< होशेय 11 >

1 जेव्हा इस्राएल बालक होता तेव्हा त्यावर प्रेम केले, आणि माझ्या पुत्राला मिसरातून बोलावले.
以色列年幼的時候,我愛他, 就從埃及召出我的兒子來。
2 त्यांना जेवढे बोलविले तेवढे ते माझ्यापासून दूर जात ते बआलास बली आणि मुर्तीस धूप जाळत.
先知越發招呼他們, 他們越發走開, 向諸巴力獻祭, 給雕刻的偶像燒香。
3 तरी तो मीच ज्याने एफ्राईमास चालणे शिकविले तो मीच ज्याने त्यास हात धरुन उभे केले पण त्यांना माहीत नव्हते की मी त्यांची काळजी घेत होतो.
我原教導以法蓮行走, 用膀臂抱着他們, 他們卻不知道是我醫治他們。
4 मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.
我用慈繩愛索牽引他們; 我待他們如人放鬆牛的兩腮夾板, 把糧食放在他們面前。
5 ते मिसरात परत येणार काय? अश्शूर त्यावर राज्य करणार काय? कारण ते मजकडे परत येण्याचे नाकारतात?
他們必不歸回埃及地, 亞述人卻要作他們的王, 因他們不肯歸向我。
6 त्यांच्या नगरावर तलवार चालेल आणि ती त्याच्या दाराचे अडसर नष्ट करील, त्यांचा नाश त्यांच्या स्वत: च्या योजनांमुळे होईल.
刀劍必臨到他們的城邑, 毀壞門閂,把人吞滅, 都因他們隨從自己的計謀。
7 माझ्या लोकांस मजपासून वळवण्याचा निश्चय केला आहे तरी ते त्यांना जो मी परमप्रधान आहे त्याकडे बोलवितात तरी त्यापैकी कोणीही मला गौरव देत नाही.
我的民偏要背道離開我; 眾先知雖然招呼他們歸向至上的主, 卻無人尊崇主。
8 हे एफ्राईमे, मी तुझा त्याग कसा करु? हे इस्राएला, मी तुला शत्रुच्या हाती कसा देऊ? मी तुला अदमासारखे कसे करु? मी तुला सबोयिमासारखे कसे करु? माझे हृदय खळबळले आहे, माझी करुणा ढवळली गेली आहे.
以法蓮哪,我怎能捨棄你? 以色列啊,我怎能棄絕你? 我怎能使你如押瑪? 怎能使你如洗扁? 我回心轉意, 我的憐愛大大發動。
9 मी माझा भयानक राग अमलात आणणार नाही मी एफ्राईमाचा पुन्हा नाश करणार नाही कारण मी देव आहे आणि मनुष्य नाही तुमच्यामध्ये असणारा मी पवित्र आहे मी क्रोधाने येणार नाही.
我必不發猛烈的怒氣, 也不再毀滅以法蓮。 因我是上帝,並非世人, 是你們中間的聖者; 我必不在怒中臨到你們。
10 १० ते माझ्यामागे चालतील मी परमेश्वर सिंहासारखी गर्जना करेन मी खरोखर गर्जेन आणि लोक पश्चिमेकडून थरथरत येतील.
耶和華必如獅子吼叫, 子民必跟隨他。 他一吼叫, 他們就從西方急速而來。
11 ११ ते मिसरातून पक्षासारखे आणि अश्शूरातून कबुतरा प्रमाणे थरथरत येतील मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन असे परमेश्वर म्हणतो.
他們必如雀鳥從埃及急速而來, 又如鴿子從亞述地來到。 我必使他們住自己的房屋。 這是耶和華說的。
12 १२ एफ्राईम मला लबाडीने आणि इस्राएलचे घराणे कपटाने वेढले, पण यहूदा आतापर्यंत देवाबरोबर, जो पवित्र आहे, त्याबरोबर विश्वासू बनून आहे.
以法蓮用謊話, 以色列家用詭計圍繞我; 猶大卻靠上帝掌權, 向聖者有忠心。

< होशेय 11 >