< होशेय 10 >
1 १ इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.
以色列原是一枝茂盛結實繁多的葡萄樹,但他的收薐愈豐,祭壇也愈多;土地愈富饒,石柱也愈美觀。
2 २ त्यांचे हृदय कपटी आहे, त्यांना त्यांची शिक्षा होईल परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल.
他們心懷二意,因此必遭懲罰;上主必拆毀他們的祭壇,打倒他們的石柱。
3 ३ आता ते म्हणतील, “आम्हास राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”
那時他們要說:「哎! 我們沒有君王,因為我們不敬畏上主;可是君王能為我們作什麼呢﹖
4 ४ ते पोकळ शब्द बोलतात खोट्या शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.
他們任意講空話,發虛誓,立盟約....因此,正義有如田畦間的苦菜叢生。
5 ५ शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
撒馬黎雅的居民必為貝特文的牛犢焦慮,他的人民必為牠舉哀,他的僧侶也要為牠我去的榮華而哀號,因為牠被人奪去。
6 ६ ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. एफ्राईम लज्जीत होईल, आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्राएल लज्जीत होईल.
連牠也被帶到亞述去,作為大王的頁物。厄弗辣因得到旳只是恥辱,以色列必要因自己的偶像而蒙羞。
7 ७ शोमरोनाचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल.
撒馬黎雅滅亡了,她的君王有如一片浮在水面的乾草。
8 ८ दुष्टतेची श्रध्दास्थानाने आणि इस्राएलाची पापे नाश पावतील त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका” आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”
貝特阿文的高丘──以色列的罪過淵藪──將被摧毀,荊棘和蒺藜要攀他們的祭壇;那時他們要對山說:「遮蓋我們吧!」對丘陵說:「倒在我們身上吧!」
9 ९ इस्राएला, गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस; तू तिथेच राहिला आहेस गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?
以色列! 從基貝亞的日子起,你就犯罪,你就在那裏抗拒;難道基貝亞的戰禍不會波及那些惡人嗎﹖
10 १० मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.
我必來懲罰他們:列邦必要聯合起來攻打他們,為懲罰他們的雙重罪過。
11 ११ एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे तिला मळणी करायला आवडते म्हणून मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन. मी एफ्राईमावर जू ठेवीन, यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.
厄弗辣因原是一頭馴服的母牛,善愛打麥,可是我要將軛加在牠肥壯的頸項上;我要給厄弗辣因上套,以色列必要耕田,雅各伯必要耙地。
12 १२ तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही, तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे.
你們應該播種正義,才可收割仁慈的果實;你們應該開墾荒地,因為現在是尋求上主的時候;應尋求衪,直到衪來給他們降下正義。
13 १३ तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाची कापणी केली, तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले कारण तू तुझ्या योजनांवर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
為什麼你們種了邪惡,收割了罪孽,吃了謊言的果實呢﹖因為你依賴了你的戰車,和和你的勇士眾多;
14 १४ म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.
因此,在你的城邑中要發生騷動,你的一切堡壘將被拆毀,就如沙耳曼毀滅貝特阿爾貝時,在戰爭之日,母親被摔死在兒子身上一樣。
15 १५ तुझ्या अती दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील.
因了你的窮凶極惡,以色列家,我也要同樣對待你:以色列的君王將在風暴中完全淪亡。