< इब्री 8 >

1 आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे,
Poglavitno pa pri tem, kar pravimo: višjega duhovnika imamo takega, kateri sedí na desnici prestola veličastva v nebesih;
2 तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे.
Oskrbnik svetišča in šatora pravega, katerega je postavil Gospod in ne človek.
3 प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते.
Kajti vsak višji duhovnik se postavlja, da prinaša darí in žrtve, zato je potreba, da ima tudi tá kaj, kar bi prinašal.
4 जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजकदेखील झाला नसता कारण येथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत.
Ako bi namreč bil na zemlji, še duhovnik bi ne bil, ker so duhovniki, da dari darujejo po postavi,
5 ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचनेनुसार प्रत्येक गोष्ट कर.”
Kateri služijo po podobi in senci stvarî nebeških, kakor je Mojzes ukaz prejel, ko je napravljal šator: "Glej", pravi namreč, "da narediš vse po zgledu pokazanem ti na gori.
6 परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे.
Sedaj pa je dobil odličnejšo službo, za kolikor je tudi boljše zaveze srednik, katera je ustanovljena na boljših obljubah.
7 जर पूर्वीचा करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसऱ्या करार शोधण्याची गरज नव्हती.
Ako bi bila namreč ona prva bila brez pogreška, ne bi se iskalo drugi mesto.
8 परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवा करार करीन.
Kajti grajajoč jim pravi: "Glej, dnevi pridejo, govori Gospod, in s hišo Izraelovo in s hišo Judovo sklenem novo zavezo;
9 ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्यादिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिसर देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,’ असे प्रभू म्हणतो.
Ne po zavezi, katero sem storil z njih očeti, tisti dan, ko sem zgrabil njih roko, da bi jih izpeljal iz zemlje Egiptovske; ker oni niso ostali v zavezi moji, in jaz sem jih v nemar pustil, govori Gospod;
10 १० त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या हृदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील.
Ker to je zaveza, katero bodem sklenil s hišo Izraelovo, po tistih dnevih, govori Gospod: Postave svoje dam v njih misli, in v srca njih jih zapišem; in bodem jim za Boga, in oni mi bodejo za ljudstvo.
11 ११ तुमच्या परमेश्वरास ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
In ne učé naj vsak svojega bližnjega, in vsak svojega brata, rekoč: Spoznavaj Gospoda; ker poznali me bodo vsi, od njih malega do njih velikega;
12 १२ कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन. आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.
Ker milosten bodem njih krivicam, in njih grehov in pregreškov njih ne bodem se več spominjal."
13 १३ या कराराला नवीन करार म्हणले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरवला. जे जुने व जीर्ण होत आहे, नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.
Ker pravi: "Novo," ostaral je prvo; kar pa je ostarano in se stara, je skoraj minilo.

< इब्री 8 >