< होशेय 14 >

1 हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे.
以色列啊,你要歸向耶和華-你的上帝; 你是因自己的罪孽跌倒了。
2 कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.
當歸向耶和華, 用言語禱告他說: 求你除淨罪孽,悅納善行; 這樣,我們就把嘴唇的祭代替牛犢獻上。
3 अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.
我們不向亞述求救, 不騎埃及的馬, 也不再對我們手所造的說: 你是我們的上帝。 因為孤兒在你-耶和華那裏得蒙憐憫。
4 ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे.
我必醫治他們背道的病, 甘心愛他們; 因為我的怒氣向他們轉消。
5 मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील.
我必向以色列如甘露; 他必如百合花開放, 如黎巴嫩的樹木扎根。
6 त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.
他的枝條必延長; 他的榮華如橄欖樹; 他的香氣如黎巴嫩的香柏樹。
7 त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.
曾住在他蔭下的必歸回, 發旺如五穀,開花如葡萄樹。 他的香氣如黎巴嫩的酒。
8 एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु? मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन मी सारखा सदाहरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते.
以法蓮必說: 我與偶像還有甚麼關涉呢? 我-耶和華回答他,也必顧念他。 我如青翠的松樹; 你的果子從我而得。
9 कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.
誰是智慧人?可以明白這些事; 誰是通達人?可以知道這一切。 因為,耶和華的道是正直的; 義人必在其中行走, 罪人卻在其上跌倒。

< होशेय 14 >