< होशेय 6 >

1 “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.
to go: come! and to return: return to(wards) LORD for he/she/it to tear and to heal us to smite and to saddle/tie us
2 दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.
to live us from day in/on/with day [the] third to arise: raise us and to live to/for face: before his
3 चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
and to know to pursue to/for to know [obj] LORD like/as dawn to establish: establish exit his and to come (in): come like/as rain to/for us like/as spring rain to shoot land: soil
4 एफ्राईमा मी तुला काय करु? यहूदा मी तुला काय करु? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.
what? to make: do to/for you Ephraim what? to make: do to/for you Judah and kindness your like/as cloud morning and like/as dew to rise to go: went
5 म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.
upon so to hew in/on/with prophet to kill them in/on/with word lip my and justice: judgement your light to come out: come
6 कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.
for kindness to delight in and not sacrifice and knowledge God from burnt offering
7 आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला, ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले.
and they(masc.) like/as Adam to pass: trespass covenant there to act treacherously in/on/with me
8 गिलाद हे दुष्टांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पाऊले उमटली आहे.
Gilead town to work evil: wickedness insidious from blood
9 जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.
and like/as to wait man band fellow priest way: road to murder Shechem [to] for wickedness to make
10 १० इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे, एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे.
in/on/with house: household Israel to see: see (horror *Q(k)*) there fornication to/for Ephraim to defile Israel
11 ११ तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन.
also Judah to set: appoint harvest to/for you in/on/with to return: rescue I captivity people my

< होशेय 6 >