< होशेय 4 >

1 इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका, या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे; कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
שִׁמְע֥וּ דְבַר־יְהוָ֖ה בְּנֵ֣י יִשְׂרָאֵ֑ל כִּ֣י רִ֤יב לַֽיהוָה֙ עִם־יוֹשְׁבֵ֣י הָאָ֔רֶץ כִּ֠י אֵין־אֱמֶ֧ת וְֽאֵין־חֶ֛סֶד וְאֵֽין־דַּ֥עַת אֱלֹהִ֖ים בָּאָֽרֶץ׃
2 तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे. या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.
אָלֹ֣ה וְכַחֵ֔שׁ וְרָצֹ֥חַ וְגָנֹ֖ב וְנָאֹ֑ף פָּרָ֕צוּ וְדָמִ֥ים בְּדָמִ֖ים נָגָֽעוּ׃
3 म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे, जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे, रानपशू, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.
עַל־כֵּ֣ן ׀ תֶּאֱבַ֣ל הָאָ֗רֶץ וְאֻמְלַל֙ כָּל־יוֹשֵׁ֣ב בָּ֔הּ בְּחַיַּ֥ת הַשָּׂדֶ֖ה וּבְע֣וֹף הַשָּׁמָ֑יִם וְגַם־דְּגֵ֥י הַיָּ֖ם יֵאָסֵֽפוּ׃
4 पण कुणालाही वाद घालू देऊ नका, कोणीही कोणावर आरोप न लावो, कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यांस मी दोष लावत आहे.
אַ֥ךְ אִ֛ישׁ אַל־יָרֵ֖ב וְאַל־יוֹכַ֣ח אִ֑ישׁ וְעַמְּךָ֖ כִּמְרִיבֵ֥י כֹהֵֽן׃
5 आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझासुद्धा भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल; आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.
וְכָשַׁלְתָּ֣ הַיּ֔וֹם וְכָשַׁ֧ל גַּם־נָבִ֛יא עִמְּךָ֖ לָ֑יְלָה וְדָמִ֖יתִי אִמֶּֽךָ׃
6 माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत. कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून मी सुध्दा तुम्हास माझे याजक म्हणून नाकारीन. माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
נִדְמ֥וּ עַמִּ֖י מִבְּלִ֣י הַדָּ֑עַת כִּֽי־אַתָּ֞ה הַדַּ֣עַת מָאַ֗סְתָּ וְאֶמְאָֽסְאךָ֙ מִכַּהֵ֣ן לִ֔י וַתִּשְׁכַּח֙ תּוֹרַ֣ת אֱלֹהֶ֔יךָ אֶשְׁכַּ֥ח בָּנֶ֖יךָ גַּם־אָֽנִי׃
7 जसे हे याजक वाढत गेले तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले. मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.
כְּרֻבָּ֖ם כֵּ֣ן חָֽטְאוּ־לִ֑י כְּבוֹדָ֖ם בְּקָל֥וֹן אָמִֽיר׃
8 ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याचे मन लागलेले आहे.
חַטַּ֥את עַמִּ֖י יֹאכֵ֑לוּ וְאֶל־עֲוֹנָ֖ם יִשְׂא֥וּ נַפְשֽׁוֹ׃
9 आणि जसे लोक तसा याजक असे होईल, आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन, आणि त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईन.
וְהָיָ֥ה כָעָ֖ם כַּכֹּהֵ֑ן וּפָקַדְתִּ֤י עָלָיו֙ דְּרָכָ֔יו וּמַעֲלָלָ֖יו אָשִׁ֥יב לֽוֹ׃
10 १० ते खातील पण ते त्यास पुरणार नाही; ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही, कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.
וְאָֽכְלוּ֙ וְלֹ֣א יִשְׂבָּ֔עוּ הִזְנ֖וּ וְלֹ֣א יִפְרֹ֑צוּ כִּֽי־אֶת־יְהוָ֥ה עָזְב֖וּ לִשְׁמֹֽר׃
11 ११ वेश्यागमन, द्राक्षरस, आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.
