< होशेय 5 >
1 १ याजकांनो! हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पावर पाश आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.
Sikilizeni haya, makuhani! kuweni makini, nyumba ya Israeli! Sikilizeni, nyumba ya mfalme! Kwa maana hukumu itakuja juu yenu nyote. Mmekuwa mtego huko Mizpa na wavu uliosambazwa juu ya Tabori.
2 २ बंडखोर खोल कत्तलीत राहतात पण मी त्या सर्वांना शिस्त लावेन.
Waasi husimama sana katika mauaji, lakini nitawaadhibu wote.
3 ३ एफ्राईम मला माहित आहे आणि इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही. एफ्राईम तू एका वेश्येसारखा झाला आहेस, इस्राएल अशुद्ध झाला आहे.
Najua Efraimu, na Israeli hajajificha kwangu. Efraimu, sasa umekuwa kama kahaba; Israeli ni unajisi.
4 ४ त्यांचे कृत्य त्यांना माझ्याकडे त्यांच्या देवाकडे परत येऊ देत नाही, कारण त्यामध्ये व्यभिचारी आत्मा राहतो; आणि ते आपला देव परमेश्वर यास ओळखत नाहीत.
Matendo yao hayawataruhusu kumgeukia Mungu, maana mawazo ya uzinzi yako ndani yao, na hawatamjua Bwana.
5 ५ इस्राएलाचा गर्व त्याचाच विरोधात साक्ष देतो, इस्राएल व एफ्राईम आपल्या अपराधात ठेचाळणार, आणि यहूदा सुध्दा त्यांच्या सोबत अडखळेल.
Kiburi cha Israeli kinawashuhudia; Kwa hiyo Israeli na Efraimu watajikwaa kwa hatia zao; na Yuda pia wataanguka pamoja nao.
6 ६ ते परमेश्वराचा शोध आपली मेंढरे व गुरे घेऊन करतील, परंतू तो त्यांना सापडणार नाही, कारण त्याने त्यांचा त्याग केला आहे.
Watakwenda pamoja na kondoo zao na ng'ombe zao kumtafuta Bwana, lakini hawatamuona, kwa kuwa amejiondoa kutoka kwao.
7 ७ ते परमेश्वराशी अविश्वासू राहिले; कारण त्यांनी अनैरस मुलांना जन्मास घातले आता चंद्रदर्शन होताच त्यास भूमीसहीत खाऊन टाकेन.
Walikuwa wasio waaminifu kwa Bwana, kwa kuwa wamezaa watoto haramu. Sasa sherehe mpya za mwezi zitawaangamiza na mashamba yao.
8 ८ गिबात शिंग आणि रामात तुतारी फुंका; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ अविन येथे करा.
Piga tarumbeta huko Gibea, na tarumbeta huko Rama. Sauti ya kilio cha vita huko Beth Aveni 'Tutakufuata, Benyamini!'
9 ९ शासनाच्या दिवशी एफ्राईम नाश पावेल, इस्राएलाच्या वंशास मी खात्रीने होणारी गोष्ट कळवली आहे.
Efraimu itakuwa ukiwa siku ya adhabu. Miongoni mwa makabila ya Israeli nimetangaza habari itakayotokea.
10 १० यहूदाचे पुढारी सिमेचा दगड सारणाऱ्यासारखे आहेत, मी माझा राग त्यांच्यावर पाण्यासारखा ओतणार.
Viongozi wa Yuda ni kama wale wanaondoao jiwe la mipaka. Nami nitamwaga ghadhabu yangu juu yao kama maji.
11 ११ एफ्राईमाचा चुराडा झाला आहे, न्यायामध्ये त्याचा चुराडा झाला आहे, कारण त्याने मनापासून मूर्त्यांना दंडवत करण्याचे ठरवले आहे.
Efraimu ameangamizwa; ameangamizwa kwa hukumu, kwa sababu ametembea kwa hiari kufuata sanamu.
12 १२ ह्यास्तव मी एफ्राईमाला कसर आणि यहूदाच्या घराण्यास किडीसारखा होईन.
Kwa hiyo nitakuwa kama nondo kwa Efraimu, na kama uozo kwa nyumba ya Yuda.
13 १३ जेव्हा एफ्राईमाने आपला रोग आणि यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला, आणि आपला दूत त्याने महान राजाकडे पाठविला; पण तो त्यास आरोग्य देऊन त्यांची जखम बरी करू शकला नाही.
Efraimu alipoona ugonjwa wake, Yuda akaona jeraha lake; Efraimu akaenda Ashuru; Yuda akatuma wajumbe kwa mfalme mkuu. Lakini hakuweza kuwaponya watu au kuponya jeraha lako.
14 १४ हयास्तव मी एफ्राईमास सिंह आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईन, आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल.
Kwa hiyo nitakuwa kama simba kwa Efraimu, na kama simba kwa nyumba ya Yuda. Mimi, naam mimi, nitapotea na kwenda mbali; Nitawachukua, na hakutakuwa na mtu wa kuwaokoa.
15 १५ मी आपल्या स्थानी परत जाईन, जोपर्यंत ते आपल्या दोषांची कबुली देत नाहीत आणि माझे मुख शोधत नाहीत; जोपर्यंत ते आपल्या दु: खात कळकळीने माझा शोध घेऊन म्हणत नाहीत.
Nitakwenda na kurudi mahali pangu, mpaka watambue hatia yao na kutafuta uso wangu, hata wakanitafute kwa bidii katika dhiki yao.