< इब्री 4 >
1 १ म्हणून देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी देवापासून मिळालेले अभिवचन अजूनही आहे आणि यास्तव तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
Eftersom nu ett löfte att få komma in i hans vila ännu står kvar, må vi alltså med fruktan se till, att icke någon bland eder en gång befinnes hava blivit efter på vägen.
2 २ कारण आम्हास सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांस सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही.
Ty det glada budskapet hava vi mottagit såväl som de; men för dem blev det löftesord de fingo höra till intet gagn, eftersom det icke genom tron hade blivit upptaget i dem som hörde det.
3 ३ ज्या आपण विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. असे देवाने म्हणले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत” जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.
Vi som hava kommit till tro, vi få ju komma in i vilan. Det heter också: "Så svor jag då i min vrede: De skola icke komma in i min vila", och detta fastän hans verk stodo där färdiga allt ifrån den tid då världen var skapad.
4 ४ कारण पवित्र शास्त्रात तो सातव्या दिवसाबद्दल असे बोलला आहे कीः “आणि सातव्या दिवशी देवाने त्याच्या सर्व कामापासून विश्रांती घेतली.”
Ty om den sjunde dagen heter det någonstädes så: "Och Gud vilade på sjunde dagen från alla sina verk";
5 ५ आणि पुन्हा तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.”
här åter heter det: "De skola icke komma in i min vila."
6 ६ ज्यांना अगोदर सुवार्ता सांगण्यात आली होती त्यांचा त्यांच्या अविश्वासामुळे त्यामध्ये प्रवेश झाला नाही, तरी हे खरे आहे की, काही जणांचा त्या विसाव्यात प्रवेश होणार आहे.
Eftersom det alltså står kvar att några skola få komma in i den, och eftersom de som först mottogo det glada budskapet för sin ohörsamhets skull icke kommo ditin,
7 ७ त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्चित केली असून त्यास तो “आज” हा एक असा दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्या द्वारे असे म्हणतो, “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
så bestämmer han genom ordet "i dag" åter en viss dag, nu då han så lång tid därefter säger hos David, såsom förut är nämnt: "I dag, om I fån höra hans röst, mån I icke förhärda edra hjärtan."
8 ८ कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता.
Ty om Josua hade fört dem in i vilan, så skulle Gud icke hava talat om en annan, senare dag.
9 ९ म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही विसाव्याचा दिवस आहे.
Alltså står en sabbatsvila ännu åter för Guds folk.
10 १० कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
Ty den som har kommit in i hans vila, han har funnit vila från sina verk, likasom Gud från sina.
11 ११ म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Så låtom oss nu med all flit sträva efter att få komma in i den vilan, för att ingen må, såsom de, falla och bliva ett varnande exempel på ohörsamhet.
12 १२ कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे.
Ty Guds ord är levande och kraftigt och skarpare än något tveeggat svärd, och tränger igenom, så att det åtskiljer själ och ande, märg och ben; och det är en domare över hjärtats uppsåt och tankar.
13 १३ आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
Intet skapat är fördolt för honom, utan allt ligger blottat och uppenbart för hans ögon; och inför honom skola vi göra räkenskap.
14 १४ म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
Eftersom vi nu hava en stor överstepräst, som har farit upp genom himlarna, nämligen Jesus, Guds Son, så låtom oss hålla fast vid bekännelsen.
15 १५ कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.
Ty vi hava icke en sådan överstepräst som ej kan hava medlidande med våra svagheter, utan en som har varit frestad i allting, likasom vi, dock utan synd.
16 १६ तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी.
Låtom oss därför med frimodighet gå fram till nådens tron, för att vi må undfå barmhärtighet och finna nåd, till hjälp i rätt tid.