< होशेय 6 >
1 १ “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल.
「來,我們回到上主那裏去,因為衪撕碎了我們,也必要治愈;衪打傷了我們,也必要包紮。
2 २ दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.
兩天後衪必使田復生,第三天衪必使我們興起,生活在衪的慈顏下。
3 ३ चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
讓我們認識上主,讓我們努力認識上主! 衪定要像曙光一樣出現,衪要來到我們中間,有如秋雨,有如滋潤田地的春雨。」
4 ४ एफ्राईमा मी तुला काय करु? यहूदा मी तुला काय करु? तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे.
厄弗辣因,我可對你們作什麼﹖因為你們的仁愛有如旱晨的浮雲,有如易於消散的朝露。
5 ५ म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे.
因此,我藉先知們砍伐了他們,以我口中的言語殺死戳了他們;我的的裁判出現有如光明:
6 ६ कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे.
因為我喜歡仁慈勝過祭獻,喜歡人認識天主勝過全燔祭。
7 ७ आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला, ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले.
但是他們在阿當就犯了罪,在那裏已背叛了我。
8 ८ गिलाद हे दुष्टांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पाऊले उमटली आहे.
基肋阿得是座作惡的城池,滿了血跡。
9 ९ जशी लुटारुंची टोळी टपून बसते, तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत.
一隊司祭就如埋伏的強盜,在往舍根的路上行兇;的確,他們行了可恥的事
10 १० इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे, एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे.
在貝特耳我見了可惡的事:在那裏厄弗辣因行了淫,以色列玷污了自己
11 ११ तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन.
當我轉變我百姓的命運時,猶大啊! 為你也注定了一個收割期。