< होशेय 4 >
1 १ इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका, या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे; कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
Ouçam a palavra de Yahweh, filhos de Israel, pois Yahweh tem uma acusação contra os habitantes da terra: “De fato, não há verdade, nem bondade, nem o conhecimento de Deus na terra.
2 २ तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.
There é praguejar, mentir, assassinar, roubar, e cometer adultério; rompem limites, e o derramamento de sangue causa derramamento de sangue.
3 ३ म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.
Portanto, a terra vai lamentar, e todos que nele habitam se perderão, com todos os seres vivos que há nela, até mesmo os animais do campo e as aves do céu; sim, os peixes do mar também morrem.
4 ४ पण कुणालाही वाद घालू देऊ नका, कोणीही कोणावर आरोप न लावो, कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यांस मी दोष लावत आहे.
“No entanto, que nenhum homem leve uma acusação, nem que nenhum homem acuse; para o seu povo são como aqueles que apresentam acusações contra um padre.
5 ५ आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझासुद्धा भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल; आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.
Você vai tropeçar no dia, e o profeta também tropeçará com você durante a noite; e eu destruirei sua mãe.
6 ६ माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
Meu povo é destruído por falta de conhecimento. Como você rejeitou o conhecimento, eu também o rejeitarei, que você pode não ser um padre para mim. Porque você esqueceu a lei de seu Deus, Eu também esquecerei seus filhos.
7 ७ जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.
Como eles se multiplicaram, pecaram contra mim. Vou transformar sua glória em vergonha.
8 ८ ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याचे मन लागलेले आहे.
Eles se alimentam do pecado do meu povo, e se preocupam com sua iniqüidade.
9 ९ आणि जसे लोक तसा याजक असे होईल, आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन, आणि त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईन.
Será como as pessoas, como o padre; e eu os punirei por seus caminhos, e os reembolsará por seus atos.
10 १० ते खातील पण ते त्यास पुरणार नाही; ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही, कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.
Eles comerão, e não terão o suficiente. Eles farão de prostituta, e não aumentarão; porque abandonaram a escuta de Yahweh.
11 ११ वेश्यागमन, द्राक्षरस, आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.
Prostituição, vinho, e vinho novo tiram o entendimento.
12 १२ माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.
Meu povo consulta com seu ídolo de madeira, e responder a um pau de madeira. De fato, o espírito da prostituição os desviou, e têm sido infiéis ao seu Deus.
13 १३ ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक, हिवर, आणि धूप जाळतात, कारण त्यांची सावली चांगली (छान) असते; म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात.
Eles se sacrificam no topo das montanhas, e queimar incenso nas colinas, debaixo de carvalhos, choupos e terebintos, porque sua tonalidade é boa. Portanto, suas filhas se fazem de prostituta, e suas noivas cometem adultério.
14 १४ तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात, आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात; हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील.
Não castigarei suas filhas quando elas se prostituem, nem suas noivas quando elas cometem adultério; porque os homens se consomem com prostitutas, e se sacrificam com as prostitutas do santuário; Assim, as pessoas sem entendimento virão à ruína.
15 १५ हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो, गिल्गालास जाऊ नका, वर बेथ अवेनास जाऊ नका, परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.
“Embora você, Israel, faça de prostituta, mas não deixe Judah ofender; e não venha para Gilgal, nem ir até Beth Aven, nem jurar: “Como Yahweh vive”.
16 १६ कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे. मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?
Para Israel, o comportamento tem sido extremamente teimoso, como uma novilha teimosa. Então como Yahweh os alimentará como um cordeiro em um prado?
17 १७ एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे, त्यास एकटे सोडा.
Ephraim está unido aos ídolos. Deixe-o em paz!
18 १८ त्यांचा द्राक्षरस आंबट झाला आहे; ते एकसारखे व्यभिचार करतच राहतात. तिच्या अधिकाऱ्यास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे.
A bebida deles se tornou azeda. Eles se fazem de prostituta continuamente. Seus governantes amam muito seu modo vergonhoso.
19 १९ वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन, आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.
O vento a envolveu em suas asas; e eles ficarão desapontados por causa de seus sacrifícios.