זְנ֛וּת וְיַ֥יִן וְתִיר֖וֹשׁ יִֽקַּֽח־לֵֽב׃
12 १२ माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात, त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात. गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे, आणि त्यांनी माझा, त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.
עַמִּי֙ בְּעֵצ֣וֹ יִשְׁאָ֔ל וּמַקְל֖וֹ יַגִּ֣יד ל֑וֹ כִּ֣י ר֤וּחַ זְנוּנִים֙ הִתְעָ֔ה וַיִּזְנ֖וּ מִתַּ֥חַת אֱלֹהֵיהֶֽם׃
13 १३ ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक, हिवर, आणि धूप जाळतात, कारण त्यांची सावली चांगली (छान) असते; म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात.
עַל־רָאשֵׁ֨י הֶהָרִ֜ים יְזַבֵּ֗חוּ וְעַל־הַגְּבָעוֹת֙ יְקַטֵּ֔רוּ תַּ֣חַת אַלּ֧וֹן וְלִבְנֶ֛ה וְאֵלָ֖ה כִּ֣י ט֣וֹב צִלָּ֑הּ עַל־כֵּ֗ן תִּזְנֶ֙ינָה֙ בְּנ֣וֹתֵיכֶ֔ם וְכַלּוֹתֵיכֶ֖ם תְּנָאַֽפְנָה׃
14 १४ तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात, आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात; हे विवेकहीन लोक आहेत, ते नाश पावतील.
לֹֽא־אֶפְק֨וֹד עַל־בְּנוֹתֵיכֶ֜ם כִּ֣י תִזְנֶ֗ינָה וְעַל־כַּלּֽוֹתֵיכֶם֙ כִּ֣י תְנָאַ֔פְנָה כִּי־הֵם֙ עִם־הַזֹּנ֣וֹת יְפָרֵ֔דוּ וְעִם־הַקְּדֵשׁ֖וֹת יְזַבֵּ֑חוּ וְעָ֥ם לֹֽא־יָבִ֖ין יִלָּבֵֽט׃
15 १५ हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस, तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो, गिल्गालास जाऊ नका, वर बेथ अवेनास जाऊ नका, परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.
אִם־זֹנֶ֤ה אַתָּה֙ יִשְׂרָאֵ֔ל אַל־יֶאְשַׁ֖ם יְהוּדָ֑ה וְאַל־תָּבֹ֣אוּ הַגִּלְגָּ֗ל וְאַֽל־תַּעֲלוּ֙ בֵּ֣ית אָ֔וֶן וְאַל־תִּשָּׁבְע֖וּ חַי־יְהוָֽה׃
16 १६ कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे. मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?
כִּ֚י כְּפָרָ֣ה סֹֽרֵרָ֔ה סָרַ֖ר יִשְׂרָאֵ֑ל עַתָּה֙ יִרְעֵ֣ם יְהוָ֔ה כְּכֶ֖בֶשׂ בַּמֶּרְחָֽב׃
17 १७ एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे, त्यास एकटे सोडा.
חֲב֧וּר עֲצַבִּ֛ים אֶפְרָ֖יִם הַֽנַּֽח־לֽוֹ׃
18 १८ त्यांचा द्राक्षरस आंबट झाला आहे; ते एकसारखे व्यभिचार करतच राहतात. तिच्या अधिकाऱ्यास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे.
סָ֖ר סָבְאָ֑ם הַזְנֵ֣ה הִזְנ֔וּ אָהֲב֥וּ הֵב֛וּ קָל֖וֹן מָגִנֶּֽיהָ׃
19 १९ वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन, आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.
צָרַ֥ר ר֛וּחַ אוֹתָ֖הּ בִּכְנָפֶ֑יהָ וְיֵבֹ֖שׁוּ מִזִּבְחוֹתָֽם ס

< होशेय 4 >