< इब्री 5 >

1 प्रत्येक यहूदी महायाजकाची निवड लोकांमधून होते आणि लोकांच्या वतीने त्यांच्या पापांसाठी यज्ञ व दाने ही दोन्ही देवाला अर्पावी, त्या कामाकरता महायाजक नेमलेला असतो.
For every high priest, who is from among men, is established over the things of God, in behalf of men, that he may present the offering and the sacrifices for sin:
2 जे चुका करतात व जे अज्ञानी आहेत, त्यांच्याशी प्रत्येक मुख्य याजक सौम्यपणे वागू शकतो कारण तो स्वतः दुर्बल असतो.
and he can humble himself, and sympathize with the ignorant and the erring, because he also is clothed with infirmity.
3 आणि त्या दुर्बलपणामुळे त्याने त्याच्या पापांसाठी तसेच लोकांच्या पापांसाठी अर्पणे केलीच पाहिजेत.
And, therefore, he is obliged as for the people, so also for himself, to present an offering for his sins.
4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.
And no one taketh this honor on himself, but he who is called of God, as Aaron was.
5 त्याचप्रमाणे, ख्रिस्ताने महायाजक होण्याचा गौरव स्वतःहून आपणावर घेतले नाही, परंतु देव ख्रिस्ताला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे.”
So also the Messiah did not exalt himself to become a High Priest; but He appointed him who said to him, Thou art my Son; this day have I begotten thee.
6 दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” (aiōn g165)
As he said also in another place: Thou art a priest for ever, after the likeness of Melchisedec. (aiōn g165)
7 येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या.
Likewise, when he was clothed in flesh, he presented supplication and entreaty with intense invocation, and with tears, to him who was able to resuscitate him from death; and he was heard.
8 जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
And though he was a son, yet, from the fear and the sufferings he endured, he learned obedience.
9 आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला (aiōnios g166)
And thus he was perfected and became the cause of eternal life to all them who obey him. (aiōnios g166)
10 १० व मलकीसदेकाच्या संप्रदायास अनुसरून देवाकडून तो महायाजक म्हणून नियुक्त झाला.
And he was named of God, the High Priest after the likeness of Melchisedec.
11 ११ याविषयी सांगण्यासारखे पुष्कळ आहे, पण तुम्हास ते स्पष्ट करणे कठीण आहे कारण तुम्ही ऐकण्यात खूप मंद झाला आहात.
Now, concerning this person, Melchisedec, we have much discourse, which we might utter; but it is difficult to explain it, because ye are infirm in your hearing.
12 १२ आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला हवे होते, तरी देवाच्या शिक्षणाचे प्राथमिक धडे पुन्हा तुम्हास कोणीतरी शिकविण्याची गरज आहे. तुम्हास दुधाची गरज आहे, जड अन्नाची नाही असे तुम्ही झाला आहात.
For ye ought to be teachers, seeing ye have been long in the doctrine. But now ye need to learn again the first lines of the commencement of the oracles of God: and ye have need of milk, and not of strong food.
13 १३ कारण जो कोणी अजून दुधावरच राहतो तो नीतिमत्त्वाच्या वचनाशी पोक्त नाही कारण अजून तो बाळच आहे.
For every one whose food is milk, is unversed in the language of righteousness, because he is a child.
14 १४ परंतु ज्यांच्या ज्ञानेद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट पारख करण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.
But strong food belongeth to the mature who, being investigators, have trained their faculties to discriminate good and evil.

< इब्री 5 >