< होशेय 8 >
1 १ “मुखाला तुतारी लाव, परमेश्वराच्या, घरावर गरुड येत आहे, हे यासाठी घडत आहे कारण लोकांनी माझा करार मोडून माझ्या नियम शास्त्राच्या विरोधात बंड केले आहे.
你用口吹角吧! 敵人如鷹來攻打耶和華的家; 因為這民違背我的約, 干犯我的律法。
2 २ ते माझा धावा करतात, माझ्या देवा, आम्ही इस्राएली तुला जाणतो”
他們必呼叫我說: 我的上帝啊,我們以色列認識你了。
3 ३ पण इस्राएलाने जे चांगले ते नाकारले आहे, आणि शत्रू त्याचा पाठलाग करेल.
以色列丟棄良善; 仇敵必追逼他。
4 ४ त्यांनी राजे नेमले, पण माझ्या द्वारे नाही; त्यांनी राजपुत्र स्थापले आहे, पण माझे ज्ञान न घेता त्यांनी, आपले सोने व चांदी घेऊन, स्वत: साठी मूर्ती बनविल्या आहेत. त्यानेच ते नाश पावतील.
他們立君王,卻不由我; 他們立首領,我卻不認。 他們用金銀為自己製造偶像, 以致被剪除。
5 ५ संदेष्टा म्हणतो, हे शोमरोना तुझे वासरू त्याने नाकारले आहे, परमेश्वर म्हणतो, या लोकांविरुध्द माझा राग पेटेल, किती वेळ ते अशुद्ध राहणार?
撒馬利亞啊,耶和華已經丟棄你的牛犢; 我的怒氣向拜牛犢的人發作。 他們到幾時方能無罪呢?
6 ६ कारण ही मूर्ती इस्राएलातून आली, कारागिराने बनवली, ती देव नाही शोमरोनाच्या वासराचे तुकडे होतील.
這牛犢出於以色列, 是匠人所造的,並不是神。 撒馬利亞的牛犢必被打碎。
7 ७ कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करतात, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली तरी परके त्यास गिळून टाकतील.
他們所種的是風,所收的是暴風; 所種的不成禾稼,就是發苗也不結實; 即便結實,外邦人必吞吃。
8 ८ इस्राएलास गिळले आहे, आता ते देशामध्ये बिन कामाची लबाडी करतात.
以色列被吞吃; 現今在列國中,好像人不喜悅的器皿。
9 ९ कारण ते अश्शूरास रानगाढवासारखे गेले, एफ्राईमाने आपल्यासाठी प्रियकर नेमले आहेत.
他們投奔亞述,如同獨行的野驢; 以法蓮賄買朋黨。
10 १० जरी त्यांनी देशात प्रियकर नेमले, तरी मी त्यांना आता एकत्र करीन. राजे आणि पुढारी यांच्या दबावामुळे ते कमी होतील.
他們雖在列邦中賄買人, 現在我卻要聚集懲罰他們; 他們因君王和首領所加的重擔日漸衰微。
11 ११ कारण एफ्राईमाने पापबलींसाठी आपल्या वेद्या वाढवल्या आहेत, पण त्या वेद्या पाप करण्याचे कारण ठरल्या आहेत.
以法蓮增添祭壇取罪; 因此,祭壇使他犯罪。
12 १२ मी असंख्य वेळा माझे नियमशास्त्र त्यांच्यासाठी लिहीले, पण ते त्याकडे अनोळख्या सारखे पाहतात.
我為他寫了律法萬條, 他卻以為與他毫無關涉。
13 १३ मला अर्पणे करावी म्हणून ते मांस देतात व खातात, पण मी परमेश्वर, ते स्वीकारत नाही. आता मी त्यांचे पाप स्मरण करून त्यांना शासन करणार, ते मिसर देशात परत जातील.
至於獻給我的祭物, 他們自食其肉, 耶和華卻不悅納他們。 現在必記念他們的罪孽, 追討他們的罪惡; 他們必歸回埃及。
14 १४ इस्राएलाला आपल्या निर्माणकर्त्या परमेश्वराचा विसर पडला आहे आणि त्याने महाल बांधले आहेत, यहूदाने तटबंदीची नगरे वसवली आहेत, पण मी त्याच्या शहरावर अग्नी पाठवीन, तो त्याची तटबंदी नष्ट करून टाकेल.
以色列忘記造他的主,建造宮殿; 猶大多造堅固城, 我卻要降火焚燒他的城邑, 燒滅其中的宮殿。