंदिवानांमध्ये पायाशी दबून राहणे व वधलेल्यांमध्ये पडून राहण्याशिवाय काही राहणार नाही, कारण या सर्वामुळे परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही परंतु मारण्यासाठी त्याचा हात उगारलेला राहील.
Beze mnie skulą się wśród więźniów, upadną wśród zabitych. Mimo tego wszystkiego jego gniew nie ustał, ale jego ręka jest jeszcze wyciągnięta.
5 ५ माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो.
Ach, Asyryjczyk, rózga mego gniewu; w jego ręku jest kij mojego oburzenia.
6 ६ मी त्यास उद्धट राष्ट्राविरूद्ध पाठवत आहे. आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरुन वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे. मी त्यास लूट करण्यासाठी अपहरण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी आज्ञा करीन.
Wyślę go przeciw obłudnemu narodowi, przeciw ludowi mojego gniewu przykażę mu, aby zebrał łup i zdobycz, aby zdeptał go, jak błoto na ulicach.
7 ७ परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत. पुष्कळ राष्ट्रांचा नाश करून त्यांना मिटवून टाकावे असे त्याच्या मनात आहे.
Lecz on nie tak będzie mniemał i jego serce nie będzie tak myślało, ponieważ w swoim sercu umyślił wytracić i wytępić niemało narodów.
8 ८ तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?
Mówi bowiem: Czyż moi książęta nie są królami?
9 ९ कालनो कर्कमीशासारखे नाही काय? हमाथ अर्पदासारखे नाही काय? शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?
Czy Kalno nie jest jak Karkemisz? Czy Chamat nie jest jak Arpad? Czy Samaria nie jest jak Damaszek?
10 १० मूर्तीपूजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरूशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या.
Jak moja ręka dosięgła królestw bożków, chociaż ich bożki [przewyższały] te w Jerozolimie i Samarii;
11 ११ शोमरोन व त्यातील निरुपयोगी मूर्तींचे जसे मी केले, तसे मी यरूशलेम व त्यातील मूर्तींचे करणार नाही काय?”
Czyż nie uczynię z Jerozolimą i jej bożkami tak, jak uczyniłem z Samarią i jej bożkami?
12 १२ सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.
I stanie się, że gdy Pan dokona całego swojego dzieła nad górą Syjonu i nad Jerozolimą, ukarzę owoc wyniosłego serca króla Asyrii i pychę jego zuchwałych oczu.
13 १३ कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे, व राष्ट्रांच्या सीमा मी काढून टाकल्या आहेत, त्यांची भांडारे मी लुटली आहेत व शूर वीराप्रमाणे जे सिहांसनावर बसतात त्यांना खाली पाडले आहे.
Mówi bowiem: Dokonałem [tego] mocą swojej ręki i własną mądrością, bo jestem mądry. Zniosłem granice narodów, zabrałem ich skarby i powaliłem mieszkańców jak mocarz.
14 १४ पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे, व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे. कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”
Moja ręka sięgnęła po bogactwo narodów jak do gniazda. A jak się zbiera porzucone jajka, tak ja zgarnąłem całą ziemię; i nikt nawet skrzydłem nie poruszył, nie otworzył dzioba ani nie pisnął.
15 १५ कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय? काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.
Czy chełpi się siekiera wobec tego, który nią rąbie? Czy wynosi się piła nad tego, który nią piłuje? Jak gdyby rózga wywijała tym, który ją podnosi, jak gdyby kij podnosił się, jakby nie był drewnem.
16 १६ म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील; आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.
Dlatego Pan, PAN zastępów, ześle wycieńczenie na jego opasłych, a pod jego chwałą rozpali ogień, jakby płonący ogień.
17 १७ इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, आणि त्यांचा पवित्र प्रभू ज्वाला होईल; तो त्याचे काटेकूटे व काटेझुडपे एका दिवसात जाळून खाक करील.
A Światłość Izraela będzie ogniem, a jego Święty – płomieniem, który spali i strawi jego ciernie i osty w jednym dniu.
