< होशेय 12 >

1 एफ्राईम वारा जोपासतो, आणि पूर्वेच्या वाऱ्याचा पाठलाग करतो, तो सतत लबाडी आणि हिंसा वाढवतो, तो अश्शूरांशी करार करतो, आणि मिसरात जैतूनाचे तोल घेऊन जातो.
אֶפְרַ֜יִם רֹעֶ֥ה ר֙וּחַ֙ וְרֹדֵ֣ף קָדִ֔ים כָּל־הַיֹּ֕ום כָּזָ֥ב וָשֹׁ֖ד יַרְבֶּ֑ה וּבְרִית֙ עִם־אַשּׁ֣וּר יִכְרֹ֔תוּ וְשֶׁ֖מֶן לְמִצְרַ֥יִם יוּבָֽל׃
2 परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे. आणि तो याकोबास त्याच्या कृत्याचे शासन करील. त्यांचे प्रतिफळ त्यास मिळेल.
וְרִ֥יב לַֽיהוָ֖ה עִם־יְהוּדָ֑ה וְלִפְקֹ֤ד עַֽל־יַעֲקֹב֙ כִּדְרָכָ֔יו כְּמַעֲלָלָ֖יו יָשִׁ֥יב לֹֽו׃
3 गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली, आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.
בַּבֶּ֖טֶן עָקַ֣ב אֶת־אָחִ֑יו וּבְאֹונֹ֖ו שָׂרָ֥ה אֶת־אֱלֹהִֽים׃
4 त्या स्वर्गदूताशी झोंबी केली, आणि जिंकला, त्याने रडून देवाची करुणा भाकली, तो बेथेलास देवाला भेटला, देव तेथे त्याच्याबरोबर बोलला.
וָיָּ֤שַׂר אֶל־מַלְאָךְ֙ וַיֻּכָ֔ל בָּכָ֖ה וַיִּתְחַנֶּן־לֹ֑ו בֵּֽית־אֵל֙ יִמְצָאֶ֔נּוּ וְשָׁ֖ם יְדַבֵּ֥ר עִמָּֽנוּ׃
5 हा परमेश्वर, सेनेचा देव ज्यांचे स्मरण ‘परमेश्वर’ नावाने होते.
וַֽיהוָ֖ה אֱלֹהֵ֣י הַצְּבָאֹ֑ות יְהוָ֖ה זִכְרֹֽו׃
6 म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, विश्वासू आणि न्यायी राहून त्याचा करार पाळ, आणि तुझ्या देवाची निरंतर वाट पहा.
וְאַתָּ֖ה בֵּאלֹהֶ֣יךָ תָשׁ֑וּב חֶ֤סֶד וּמִשְׁפָּט֙ שְׁמֹ֔ר וְקַוֵּ֥ה אֶל־אֱלֹהֶ֖יךָ תָּמִֽיד׃
7 व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत, फसवेगिरी करण्याची त्यांना आवड आहे.
כְּנַ֗עַן בְּיָדֹ֛ו מֹאזְנֵ֥י מִרְמָ֖ה לַעֲשֹׁ֥ק אָהֵֽב׃
8 एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे, माझ्यासाठी संपत्ती मिळवली आहे. माझ्या सर्व कामात त्यांना अन्याय दिसला नाही, ज्यामध्ये माझ्यात पाप आढळते.”
וַיֹּ֣אמֶר אֶפְרַ֔יִם אַ֣ךְ עָשַׁ֔רְתִּי מָצָ֥אתִי אֹ֖ון לִ֑י כָּל־יְגִיעַ֕י לֹ֥א יִמְצְאוּ־לִ֖י עָוֹ֥ן אֲשֶׁר־חֵֽטְא׃
9 मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे, नेमलेल्या सणाच्या दिवसाप्रमाणे मी तुला पुन्हा तंबूत वसविणार.
וְאָנֹכִ֛י יְהוָ֥ה אֱלֹהֶ֖יךָ מֵאֶ֣רֶץ מִצְרָ֑יִם עֹ֛ד אֹושִֽׁיבְךָ֥ בָאֳהָלִ֖ים כִּימֵ֥י מֹועֵֽד׃
10 १० मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे. आणि त्यांना मी पुष्कळ दृष्टांत दिले आहेत, मी त्यांना संदेष्ट्यांद्वारे दाखले दिले आहे.
וְדִבַּ֙רְתִּי֙ עַל־הַנְּבִיאִ֔ים וְאָנֹכִ֖י חָזֹ֣ון הִרְבֵּ֑יתִי וּבְיַ֥ד הַנְּבִיאִ֖ים אֲדַמֶּֽה׃
11 ११ जर गिलादामध्ये दुष्टता असली तर निश्चितच लोक नालायक आहेत. गिलादात ते बैल अर्पण करतात, त्यांच्या वेद्यांची संख्या शेतातील तासामध्ये असलेल्या दगडाएवढी आहे.
אִם־גִּלְעָ֥ד אָ֙וֶן֙ אַךְ־שָׁ֣וְא הָי֔וּ בַּגִּלְגָּ֖ל שְׁוָרִ֣ים זִבֵּ֑חוּ גַּ֤ם מִזְבְּחֹותָם֙ כְּגַלִּ֔ים עַ֖ל תַּלְמֵ֥י שָׂדָֽי׃
12 १२ याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला. इस्राएलाने पत्नीसाठी चाकरी केली आपल्या पत्नीसाठी मेंढरे राखली.
וַיִּבְרַ֥ח יַעֲקֹ֖ב שְׂדֵ֣ה אֲרָ֑ם וַיַּעֲבֹ֤ד יִשְׂרָאֵל֙ בְּאִשָּׁ֔ה וּבְאִשָּׁ֖ה שָׁמָֽר׃
13 १३ परमेश्वराने एका संदेष्ट्याद्वारे मिसरातून इस्राएलास बाहेर काढले, आणि संदेष्ट्याद्वारेच त्यांची काळजी घेतली.
וּבְנָבִ֕יא הֶעֱלָ֧ה יְהוָ֛ה אֶת־יִשְׂרָאֵ֖ל מִמִּצְרָ֑יִם וּבְנָבִ֖יא נִשְׁמָֽר׃
14 १४ एफ्राईमाने परमेश्वराचा क्रोध अत्यंत चेतवला आहे. म्हणून त्याचा धनी त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्यावर आणिल आणि त्याच्या लज्जास्पद कामाची त्यास परतफेड करील.
הִכְעִ֥יס אֶפְרַ֖יִם תַּמְרוּרִ֑ים וְדָמָיו֙ עָלָ֣יו יִטֹּ֔ושׁ וְחֶ֨רְפָּתֹ֔ו יָשִׁ֥יב לֹ֖ו אֲדֹנָֽיו׃

< होशेय 12 >