< होशेय 12 >
1 १ एफ्राईम वारा जोपासतो, आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो, तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो, तो अश्शूरांशी करार करतो, आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.
Efrájim se hrani z vetrom in sledi vzhodnemu vetru, dnevno povečuje laži in opustošenje, sklepa zavezo z Asirci in olje nosi v Egipt.
2 २ परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे. आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील. त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.
Prav tako ima Gospod polemiko z Judom in kaznoval bo Jakoba glede na njegove poti; poplačal mu bo glede na njegova dejanja.
3 ३ गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली, आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.
V maternici je svojega brata prijel za peto in s svojo močjo je imel moč z Bogom.
4 ४ त्या स्वर्गदूताशी झोंबी केली, आणि जिंकला, त्याने रडून देवाची करुणा भाकली, तो बेथेलास देवाला भेटला, देव तेथे त्याच्याबरोबर बोलला.
Da, imel je moč nad angelom in je prevladal. Jokal je in ponižno prosil k njemu. Našel ga je v Betelu in tam je [Bog] govoril z nami;
5 ५ हा परमेश्वर, सेनेचा देव ज्यांचे स्मरण ‘परमेश्वर’ नावाने होते.
celo Gospod Bog nad bojevniki; Gospod je njegov spomenik.
6 ६ म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ, आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा.
Zatorej se obrni k svojemu Bogu, ohranjaj usmiljenje in sodbo in nenehno čakaj na svojega Boga.
7 ७ व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत, फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे.
On je trgovec, v njegovi roki so tehtnice prevare, rad zatira.
8 ८ एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही, ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
Efrájim je rekel: »Vendar sem postal bogat, pridobil sem si imetje, v vseh mojih naporih ne bodo našli v meni nobene krivičnosti, da bi bila greh.«
9 ९ मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे, नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत वसविणार.
»Jaz pa, ki sem Gospod, tvoj Bog, od egiptovske dežele, te bom vendarle prisilil, da prebivaš v šotorih kakor v dneh slovesnega praznika.
10 १० मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे. आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत, मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.
Prav tako sem govoril po prerokih in množil videnja ter po služenju prerokov uporabljal prilike.
11 ११ जर गिलादामध्ये दुष्टता असली तर निश्चितच लोक नालायक आहेत. गिलादात ते बैल अर्पण करतात, त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडाएवढी आहे.
Ali je v Gileádu krivičnost? Oni so zagotovo ničevost. V Gilgálu žrtvujejo bikce. Da, njihovi oltarji so kakor kupi na brazdah polj.
12 १२ याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला. इस्राएलाने पत्नीसाठी चाकरी केली आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली.
Jakob je zbežal v sirsko deželo in Izrael je služil za ženo in za ženo je varoval ovce.
13 १३ परमेश्वराने एका संदेष्ट्याद्वारे मिसरातून इस्राएलास बाहेर काढले, आणि संदेष्ट्याद्वारेच त्यांची काळजी घेतली.
In po preroku je Gospod Izraela privedel iz Egipta in po preroku je bil obvarovan.
14 १४ एफ्राईमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे. म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणिल आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील.
Efrájim ga je silno grenko izzival k jezi, zatorej bo njegovo kri pustil nad njim in njegovo grajo bo njegov Gospod povrnil k njemu.