18 १८ परमेश्वर त्याचे रान व सुपीक भूमी यांची शोभा त्यांच्या देह व आत्मा या दोहोसहीत फस्त करील; जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल.
Strawi także wspaniałość jego lasu i urodzajnych pól, od duszy aż do ciała, i stanie się tak jak [wtedy], gdy chorąży ucieka ze strachu.
19 १९ रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.
A pozostałych drzew jego lasu będzie tak niewiele, że nawet dziecko będzie mogło je spisać.
20 २० त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील.
I w tym dniu stanie się, że resztka Izraela i ci, którzy ocaleli z domu Jakuba, nie będą już polegać na tym, który ich bije, lecz będą prawdziwie polegać na PANU, Świętym Izraela.
21 २१ याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.
Resztka zawróci, resztka Jakuba, do Boga mocnego.
22 २२ कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे
Bo choćby twój lud, Izraelu, był jak piasek morski, [tylko] resztka z niego powróci. Postanowione wytracenie będzie opływało w sprawiedliwość.
23 २३ कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.
Pan BÓG zastępów dokona bowiem postanowionego wytracenia pośród całej tej ziemi.
24 २४ म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.
Dlatego tak mówi Pan BÓG zastępów: Mój ludu, który mieszkasz na Syjonie, nie bój się Asyryjczyka. Uderzy cię rózgą i swą laskę podniesie na ciebie, [tak jak] Egipt.
25 २५ त्यास भिऊ नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल.
Jeszcze chwila bowiem, a skończy się mój gniew i moja zapalczywość – ku ich zniszczeniu.
26 २६ मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर, मिद्यानाचा ओरेब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे, चाबूक चालवील, तो त्याची काठी समुद्रावर आणि मिसरात केल्याप्रमाणे उगारेल.
I PAN zastępów wzbudzi bicz na niego, jak podczas porażki Midianitów przy skale Oreba, i podniesie swą laskę tak, jak ją [podniósł] nad morzem, w Egipcie.
27 २७ त्या दिवशी, तुझ्या खाद्यांवरील त्याचे ओझे आणि तुझ्या मानेवरील त्याचे जूं काढण्यात येईल,” तुझ्या मानेच्या पुष्ठतेमुळे ते जू भंग पावेल.
I stanie się w tym dniu, że jego brzemię zostanie zdjęte z twoich ramion i jego jarzmo z twojej szyi, a to jarzmo zostanie zniszczone z powodu namaszczenia.
28 २८ शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे; आणि त्याने मिखमाशात आपले अन्नधान्य साठवून ठेवले आहे.
Przybył do Ajjat, przeszedł przez Migron, w Mikmas zostawił swój oręż.
29 २९ त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे. रामा थरथर कापत आहे व शौलाचा गिबा पळून गेला आहे.
Przeszyli przełęcz, w Geba zanocowali; zlękła się Rama, uciekła Gibea Saula.
30 ३० गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे! तू बिचारी अनाथोथ!
Podnieś swój głos, córko Gallim! Niech słyszą w Laisz, biedny Anatot!
31 ३१ मदमेना पळत आहे, व गेबीमातील रहिवासी आश्रयासाठी पळत आहेत.
Madmena ustąpiła, mieszkańcy Gabim szykują się [do ucieczki].
32 ३२ आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल सीयोन कन्येच्या डोंगराला, यरूशलेमेच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील.
Jeszcze przez dzień zostanie w Nob, potrząśnie swoją ręką przeciwko córce Syjonu, wzgórzu Jerozolimy.
33 ३३ पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील; उंच झाडे तोडले जातील, व उन्मत आहे त्यास खाली आणण्यात येईल.
Oto Pan, PAN zastępów odetnie latorośle gwałtownie. Wznoszące się wysoko zostaną ścięte, a wyniosłe będą poniżone.
34 ३४ रानातील गर्द झाडी तो कुऱ्हाडीने छाटून टाकील, व लबानोन पराक्रमीच्या हातून पतन पावत आहे.
Wytnie także gęstwiny lasu siekierą, a Liban upadnie od wielmożnego.