< इब्री 12 >
1 १ म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
To je ten velký zástup těch, kteří osvědčili svou víru. Odložme proto všechno, co nás tíží a zdržuje, i hřích, ve kterém můžeme snadno uvíznout, a vytrvale pospíchejme k cíli.
2 २ जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
Dívejme se přitom na Ježíše, který je zdrojem i obsahem naší víry, který se nebál hanby, opustil nebeskou radost, byl popraven a ujal se s Bohem vlády.
3 ३ तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.
Uvažte, s jakým odporem ze strany hříšníků se setkal a jak trpělivě jej nesl. Neochabujte tedy a neklesejte na mysli.
4 ४ तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.
Zatím jste v zápase proti hříchu neprolili svou krev.
5 ५ आणि तुम्हास पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको.
Což jste zapomněli na slova, jimiž vás Bůh povzbuzuje jako své syny? „Neber, můj synu, na lehkou váhu, když tě Pán kárá. Neklesej na mysli, když tě napomíná.
6 ६ कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्यास तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो.
Koho Pán miluje, toho kárá. A trestá každého, koho přijímá za syna.“
7 ७ हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत?
Podvolujte se jeho výchově; Bůh s vámi jedná jako se svými syny. Byl by to vůbec syn, kdyby ho otec nevychovával?
8 ८ परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही.
Jste-li bez takové výchovy, jaké se dostává všem synům, pak nejste synové, ale cizí děti.
9 ९ याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हास शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
Naši tělesní otcové nás trestali, a přece jsme je měli v úctě; nemáme tedy být mnohem více poddáni tomu Otci, který dává Ducha a život?
10 १० आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हास आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे.
A to nás naši tělesní otcové vychovávali podle svého uvážení a jen pro krátký čas, kdežto nebeský Otec nás vychovává k vyššímu cíli, k podílu na své svatosti.
11 ११ कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.
Přísná výchova nám nikdy nebývá po chuti a vyvolává v nás odpor. Později však přináší ovoce pokoje a dokonalost těm, kdo jí prošli.
12 १२ म्हणून तुमचे लोंबकळत असलेले हात उंच करा आणि तुमचे लटपटणारे गुडघे बळकट करा!
Posilněte proto své zemdlené ruce a podlomená kolena
13 १३ तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, जे लंगडे त्यास मार्गातून घालवले जाऊ नये, तर त्यापेक्षा त्याने निरोगी व्हावे.
a vykročte jistým krokem, aby to, co kulhá, nezchromlo docela, ale naopak se uzdravilo.
14 १४ सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा.
Snažte se žít se všemi v míru a zasvěcujte se Pánu – jinak nevejdete v jeho slávu.
15 १५ तुम्ही सांभाळून राहा, यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरीत होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये,
Nevymykejte se svým otálením působení Boží milosti, aby se mezi vámi nezakořenila nějaká hořkost, která by se pro ostatní stala zdrojem nákazy a nesnází.
16 १६ कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.
Ať nikdo není nevěrný nebo lehkomyslný jako Ezau, který se vzdal práv prvorozeného za trochu jídla. Pak by byl rád dosáhl zvratu, ale na věci se už ani slzami nedalo nic změnit.
17 १७ नंतर तुम्हास माहीत आहे जेव्हा त्यास वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चात्तापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.
18 १८ ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नवीन ठिकाणी आला आहात.
Izraelci přistoupili k hmatatelné hoře Sínaji, obklopené plameny, mračny, temnotou a vichřicí,
19 १९ कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यांनी ऐकला, देवाकडे त्यांनी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये.
kde se za zvukem polnice ozýval Boží hlas.
20 २० कारण जी आज्ञा देवाने केली होती ती ते सहन करू शकले नाहीत, “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्यास दगडमार करण्यात यावा.”
Bůh požadoval usmrcení i každého zvířete, které by se přiblížilo k hoře.
21 २१ खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “मी अति भयभीत” व कंपित झालो आहे.
Účinek tohoto projevu byl tak mocný, že sami Izraelci prosili o ukončení Boží řeči. Dokonce Mojžíš prohlásil: „Třesu se hrůzou a děsem.“
22 २२ परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत
Vy jste však přistoupili k duchovní hoře – Sijónu, k městu živého Boha, k nebeskému Jeruzalému, k nesčetným zástupům andělů,
23 २३ स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव व पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,
k církvi těch, kteří jsou zapsáni v nebi, k Bohu – Soudci všech a všeho, k zesnulým věřícím, kteří již dosáhli cíle dokonalosti,
24 २४ आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते.
k Ježíši – prostředníku nové smlouvy a k jeho krvi, která naši vinu smazává, místo aby volala o pomstu jako krev Ábelova.
25 २५ मोशे जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे इस्राएल लोक जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्या ख्रिस्तापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.
Hleďte, ať neodmítáte toho, kdo mluví. Jestliže Izraelci neunikli trestu, když vypověděli poslušnost pozemskému poslu Mojžíšovi, jakému nebezpečí bychom se vystavovali my, kdybychom se odvraceli od posla nebeského.
26 २६ त्यावेळेस देवाच्या आवाजाने भूमी हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हालवीन.”
Jeho hlas kdysi otřásl zemí a nyní ohlašuje: „Ještě jednou zatřesu nejen zemí, ale i nebem.“
27 २७ “पुन्हा एकदा” याचा अर्थ असा होतो की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलवता येत नाहीत त्या तशाच राहतील.
Výrazem „ještě jednou“, dává najevo, že prověří všechno, co nemá pevné základy, takže zůstane jen to, co je neochvějné.
28 २८ म्हणून, आम्हास अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;
Obdrželi jsme nezničitelné království. Projevujme proto vděčnost tím, že budeme Bohu sloužit tak, jak se mu to líbí: s bázní a uctivostí.
29 २९ कारण आपला “देव भस्म करणारा अग्नी आहे.”
Neboť náš Bůh je „oheň stravující“.