< इब्री 13 >

1 बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो.
Братолю́бство нехай пробува́є між вами!
2 लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
Не забувайте любови до при́ходнів, бо деякі нею, на́віть не ві́даючи, гостинно прийняли а́нголів.
3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
Пам'ятайте про в'я́знів, немов із ними були б ви пов'язані, про тих, хто страждає, як такі, що й самі ви знахо́дитесь в тілі.
4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
Нехай буде в усіх че́сний шлюб та ложе непоро́чне, а блу́дників та пере́любів судитиме Бог.
5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”
Будьте життям не грошолюбні, задовольняйтеся тим, що́ маєте. Сам бо сказав: „Я тебе не покину, ані не відступлю́ся від тебе!“
6 म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”
Тому́ то ми сміливо говоримо: „Господь — мені Помічни́к, і я не злякаюсь ніко́го: що зробить люди́на мені?“
7 ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
Спогадуйте наставників ваших, що вам говорили Слово Боже; і, дивлячися на кінець їхнього життя, переймайте їхню віру.
8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. (aiōn g165)
Ісус Христос учора, і сьогодні, і навіки Той Са́мий! (aiōn g165)
9 विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.
Не захоплюйтеся всілякими та чужими науками. Бо річ добра зміцняти серця благода́ттю, а не стра́вами, що ко́ристи від них не оде́ржали ті, хто за ними ходив.
10 १० ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे.
Маємо же́ртівника, що від нього годуватися права не мають ті, хто скинії служить, —
11 ११ यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.
бо котри́х звірят кров первосвященик уносить до святині за гріхи, тих м'ясо па́литься поза табо́ром, —
12 १२ म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले,
тому́ то Ісус, щоб кров'ю Своєю людей освятити, постраждав поза брамою.
13 १३ म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.
Тож виходьмо до Нього поза та́бір, і наругу Його понесімо,
14 १४ कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.
бо постійного міста не маємо тут, а шукаємо майбутнього!
15 १५ म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”
Отож, за́вжди приносьмо Богові жертву хвали́, цебто плід уст, що Ім'я́ Його славлять.
16 १६ आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
Не забувайте ж і про доброчинність та спільність, бо жертви такі вгодні Богові.
17 १७ आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशोब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.
Слухайтесь ваших наставників та коріться їм, — вони бо пильнують душ ваших, як ті, хто має здати справу. Нехай вони роблять це з радістю, а не зідхаючи, — бо це для вас не кори́сне.
18 १८ आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सद्सदविवेकबुद्धी शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्वबाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत रहावे अशी आमची इच्छा आहे.
Моліться за нас, бо наді́ємося, що ми маємо добре сумління, бо хочемо добре в усьому пово́дитись.
19 १९ मी तुम्हास विनंती करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून कळकळीने प्रार्थना करा.
А надто прошу́ це робити, щоб шви́дше до вас мене ве́рнено.
20 २० ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकाळच्या नव्या कराराद्वारे उठवले. (aiōnios g166)
Бог же миру, що з мертвих підняв великого Па́стиря вівцям кров'ю вічного заповіту, Господа нашого Ісуса, (aiōnios g166)
21 २१ त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn g165)
нехай вас удоскона́лить у кожному доброму ділі, щоб волю чинити Його, чинячи в вас любе перед лицем Його через Ісуса Христа, Якому слава на віки вічні. Амі́нь. (aiōn g165)
22 २२ बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती तुम्हास करतो.
Благаю ж вас, браття, прийміть слово поті́хи, бо коротко я написав вам.
23 २३ आपला बंधू तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हास भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
Знайте, що наш брат Тимофі́й вже ви́пущений, і я з ним; коли незаба́ром він при́йде, я вас побачу.
24 २४ तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील विश्वास ठेवणारे लोक तुम्हास सलाम सांगतात.
Вітайте всіх ваших наставників та всіх святих. Вітають вас ті, хто в Італії.
25 २५ देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Благодать зо всіма́ вами! Амі́нь.

< इब्री 13 >