< इब्री 8 >
1 १ आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे,
Ngakho isiqokoqela sezinto esazikhulumayo yikuthi: Silompristi omkhulu onje, owahlala ngakwesokunene sesihlalo sobukhosi soMkhulu emazulwini,
2 २ तो पवित्रस्थानाचा व कोणतेही मानवनिर्मित नव्हे, तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे.
isikhonzi sendawo ezingcwele lesethabhanekele eliqotho, iNkosi eyalimisayo, njalo kungesimuntu;
3 ३ प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते.
ngoba wonke umpristi omkhulu umiselwe ukunikela iminikelo lemihlatshelo; ngakho kuyadingeka ukuthi laye abe lakho okuthile angakunikela.
4 ४ जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजकदेखील झाला नसता कारण येथे अगोदरचे नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत.
Ngoba uba ubesemhlabeni, ubengeyikuba ngumpristi lakanye, ngoba bakhona abapristi abanikela iminikelo ngokomlayo,
5 ५ ते जी कामे करतात, ती स्वर्गातील गोष्टींची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला, तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, “तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचनेनुसार प्रत्येक गोष्ट कर.”
abakhonza isibonelo lesithunzi sezinto zezulwini, njengoMozisi elaywe nguNkulunkulu esezakwenza ithabhanekele, ngoba wathi: Qaphela ukuthi wenze zonke izinto njengomfanekiso owaboniswa wona entabeni.
6 ६ परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे, जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे, तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे.
Kodwa khathesi-ke uzuze inkonzo enhle kakhulu, njengalokhu laye engumlamuli wesivumelwano esingcono, esimiswe phezu kwezithembiso ezingcono.
7 ७ जर पूर्वीचा करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसऱ्या करार शोधण्याची गरज नव्हती.
Ngoba uba lesosivumelwano esakuqala besingasoleki, bekungayikudingwa indawo yesesibili.
8 ८ परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवा करार करीन.
Ngoba ebasola uthi: Khangela insuku ziyeza, kutsho iNkosi, njalo ngizakwenza isivumelwano esitsha lendlu kaIsrayeli lendlu kaJuda;
9 ९ ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तशा प्रकारचा हा करार असणार नाही. त्यादिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिसर देशातून बाहेर आणले, ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले,’ असे प्रभू म्हणतो.
esingenjengesivumelwano engasenza laboyise mhla ngibabamba ngesandla ukubakhupha elizweni leGibhithe; ngoba bona kabahlalanga esivumelwaneni sami, lami kangibananzanga, itsho iNkosi.
10 १० त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या हृदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील.
Ngoba yilesi isivumelwano engizavumelana ngaso lendlu kaIsrayeli emva kwalezonsuku, itsho iNkosi, ngizafaka imilayo yami engqondweni yabo, lenhliziyweni zabo ngiyibhale; ngibe nguNkulunkulu kubo, bona-ke bazakuba ngabantu kimi.
11 ११ तुमच्या परमेश्वरास ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
Njalo kabayikufundisa ngulowo lalowo umakhelwane wakhe, njalo ngulowo lalowo umfowabo, esithi: Yazi iNkosi; ngoba bonke bazangazi, kusukela komncinyane wabo kuze kufike komkhulu wabo.
12 १२ कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन. आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.
Ngoba ngizakuba lesihawu ekungalungini kwabo, lezono zabo lobubi babo kangisayikukukhumbula.
13 १३ या कराराला नवीन करार म्हणले म्हणून त्याने पहिला करार जुना ठरवला. जे जुने व जीर्ण होत आहे, नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.
Ngokuthi: Isivumelwano esitsha, senze esokuqala saba ngesigugileyo. Njalo osekugugile lokudala sekuseduze lokunyamalala.